Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

महासंकट करोनाचे गेल्या 24 तासात मुबंई मध्ये ३८ नवीन रुग्ण दाखल :

महासंकट करोनाचे गेल्या 24 तासात मुबंई मध्ये ३८ नवीन रुग्ण दाखल: मुंबई  बातमीनुसार : गेल्या २४ तासांत मुंबई व नजीकच्या परिक्षेत्रात तब्बल ४७ कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यातील ३८ मुंबईतील तर ९ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत. मुंबईत आता काही खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांनाही कोरोनाच्या चाचणीसाठी मान्यता मिळाली आहे. ४७ पैकी १९ रुग्णांचे निदान खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेत झाले आहे. पालिकेच्या आऱोग्य पथकांद्वारे आतापर्यंत मुंबईतील एक लाख घरे आणि जवळपास ३ लाख ८७ हजार लोकांची तपासणी कऱण्यात आली. या पथकात मुंबई पोलीसांचेही सहकार्य असल्याचे आऱोग्य विभागाने सांगितले आहे. सोमवारी पालिकेच्या वतीने १५७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे अलगीकरण कऱण्यात आले आहे. "करोना रुग्णाची ३० मार्चची आकडेवारी" :  अलगीकरण केलेले आंतरराष्ट्रीय प्रवासी - १५७ बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी आलेले रुग्ण - २०६       एकूण भरती झालेले संशयित रुग्ण - ६१    मुंबईतील पाॅझिटिव्ह रुग्ण - ३८ (१८ खासगी प्रयोगशाळा)                  मुंबईबाहेरील पाॅझिटिव्ह रुग्ण - ९ (खासगी प्रयोगशाळा)       एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण - ४७ मृत रुग्णांची संख्

मंत्रालयाच्या मुख्य इमारती मधील चौथ्या माळ्यावर शॉर्ट सर्किटमूळे आग लागली : 

मंत्रालयाच्या मुख्य इमारती मधील चौथ्या माळ्यावर शॉर्ट सर्किटमूळे आग लागली : मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आगीच्या घटना घडत असतानाच सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास नरिमन पॉइंट येथील मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमधील चौथ्या माळ्यावर शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच तेथे मुंबई अग्निशमन दल, पोलीस, रुग्ण्वाहिका आणि बेस्टचे कर्मचारी दाखल झाले. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे आग लागली नव्हती. थोड्या प्रमाणात शॉर्ट सर्किट झाले होते. बेस्टचा वीज पुरवठा करणारा स्टाफ घटनास्थळी तैनात करण्यात आला असून, घटनेवर नियंत्रण ही मिळविण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या मतदारसंघातून आणखी एक दिलासादायक बातमी : 

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या मतदारसंघातून आणखी एक दिलासादायक बातमी : (कोरोना महासंकट) : जिवघेण्या कोरोना व्हायरसवर अद्यापही औषध अजुन सापडलेले नाहीय. तसेच परदेशी किटवर अवलंबून राहिल्याने कोरोनाबाधित असल्याचे चाचणीचे निकालही विलंबाने मिळत आहेत. पुण्यातील डॉक्टर महिलेने दोन-अडीज तासांत कोरोनाची चाचणी करणारे किट बनविले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघातून आणखी एक दिलासादायक बातमी आली आहे. तेथील महिला वैज्ञानिकांनी केवळ तासाभरात कोरोनाची टेस्ट करणारे किट बनविले आहे.  महत्वाचे म्हणजे या किटचा खर्च परदेशी किटपेक्षा निम्म्याने कमी होणार आहे. वारणसीतील काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या तीन महिला संशोधकांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे किट बनविले आहे. भारतीय पेटंट कार्यालयानेही तेवढ्याच तत्परतेने २४ तासांत या किटचा पेटंट बनविण्यास मान्यताही दिली आहे. यामुळे हे किट लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. याबाबतच महिती दिल्ली वृतामधून मिळाली आहे. बीएचयूच्या वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (आयएमएस) आण्विक आणि मानवी जनुकीयशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका गीता राय यांनी आपल्या प्रयोगशाळेत संशोधक विद्यार्थ्

कम्यूनिटी ट्रान्समिशन म्हणजे काय; भारतात कोरोना "स्टेज-3" मध्ये गेलाय का; आरोग्य खात्याने समजावलं "गणित" अग्रवाल म्हणाले.

कम्यूनिटी ट्रान्समिशन म्हणजे काय; भारतात कोरोना "स्टेज-3" मध्ये गेलाय का; आरोग्य खात्याने समजावलं "गणित" अग्रवाल म्हणाले नवी दिल्ली - कोरोना व्हायरस भारतात कम्यूनिटी ट्रान्समिशन स्टेजला गेल्याची चर्चा सध्या होत आहे. मात्र, आरोग्य मंत्रालयाने याचे खंड केले आहे. यासंदर्भात बोलताना, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी, सध्या देशात कोरोना कम्यूनिटी ट्रान्समिशन नव्हे तर लोकल ट्रान्समिशन स्टेजलाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुढे अग्रवाल म्हणाले की; सध्या अशी परिस्थिती आहे, की आम्ही कोणत्याही सरकारी कागदपत्रांवर 'कम्यूनिटी' शब्द लिहिला, की लोक त्याचा दुसराच अर्थ लावतात. आम्ही लिमिटेड कॉन्टेस्टमध्ये एका ठिकाणी कम्यूनिटी शब्दाचा प्रयोग केला आहे. मी स्पष्ट करू इच्छितो, की भारत अद्यापही लिमिटेड ट्रान्समिशन स्टेजलाच आहे. आम्हाला वाटलेच, की आपण कम्यूनिटी ट्रान्समिशनकडे जात आहोत, तर आम्ही पुन्हा दुसऱ्यांदा जनतेला आवाहन करू, की आता आणखी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप तशी परिस्थिती ओढवलेली नाही. सध्या जे नियम घालून दिले आहेत त्याचे योग्य प्रक

वीज ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा : 

वीज ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा: मुंबई : पुढील पाच वर्षांसाठी राज्यात दरवाढ होण्याऐवजी 7 ते 8 टक्क्याने वीजदर कमी करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने आज जाहीर केल्याने वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, यामुळे राज्यात उद्योगधंदे वाढीस चालना मिळेल व बेरोजगारीचा सुध्दा प्रश्न सोडवण्यास मदत होइल, अशी आशा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून विजेच्या दर वाढतच असल्याने राज्यात मोठे उद्योग येत नव्हते. दर परवडत नसल्याने राज्यातून उद्योगाचे पलायन जवळच्या राज्यात होत असल्यामुळे राज्याचा विकास मंदावला होता. त्यामुळे वीजदर कमी करण्याचा प्रयत्न यावेळी ऊर्जा विभागाकडून करण्यात आला. पहिल्यांदाच अशा प्रकारची दर कपात होत असून यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे डॉ राऊत यांनी म्हटले आहे. विजेच्या वाढत्या दरामागे विजेची गळती कारणीभूत असल्यामुळे ऊर्जा विभागाचे सूत्र हातात घेतल्यानंतर डॉ राऊत यांनी गळती कमी करण्याच्या सूचना देऊन त्वरित गळती कमी करण्याचे आदेश दिले. तसेच वीज दर वाढू नये अशी कडक भूमिका घेतली.

रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य खरेदीसाठी व्हायरल झालेला फॉर्म बनावट, अन्न-नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा:

रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य खरेदीसाठी व्हायरल झालेला फॉर्म बनावट, अन्न-नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा :  मुंबई : रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेला नाही. सध्या सोशल मीडिया आणि काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असं आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाशात म्हटलं आहे की, सोशल मीडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहे. सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न ,नागरी पुरवठा विभाग व इतर व

२५ कोटींच्या मदतीवर पत्नीने विचारला प्रश्न, अक्षय कुमार म्हणाल ; “खरंच, एवढी मोठी रक्कम द्यायचीय का.

२५ कोटींच्या मदतीवर पत्नीने विचारला प्रश्न, अक्षय कुमार म्हणाल ; “खरंच, एवढी मोठी रक्कम द्यायचीय का? अक्षय कुमार याने २५ कोटींच्या मदतीची घोषणा केल्यानंतर त्याच्या झालेल्या संवादावर पत्नी ट्विंकलनेच दिली माहिती, करोनाविरोधात लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन भारतीयांना केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना अभिनेता अक्षय कुमार याने २५ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्याची घोषणा केली आहे. ट्विटर वरुन अक्षयने ही माहिती दिली. मात्र अक्षयच्या या ट्विटवर आता त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने एक ट्विट करुन अक्षयच्या निर्णयानंतर काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली आहे. करोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. अनेक उद्योजक, खेळाडू, कलाकार आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यातच पंतप्रधानांनी आपत्ती व्यवस्थापनाची कक्षा वाढवण्यासाठी तसंच नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी संशोधनासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. त्याच ट्विटवर रिप्लाय करत मोदींनी अक्षय कुमारने २५ कोटींच्या मदतीची घोषणा केली. अक्षय कुमारने ट्विट करत आपल्या लोकांसाठ

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानद्वारा निराधारांना नित्योपयोगी वस्तूंचे वाटप : औंध, ता. खटाव, जि. सातारा.

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानद्वारा निराधारांना नित्योपयोगी वस्तूंचे वाटप : औंध, ता. खटाव, जि. सातारा. सातारा औंध ( शुभम इनामदार ) - जगभरात सध्या चर्चेचा विषय असलेल्या कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉक डाउन आणि जमावबंदी व संचारबंदी चे आदेश असल्याने सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून ज्यांचे छोटे दैनंदिन व्यवसाय बंद झाले आहेत, अशांना तसेच कित्येक निराधार व्यक्तिंना जीवनावश्यक वस्तू खरेदी करायला आर्थिक अडचणी येत आहेत. याचा विचार करून औंध येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानद्वारा अशा गरजू व्यक्तींना आणि निराधारांना नित्योपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचे नियोजन केले गेले. त्यानुसार  दिनांक ३१/०३/२०२० रोजी पंचवीस कुटुंबांना तांदूळ, रवा, बेसनपीठ, साबण, गोडेतेल, पोहे अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले. औंध पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. श्री भापकर साहेब यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.  यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. मोहन शिंदे, उपाध्यक्ष श्री. सदाशिव इंगळे, सचिव श्री. बाळकृष्ण कुंभार, खजिनदार श्री.दत्तात्रय शिंद

कोरोना महासंकट : सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का ५० ते ७५ टक्के वेतन कपात, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी वेतन माहिती दिली.

कोरोना महासंकट : सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का ५०% ते ७५% वेतन कपात ; उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी वेतन माहिती दिली. मुंबई: कोरोनामुळे राज्यापुढे आर्थिक संकट उभं आहे. तर यापूर्वीचं राज्यावर साडेचार लाख कोटी रूपयांचं कर्ज आहे. यामुळे सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा वेतन कपातीचा निर्णय घेतला असल्याचे समजते. पहिल्यांदाच मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतनिधीं सुद्धा ठरणार वेतन कपातीत, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ५० ते ७५ टक्के वेतन कपात केली जाणार आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.  'क' वर्ग श्रेणीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्के कपात केली जाणार आहे. 'अ' वर्ग श्रेणी आणि 'ब' वर्ग श्रेणीत येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वेतनात ७५ पासून ते ५० टक्क्यांपर्यंत  कपात केली जाणार आहे. तर 'ड' वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.  तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या वेतनातही ६० टक्के कपात होणार आहे.  राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिन

प्रतिरोधकतेसाठी जीवनसत्त्व "सी" पूरकतत्त्व तसेच जीवनसत्त्व "सी" चे उपयोग आणि फायदे :

प्रतिरोधकतेसाठी जीवनसत्त्व "सी" पूरकतत्त्व तसेच जीवनसत्त्व "सी" चे उपयोग आणि फायदे :  आपल्या सर्वांना माहित आहे की कोणते पदार्थ हे जीवनसत्त्व "सी" मध्ये समृद्ध आहेत, जीवनसत्त्व "सी" च्या आपण उपयोगी आणि फायद्यांचे आज चर्चा करू या. जखमेच्या उपचारांना प्रोत्साहन देते: जीवनसत्त्व "सी" हा एक उत्कृष्ट जखमेच्या उपचार एजंट आहे. हे फक्त जखमांना संसर्ग होण्यापासून रोखत नाही परंतु कमीतकमी स्काय तयार करून घाव बंद करण्यास देखील मदत करते. त्वचेसाठी चांगले:- जीवनसत्त्व "सी" सनबर्न बरे होण्यात मौखिक आणि टॉपिकल एप्लिकेशनमध्ये वापरले जाते. कोलेजन आणि एलिस्टिनच्या निर्मितीमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते जे त्वचा स्वच्छता आणि लवचिकता सुधारते. त्याच्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे, विटामिन "सी" खालच्या काळातील वृद्धी चिन्हे ठेवण्यात मदत करतो. प्रतिकारशक्ती सुधारते:- जीवनसत्त्व "सी" प्रतिजैविके विरूद्ध लढण्यासाठी प्रतिरक्षा प्रणाली पेशी उत्तेजित करते आणि ते ऑक्सीडिएटिव्ह तणाव देखील कमी करते, यामुळे आपले रोग प्रतिकारशक्ती मजबू

एप्रिलफूलच्या नावाखाली चेष्टामस्करी अथवा अफवा पसरवली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल: गृहमंत्री अनिल देशमुख.

एप्रिलफूलच्या नावाखाली चेष्टामस्करी अथवा अफवा पसरवली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल: गृहमंत्री अनिल देशमुख. मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, ‘१ एप्रिल या दिवशी सर्वजण दरवर्षी आपल्या सहकारी, मित्रांची एप्रिलफूलच्या नावाखाली चेष्टामस्करी करतात. संपूर्ण देश आणि महाराष्ट्र कोरोनाविरोधात लढत आहे आणि आता या लॉकडाऊनच्या काळात आणि अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणीही एप्रिल फूलच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे जर कोणी एप्रिल फूलच्या नावाखाली चेष्टा मस्करी केली अथवा अफवा पसरवली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. भारतात कोरोनाचे वाढते संकट आणि लॉकडाऊन यामध्ये कोणीही कोरोना संबंधित कोणत्याही प्रकारची अफवा पसरवणारे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मॅसेज टाकू नये, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. याकरिता सर्व जनतेने सहकार्य करावे. याबाबतीत जे कोणी सहकार्य करणार नाही किंवा अफवा पसरवेल. त्यांच्यावर सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असे सांगत आरोग्यमंत्र्यांनी सर्वांना सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.

एपी.एम.सी. भाजीमार्केट खारघरमध्ये स्थलांतर ; प्रशासनांनी घेतला मोठा निर्णय सिडकोने त्वरीत उपलब्ध करुन दिला भूखंड:

एपी.एम.सी. भाजीमार्केट खारघरमध्ये स्थलांतर ; प्रशासनांनी घेतला मोठा निर्णय सिडकोने त्वरीत उपलब्ध करुन दिला भूखंड: वाशीतील एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला आणि फळ मार्केट खारघरला हलवण्यात येणार आहे. खारघरच्या सेंट्रल पार्कजवळ असलेल्या मोकळ्या मैदानावर हे मार्केट तात्पुरत्या स्वरुपात हलवण्यात येणार आहे. सिडकोने ५० एकर भूखंड उपलब्ध करून दिला आहे, तसेच १ हजार चौरस फुटांचे जवळ जवळ १२०० ते १३०० गाळे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. एपीएमसी मार्केट प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वारंवार सांगून देखील एपीएमसी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने भाजीपाला आणि फळ मार्केट हलवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, बाजार समिती सचिव अनिल चव्हाण आणि एपीएमसीच्या इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये आता किरकोळ खरेदीदारांना आत सोडण्यावर बंदी घातलण्यात आली आहे. फक्त होलसेलर यांनाच आत सोडण्यात येणार आहे.

महासंकट कोरोना : शरद पवार म्हणाले काटकसर करा, वायफळ खर्च टाळा, आर्थिक संकट हे मोठं आहे.

महासंकट कोरोना : शरद पवार म्हणाले काटकसर करा, वायफळ खर्च टाळा, आर्थिक संकट हे मोठं आहे. शरद पवारांनी फेसबुकवरून लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देताना लोकांना जाणीव करून दिली आहे की राज्यावर आणि देशावर मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. त्यासाठी सरकार योग्य वेळी पावलं उचलेल, पण लोकांनी आतापासूनच काटकसरीने वागायला हवं, असा सल्ला त्यांनी दिला आहे. शरद पवार यांच्या फेसबुक लाईव्हमधले त्यांनी सांगितलेले काही ११ महत्त्वाचे मुद्दे: १} हे खूप मोठं संकट आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. सरकारी सूचनांचं तंतोतंत पालन करा. २} आजचा तातडीचा प्रश्न आरोग्याचा. 2-3 आठवड्यांनंतर आर्थिक प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागेल. उद्योगधंदे बंद ठेवल्याने अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम ३} सगळ्यांना आर्थिक परिणाम भोगावे लागू शकतील. त्यासंबंधीचे निर्णय सरकार घेईल. लोकांनी काटकसर करावी. वायफळ खर्च थांबवावा. ४} संकटकाळात दवाखाने बंद ठेवणं ही गंभीर बाब. ज्यांना वैद्यकीय ज्ञान आहे, त्या सर्वांनी (BAMS, BHMS) मदत करावी. ५} ऊसतोड कामगारांची कारखान्यावरच सोय करण्यात यावी. ६} राज्याला पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा उपलब्ध आहे. ७} कुणी साठेबाजी करत

परदेशी प्रवास करून आलेल्या डॉक्टरच्या मुलीला पडणार महाग : होम क्वारंटाइन असताना रुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी: 

परदेशी प्रवास करून आलेल्या डॉक्टरच्या मुलीला पडणार महाग : होम क्वारंटाइन असताना रुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी:  महापालिका आयुक्तांची नोटीस : नवीन पनवेल येथील मोहिते हॉस्पिटल बंद ठेवण्यासाठी. नवीन पनवेल येथील सेक्टर 19 या परिसरामध्ये लहान मुलांसाठी प्रख्यात असलेले डॉ. मोहिते यांची मुलगी कु. स्वरा मोहिते नुकत्याच अमेरिकेतून आल्याची माहिती त्यांनी महापालिकेपासून दडवून ठेवली. त्याशिवाय त्या त्यांच्या रुग्णालयात जाऊन रुग्णांणा त्या भेटून देखिल आल्या, ही माहिती हाती लागल्यावर महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दवाखाना बंद ठेवण्याचे आदेश बजावला आहे. अशी कडक तंबीची नोटीस त्यांनी बजावली आहे.  आयुक्तांच्या या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. कु. स्वरा मोहिते या नुकत्याच अमेरिकेतून आल्या नंतर पंधरा दिवस होम क्वारंटाइन असताना ही त्यांनी घरातच अलगीकरण केंद्रात राहणे आणि तसेच महापालिकेला कळविणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे न केल्याने आयुक्त देशमुख यांनी पुढे कारवाईचे पाऊल उचलले आहे. आयुक्तांच्या या दणक्याने पनवेल महापालिका क्षेत्रातील व वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खसखस पिकली आहे.

पनवेलमध्ये रस्त्यावर शुकशुकाट; पण जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मात्र गर्दी:

पनवेलमध्ये रस्त्यावर शुकशुकाट; पण जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मात्र गर्दी: पनवेल - पंतप्रधान मोदी यांनी मंगळावर मध्यरात्री पासुन संपूर्ण देशात लॉकडाऊन ची घोषणा केल्यांनतर पनवेल शहरातील रस्ते ,महामार्ग ,एसटी स्टॅन्ड, मॉल, दुकाने सर्वत्र बुधवारी सकाळ पासुन शुकशुकाट पहायला मिळाला .मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी किराणा मालाचे दुकाने ,कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाल.   जनता कर्फ्यूच्या नंतर जमाव बंदीला झुगारून मोठ्या संख्येने नागरिक ,खाजगी वाहन चालक रस्त्यावर उतरताना दिसले होते.कामोठे शहरात जमाव बंदीचा उल्लंघन केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या नंतर मात्र पंतप्रधान मोदींच्या अवाहनाला प्रतिसाद देत शहरात शुकशुकाट पसरला विशेषतः म्हणजे सायन पनवेल महामार्ग , मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ,मुंबई गोवा महामार्ग ,कळंबोली जेएनपीटी ,कळंबोली मुंब्रा महामार्ग ओस पडल्याचे निदर्शनास दिसून आले .जीवनावश्यक वस्तूंची वाहने वगळता महामार्ग ओस पडल्याचे दिसून आले. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत नागरिकांनी बाजी, फळे तसेच कडधान्य घे

अपुऱ्या पाणी-पुरवठ्यामुळे पनवेलकरांचे झाले हाल :

अपुऱ्या पाणी-पुरवठ्यामुळे पनवेलकरांचे झाले हाल : पनवेल - कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक चिंताग्रस्त होवून घरात बसले आहेत, पण तसे असताना नवीन पनवेलच्या व इतर काही भागांत घरात बसलेल्या नागरिकांना पाण्याची समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, मागील आठवड्यापासून कमी दाबाने पाणिपुरवठा होत आहे तर काही भागात पाणि वेळेनुसार सोडण्यात येत आहे. त्यामुळे पनवेलच्या काही भागातील व गावानं मध्यले नागरिक सध्या त्रस्त झाले आहेत.  नवीन पनवेल सेक्टर ६, १० आणि १९ मध्ये ही तक्रार असल्याचे नागरिकांनी सांगितले. सेक्टर १९ मध्ये राहणारे ज्ञानेश्वर पाटील यांनी सिडकोच्या पाणिपुरवठा विभागाकडे दोन दिवसांपासून तक्रार केली मात्र पाणि संध्याकाळी येईल, सकाळी येईल अशी कारणे सांगितली जात आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या शट डाऊनमुळे पाण्याचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले, सिडकोच्या पाणिपुरवठा विभागातील अभियंता राहूल सरोदे यांनी सांगितले. सेक्टर १९ मधील काही इमारतीमध्ये खासगी टँकरने पाणिपुरवठा करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. चार दिवसानंतर अखेर मंगळवारी दुपारी पाणि आले मात्र पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्यामुळे पुरेसे पाणि

“आम्ही तुमचा सांभाळ करु”, त्यांनी दिलेली प्रेमापोटीची हाक ऐकून दीडशे कुटुंब परतले:

“आम्ही तुमचा सांभाळ करु”, त्यांनी दिलेली प्रेमापोटीची हाक ऐकून दीडशे कुटुंब परतले:  आज भारतात या महाआजाराच्या संकटामुळे जगभरातील कामगार वर्ग व मजूरांचा आपल्या मायदेशी जाण्याचे चित्र अनेक ठिकाणी आपल्याला दिसत आहे, हे समजल्या नंतर वर्धा येथील ‘सचिन’ने पूढाकार घेत त्या गरीब हातावर पोट असल्या कामगारांना विनंती केल्यावर दीडशेवर परप्रांतीय गावातच थांबण्यास तयार झाले. जय महाकाली संस्थेचे सचिन अग्निहोत्री व वैद्यकीय मंचचे डॉ. सचिन पावडे या दोघांनी केलेली विनवणी प्रशासनास दिलासा देणारी ठरली. राजस्थान, मध्यप्रदेश व तेलंगणा येथील कामगार व मजूर वर्ग वर्ध्यात कार्यरत आहेत. मात्र रोजगार ठप्प पडल्याने ते परतीच्या प्रवासाला निघाले होते. प्रशासनाची विनंती त्यांनी धुडकावली. हे दीडशेवर कुटुंब रस्त्याने निघाले असतांनाच अग्निहोत्री व पावडे यांना या विषया बद्दलची माहिती मिळताच त्या लोकांनकडे धाव घेतली त्यांना समजवण्यात आले रस्त्याने जाणे धोकादायक आहे आणि हे सांगितले की तुमच्या राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. वाटेत खाण्यापिण्याचे वांदे होतील. हे संकट झेलण्यापेक्षा तुम्ही कामाशिवाय राहाल तितके दिवस आम

महासंकट कोरोना व्हायरस : “उद्धवा चांगलं तुझं सरकार” अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले कौतुक:

महासंकट कोरोना व्हायरस : “उद्धवा चांगलं तुझं सरकार” अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले कौतुक राज ठाकरे म्हणतात, करोनाचा राज्यात होत असलेल्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारनं केलेल्या उपाययोजनांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. करोनाचा राज्यात होत असलेल्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारनं केलेल्या उपाय योजनांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. यासाठी मी सरकारचं अभिनंदन करतो. उपाय योजना करायला थोडा उशीर झालाय पण सरकारनं योग्य पावलं उचलली आहेत, असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. राज म्हणाले, “यासंदर्भात काल माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय. करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण आता पुढे जाऊन देशांतर्गत विमान वाहतूकही थांबवायला हवी, अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांना केली आहे. ज्यांनी आजवर डॉक्टरांवर हात उचलले आहेत. त्यांना आता त्यांचं महत्व कळतं असेल. त्या सर्वांना जाणीव झाली असेल की आपण काय चूक केली आहे ते.” "जो बंद झाला मला अस वाटतंय की, काही मुठभर लोकांना याचं गांभीर्य अजूनही समजत न

'उद्धव ठाकरे म्हणाले", या काळाची नोंद इतिहासात होईल':

'उद्धव ठाकरे म्हणाले", या काळाची नोंद इतिहासात होईल' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाइव्हद्वारे महाराष्ट्राशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा आपल्या घरीच थांबा असं आवाहन सगळ्या जनतेला केली. तसेच जे पायी जाउन राज्य सोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना राज्य न सोडण्याचीही विनंती करण्यात आली आहे. हे आश्वासन दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही वेळातच महाराष्ट्रात २६२ केंद्रं उभी राहिल्याची माहिती ही दिली आहे. देशात चाचणी केंद्रं ही वाढवली आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढेल. ही वाढ लक्षात येतीये, पण त्याचबरोबर या विषाणूनं ग्रासलेले लोक बरेही होत आहेत, ही आशादायक गोष्ट आहे. आता न्यूमोनियाची लक्षणं वाढतील. सर्दी-खोकला किंवा न्यूमोनियाचे पेशंट आले, तर त्यांना तातडीने एक्सरे आणि हिमोग्राम करायला सांगा. आपल्याकडे काही हजार प्रवासी आले आहेत. त्यांना आपण होम क्वारंटाईनमध्ये राहायला सांगितलं. पण ते क्वारंटाईनमध्ये राहत आहेत, की नाही हे पाहणं कुटुंबीयांची तसंच नातेवाईक, शेजाऱ्यापाजाऱ्यांची जबाबदारी आहे. हाय रिस्क ग्रुप म्हणजेच गरोदर महिला, लहान मु

उध्दव ठाकरे म्हणाले, या काळाची नोंद जगाच्या इतिहासात होईल :

कोरोना व्हायरस वर बोलु काही तुमच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या : 

कोरोना व्हायरस वर बोलु काही तुमच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या : कोरोना व्हायरसचे तुमचे काही प्रश्न आहेत? कोरोना व्हायरस आता अगदी तुमच्या दारापर्यंत येऊन पोहोचला आहे. अर्थात, एकदम घाबरुन जाण्याचं कारण नाही, पण दक्षता घ्यायला हवी. कारण आता पुण्यानंतर मुंबईतही 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जगभरात 100 हून अधिक देशांमध्ये मृतांचा आकडा सध्या 27,198 वर पोहोचला आहे. त्यामुळे आता आपण खरंच सतर्क राहण्याची गरज आहे. पण काळजी घ्यायची म्हणजे काय? काय खायचं -प्यायचं? जिम करायची की नाही असे अनेक महत्त्वाचे आणि प्रॅक्टिकल प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्या प्रश्नांची थेट उत्तरं देण्याचा हा प्रयत्न. 1. कोरोना पुण्यात कसा पोहोचला? चीनमधल्या वुहानमध्ये हा विषाणू पहिल्यांदा आढळला. तिथून ज्या ज्या लोकांनी जगभरात प्रवास केला, त्यांच्याबरोबर तो त्या देशांमध्ये आधी आला. या विषाणू संसर्गाची लक्षणं ठळकपणे समोर येईपर्यंत लोकांचा जगभरात प्रवास सुरू होताच. त्यामुळे आता 100 देशांमध्ये ही साथ पसरलीये. पुण्यात सर्वांत आधी जे दोन पेशंट पॉझिटिव्ह आढळले, ते एक जोडपं असून नुकतेच ते दुबईला एका ग्रुपसोबत फिरायल

गृहमंत्री दिली खात्री: फूड डिलिव्हरी बॉईजना काम करताना कोणतीही अडचण येणार नाही.

गृहमंत्री दिली खात्री: फूड डिलिव्हरी बॉईजना काम करताना कोणतीही अडचण येणार नाही. गृहमंत्री दिली खात्री: फूड डिलिव्हरी बॉईजना काम करताना कोणतीही अडचण येणार नाही. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत लोकांना खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या फूड डिलिव्हरी बॉईजना पोलिसांचा त्रास होणार नाही. त्यांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, अशी खात्री गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पुढे देशमुख म्हणाले, “मी तुम्हाला खात्री देतो की, आपले कर्तव्य बजावणाऱ्या फूड डिलिव्हरी बॉईजना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या दुकानांच्या वेळांमध्येही कोणतेही बंधन घालण्यात आलेली नाहीत. ठराविक वेळेतच ही दुकानं बंद राहतील ही केवळ अफवा आहे, याची नोंद नागरिकांनी घ्यावी.” पुण्यात खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी सुरू करण्यात येणार आहे. खाद्यपदार्थ घरपोहोच देणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची पोलिसांसोबत गुरुवारी बैठक पार पडली. यामध्ये पुणे पोलीसांकडून डिलिव्हरी बॉईजना ओळखपत्रं देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे दिली. दरम्यान, लॉकडाऊनच

CoronaVirus नवी मुंबई : एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण; परिसरात सर्वत्र खळबळ

CoronaVirus नवी मुंबई : एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण; परिसरात सर्वत्र खळबळ  नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या 9 झाली आहे.  एकाच कुटुंबातील चौघांना करोनाची लागण झाली असून यामध्ये दीड वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे.  नवी मुंबई मधील कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. सर्वप्रथम फिलीपाईन्सवरून वाशीमध्ये आलेल्या एक व्यक्तीस कोरोना झाला. त्याच्या सोबत असलेल्या इतर दोन फिलीपाईन्स नागरिकांनाही बाधा झाली. यांच्या सोबत आलेल्या व्यक्तीलाही कोरोना झाला. या व्यक्तीसह घरातील एकूण चौघांना कोरोना झाला असून त्यामध्ये मुलगा, नोकर व दीड वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त ऐरोलीमधील एकाला कोरोना झाला आहे. शहरातील रूग्णांची संख्या 9 वर, नवी मुंबई मध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने महानगरपालिकेनेही सर्व नागरिकांना सतर्कतेचा व खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कळकळीचं आवाहन केले: कोरोना घराबाहेर आहे, त्यामुळे घरातच राहा. कोरोना गुणाकार करण्याची शक्यता, पुढील १५ दिवस महत्त्वाचे :

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कळकळीचं आवाहन केले: कोरोना घराबाहेर आहे, त्यामुळे घरातच राहा. कोरोना गुणाकार करण्याची शक्यता, पुढील १५ दिवस महत्त्वाचे  मुंबई : जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून सरकारनं धाडसी निर्णय घेतला आहे. आता जीवनावश्यक वस्तुंची दुकानं 24 तास दुकाने चालू ठेवणे हा आपल्या सरकारचा धाडसी निर्णय आहे. तुमच्या विश्वासावर हा निर्णय घेतला आहे. तसेच “भाज्यांची वाहतूक सुरु आहे. लक्षात येत आहे त्याप्रमाणे सूचना देत आहोत. शेतीविषयक मजुरांची ये जा थांबता कामा नये. अन्नधान्य पुरवठा करणारी मालवाहतूक थांबवता येणार नाही. ती चालू आहे,” असं उद्दव ठाकरेंनी सांगितलं. मात्र काही ठिकाणी काहीही कारण नसताना झुंबड उडाल्याचं कळालं. गर्दी करु नका असं आवाहन वारंवार करत आहोत”. काही गोष्टी बघून मला धक्काच बसला मात्र अद्यापही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नाही आहे अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. लोक जिथे अडकले आहेत. त्यांची व्यवस्था केली जात आहे. मात्र, काही जण ट्रक आणि टँकरमधून प्रवास करत आहे. गावी जाण्यासाठी जीव धोक्यात घालून अनधिकृत मार्गाने प्रवास करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठा

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी उपाययोजना आखण्यात आली राज्यातील दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन :

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी उपाययोजना आखण्यात आली राज्यातील दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन: कोरोना विषाणूच्या संकटकाळी राज्यातील दिव्यांग बांधवांना दिलासा देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष उपाययोजना आखण्यात आली आहे. कोरोनाच्या लढाईत सर्व दिव्यांग बांधवांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत हालचाल न करू शकणार्‍या दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन व आरोग्यविषयक किट घरपोच वाटप करण्यात येणार असून, यामध्ये धान्य, कडधान्य, डाळी, तांदूळ, तेल इत्यादी साहित्यासह सॅनिटायझर, मास्क, रुमाल, साबण, डेटॉल, फिनेल, अशा आरोग्यविषयक साहित्याचा समावेश असणार आहे. हे आरोग्यविषयक साहित्य त्या - त्या जिल्ह्याच्या स्थानिक दिव्यांग कल्याण निधीतून पुरविण्यात यावे, असेही सूचित करण्यात आले आहे. राज्य दिव्यांग कल्याण मंडळाच्या आयुक्तांनी याबाबतचे निर्देश सर्व विभागीय आयुक्तांमार्फत राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना पाठवले आहेत. इतर दिव्यांग व्यक्तींना हे साहित्य नजीकच्या रेशन दुकानातून उपलब्

राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खार्‍या पाण्यातील मासळी खुली आहे : अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खार्‍या पाण्यातील मासळी खुली आहे : अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मुंबई : आपल्या राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खार्‍या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील. जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरू ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहोचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खाद्यपदार्थ बनविणार्‍या व पोहचवणार्‍या व्यक्तींनी स्वच्छता आणि सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणार्‍या दोघांनीही करोनासंदर्भात आवश्यक ती स्वच्छता व काळजी घेणे महत्त्वाचे आहे , सुरक्षितता बाळगायची आहे. गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, असंही पवार यांनी सांगितलं. राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायोमेट्रीकसाठी तयार

राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा असणारे कोल्हापूर मधून एका तरूण उद्योजकांने होम कोरंटाईन रुग्णांसाठी दिले आपले थ्री स्टार हॉटेल:

राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा असणारे कोल्हापूर मधून एका तरूण उद्योजकांने होम कोरंटाईन रुग्णांसाठी दिले आपले थ्री स्टार हॉटेल:  कोल्हापूर : जगभर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, प्रथम लक्षण असणाऱ्या रुग्णांना शासनाने होम कॉरंटाईन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना घरात कसं ठेवायचं ? असा प्रश्न लोकान समोर निर्माण झालेला आहे. पण यावर राजर्षी शाहू महाराज यांच्या नगरीतील अर्थात कोल्हापुरातील एक तरूण उद्योजक समोर आला आहे. त्यांनी होम कॉरंटाईनची सुविधा नसणाऱ्या रुग्णांसाठी स्वतःचं थ्री स्टार कॅटेगिरीमधील हॉटेल त्या रुग्णांनसाठी खुलं केलं आहे. कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क परिसरात हॉटेल कृष्णा इन आहे. प्रसिद्ध लेखक मृत्युंजयकार रणजित देसाई यांचे ते नातू सिद्धार्थ देसाई यांनी हे हॉटेल २०१३ साली कोल्हापुरात सुरू केलं. हॉटेलच्या व्यवसायात अत्यंत कुशल पद्धतीने सिद्धार्थ चालवतात. मात्र वडील,आजोबा यांच्यापासूनचं घरामध्ये समाजकार्य करण्याची परंपरा देसाई कुटुंबीयांमध्ये आहे. आता हा वारसा सिद्धार्थ देसाई पुढे चालवत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून