Skip to main content

'उद्धव ठाकरे म्हणाले", या काळाची नोंद इतिहासात होईल':

'उद्धव ठाकरे म्हणाले", या काळाची नोंद इतिहासात होईल'



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाइव्हद्वारे महाराष्ट्राशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा आपल्या घरीच थांबा असं आवाहन सगळ्या जनतेला केली. तसेच जे पायी जाउन राज्य सोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना राज्य न सोडण्याचीही विनंती करण्यात आली आहे. हे आश्वासन दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही वेळातच महाराष्ट्रात २६२ केंद्रं उभी राहिल्याची माहिती ही दिली आहे.


देशात चाचणी केंद्रं ही वाढवली आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढेल. ही वाढ लक्षात येतीये, पण त्याचबरोबर या विषाणूनं ग्रासलेले लोक बरेही होत आहेत, ही आशादायक गोष्ट आहे. आता न्यूमोनियाची लक्षणं वाढतील. सर्दी-खोकला किंवा न्यूमोनियाचे पेशंट आले, तर त्यांना तातडीने एक्सरे आणि हिमोग्राम करायला सांगा.


आपल्याकडे काही हजार प्रवासी आले आहेत. त्यांना आपण होम क्वारंटाईनमध्ये राहायला सांगितलं. पण ते क्वारंटाईनमध्ये राहत आहेत, की नाही हे पाहणं कुटुंबीयांची तसंच नातेवाईक, शेजाऱ्यापाजाऱ्यांची जबाबदारी आहे. हाय रिस्क ग्रुप म्हणजेच गरोदर महिला, लहान मुलं, वृद्ध, मधुमेह रुग्ण, तसंच रक्तदाब असलेल्या व्यक्ती यांना अधिक जपणं गरजेचं आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात गर्दी कमी नाही झाली, तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील.
लॉक डाऊन झाल्यानंतर पाच दिवस झाले आहेत. पुढचे दिवसही असेच निघून जातील. आपल्याला आपली जीवनशैली थोडी बदलावी लागतीये इतकंच.


या काळाची नोंद जगाच्या इतिहासात होईल, कारण असा काळ जगानं पाहिला नाही.
कामगारांच्या राहण्याची, तसेच मोफत खाण्याची सोय करतोय'
उद्धव ठाकरे म्हणाले...


संपूर्ण देशात इतर राज्यातील कामगार आपापल्या राज्यात जायला उत्सुक झाले आहेत. महाराष्ट्रात असलेल्या इतर राज्यातील कामगारांनी आहे तिथंच थांबावं, अशी विनंती. कृपया गोंधळ करू नका. महाराष्ट्र सरकार तुमची काळजी घेत आहे. तसेच ठाकरे सरकारने ७० हजार पेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या सगळ्यांसाठी २६२ निवारा केंद्रं उभारण्यात आली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. महाराष्ट्रात २६२ निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये स्थलांतरिक कामगार, बेघर लोक राहू शकतात
कामगारांच्या जेवण्याची तसंच राहण्याची व्यवस्था सरकार करत आहे. त्यामुळे कुठेही जाण्याचा प्रयत्न करू नका. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यातही कामगारांची वाहतूक होता कामा नये.


काही ठिकाणी लोक आवश्यक नसताना बाहेर पडत आहेत. मी विनंती करतो, की वर्दळ करू नका. विनाकारण सरकारला कठोर पावलं टाकायला लावू नका. ही आरोग्यविषयक आणीबाणी आहे. त्यामुळे प्रत्येकानं जबाबदारीनं वागायला हवं.


शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने दहा रुपयांऐवजी पाच रुपयांना मिळेल. सरकार तुम्हाला मदत करत आहे. तुम्हीही सरकारला पूर्ण सहकार्य करावं.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्याला संदेश: 
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याला उद्देशून भाषण करत आहेत. ओढवलेल्या आरोग्य संकटात सर्वपक्षीय पाठिंबा मिळत असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांसह सर्वांचे आभार मानले.


मुख्यमंत्री यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे -
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील सर्व नेते माझ्यासोबत
आहेत. विरोधी पक्षनेत्यांशीही मी चर्चा करत आहे. राज ठाकरे यांच्या सोबतही माझं बोलणं सुरू आहे. सर्वच क्षेत्रातून लोक पुढे येत आहेत मदतीसाठी. मुख्यमंत्री निधीसाठी उदय कोटक यांनी 10 कोटी रुपयांची मदत केली. त्या सर्वांचे मी आभार मानतो. केंद्राशीही आमचा संपर्क आहे. पंतप्रधान, अमित शाह यांच्याशी मी संवाद साधत आहे. केंद्राच्या योजनाही तुमच्यापर्यंत पोहोचतील. डॉक्टरांशी बोलणे चालु आहेत.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे