Skip to main content

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या मतदारसंघातून आणखी एक दिलासादायक बातमी : 

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या मतदारसंघातून आणखी एक दिलासादायक बातमी :



(कोरोना महासंकट) : जिवघेण्या कोरोना व्हायरसवर अद्यापही औषध अजुन सापडलेले नाहीय. तसेच परदेशी किटवर अवलंबून राहिल्याने कोरोनाबाधित असल्याचे चाचणीचे निकालही विलंबाने मिळत आहेत. पुण्यातील डॉक्टर महिलेने दोन-अडीज तासांत कोरोनाची चाचणी करणारे किट बनविले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघातून आणखी एक दिलासादायक बातमी आली आहे. तेथील महिला वैज्ञानिकांनी केवळ तासाभरात कोरोनाची टेस्ट करणारे किट बनविले आहे. 


महत्वाचे म्हणजे या किटचा खर्च परदेशी किटपेक्षा निम्म्याने कमी होणार आहे. वारणसीतील काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या तीन महिला संशोधकांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे किट बनविले आहे. भारतीय पेटंट कार्यालयानेही तेवढ्याच तत्परतेने २४ तासांत या किटचा पेटंट बनविण्यास मान्यताही दिली आहे. यामुळे हे किट लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. याबाबतच महिती दिल्ली वृतामधून मिळाली आहे.



बीएचयूच्या वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (आयएमएस) आण्विक आणि मानवी जनुकीयशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका गीता राय यांनी आपल्या प्रयोगशाळेत संशोधक विद्यार्थ्यांच्या मदतीने कोविड -१९ चे १००% अचूक निकाल देणारे तंत्र विकसित केले आहे. हे तंत्र कोरोना विषाणूच्या प्रथिनांच्या रचनेवर आधारित आहे. देशात विकसित झालेली ही अशा प्रकारची पहिली किट आहे. या तंत्राने लहान पीसीआर मशीनमधून चुकीचा अहवाल येऊ शकत नाही. या संशोधनामध्ये डॉली दास, खुशबू प्रिया आणि हीरल ठक्‍कर यांनीही मदत केलेली आहे, राय यांनी या किटच्या उत्पादनासाठी मेडिकल कंपन्यांनी पुढाकार घेण्याची विनंती केलेली आहे. तसेच त्यांनी आठवडाभरात पेटंट मिळणार असल्याचेही म्हटले आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या काही संशोधन संस्थांसोबतही चर्चा केली असून त्यांचीही मदत मागण्यात आली आहे. 


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे