प्रितम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलचा ओंकारेश्वर आगमन सोहळा संपन्न: पनवेल (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे) : गणेशोत्सवाची पर्वणी म्हणजे भक्ती, उत्साहात, एकोपा आणि आनंदाचा महापर्व. त्याचाच भाग म्हणून ओंकार मित्र मंडळ, प्रभू आळी, पनवेल आयोजित ३५ वा गणेश आगमन सोहळा शनिवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता दिमाखदार व भक्तिरसात संपन्न झाला. यंदा मंडळाने बाप्पाचे श्रीकृष्णस्वरूपातील आगमन करून पनवेलकरांसाठी खास आकर्षण निर्माण केले. संपूर्ण प्रभू आळी परिसर फुलांच्या सजावटीने, रोषणाईने व ढोल-ताशांच्या गजराने नटला होता. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले. या आगमन सोहळ्यास मंडळाचे आधारस्तंभ प्रितमदादा म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे मंडळ समाजकार्य आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असून, पनवेलमध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबर समाजसेवेचा संदेश देत आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवक यांच्या कुशल नियोजनामुळे सोहळा यशस्वीरीत्या पार पडला महिला मंडळ व सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभा...
जागतिक अवयवदान दिनानिमित्त अपोलोने ६६० हून अधिक अवयव प्रत्यारोपीत रुग्णांना जीवनदान दिले आपला एक 'हो' आठ लोकांना नवसंजीवनी देऊ शकतो नवी मुंबई (प्रतिनिधी): अंतःकरण अशांत असतानाही, बुद्धी शांत ठेऊन घेतलेला एक निर्णय अनेकांच्या जीवनात आशा निर्माण करू शकतो. जागतिक अवयवदान दिनानिमित्त, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने (AHNM) अशा दात्यांच्या धैर्याचा, दान प्राप्तकर्त्यांच्या लवचिकतेचा आणि अवयव प्रत्यारोपणामुळे घडून येणाऱ्या, जीवन बदलवून टाकणाऱ्या परिणामाचा सन्मान केला - नव्या जीवनाकडे नेणारा एक असा प्रवास जो विज्ञान, कौशल्य आणि मानवता एकत्र येऊन घडवून आणतात. प्रत्यारोपणासाठी पश्चिम भारतातील एक अग्रगण्य केंद्र म्हणून, अपोलोने प्रतिष्ठा मिळवली आहे. २०१७ पासून, या रुग्णालयाने ४०८ मूत्रपिंड प्रत्यारोपण, २२९ यकृत प्रत्यारोपण, ११ हृदय प्रत्यारोपण आणि १३ कॉर्निया प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत, यातील प्रत्येक केस जीवन जगण्याची दुसरी संधी दर्शवते, गेल्या दशकात भारताने अवयव प्रत्यारोपणात लक्षणीय प्रगती केली आहे, तरीही मागणी आणि उपलब्धता यांच्यातील वाढती तफावत हे एक गंभीर आव्हान आहे. राष्ट्...