Skip to main content

२५ कोटींच्या मदतीवर पत्नीने विचारला प्रश्न, अक्षय कुमार म्हणाल ; “खरंच, एवढी मोठी रक्कम द्यायचीय का.

२५ कोटींच्या मदतीवर पत्नीने विचारला प्रश्न, अक्षय कुमार म्हणाल ; “खरंच, एवढी मोठी रक्कम द्यायचीय का?



अक्षय कुमार याने २५ कोटींच्या मदतीची घोषणा केल्यानंतर त्याच्या झालेल्या संवादावर पत्नी ट्विंकलनेच दिली माहिती,
करोनाविरोधात लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन भारतीयांना केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना अभिनेता अक्षय कुमार याने २५ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्याची घोषणा केली आहे. ट्विटर वरुन अक्षयने ही माहिती दिली. मात्र अक्षयच्या या ट्विटवर आता त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने एक ट्विट करुन अक्षयच्या निर्णयानंतर काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली आहे.


करोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. अनेक उद्योजक, खेळाडू, कलाकार आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यातच पंतप्रधानांनी आपत्ती व्यवस्थापनाची कक्षा वाढवण्यासाठी तसंच नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी संशोधनासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. त्याच ट्विटवर रिप्लाय करत मोदींनी अक्षय कुमारने २५ कोटींच्या मदतीची घोषणा केली.


अक्षय कुमारने ट्विट करत आपल्या लोकांसाठी मदत करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं म्हटलं आहे. “हाच तो वेळ आहे जेव्हा आपल्या लोकांच्या जीवापेक्षा इतर काहीही महत्वाचं नसतं. त्यामुळेच  यासाठी जे काही गरजेचं आहे ते सगळं आपण केले पाहिजे. मी माझ्याकडील २५ कोटी रुपये पंतप्रधान केअर फंडसाठी देत आहे. चला आयुष्य वाचवू… जीव आहे तर सर्व काही आहे,” असं अक्षयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
अक्षयने आपल्या बचत खात्यांमधून २५ कोटी देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याच संदर्भात ट्विंकलने एक ट्विट करत अक्षयने घेतलेल्या या निर्णयानंतर काय चर्चा झाली याबद्दल माहिती दिली आहे.


अक्षयने २५ कोटी इतकी मोठी रक्कम देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपण त्याला एक प्रश्न विचारल्याचं ट्विंकलने ट्विटमध्ये सांगितलं. “या माणसाचा मला अभिमान आहे. एवढी मोठी रक्कम द्यायची आहे याबद्दल तुला खात्री आहे ना? कारण ती देण्यासाठी आपल्याला गुंतवणूक मोडावी लागेल असं ह मी त्याला विचारलं. त्यावर तो म्हणाला, मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. आज मी ज्या ठिकाणी आहे त्याचा विचार करता ज्या लोकांकडे काहीही नाही अशांना मदत करण्यापासून मी कसं मागे हटू,” असं ट्विट ट्विंकलने केलं आहे.


फक्त अक्षय कुमारच नाही तर अनेक सेलिब्रेटी आणि उद्योगपती मदतीसाठी पुढे येत आहेत. मदतीसाठी हृतिक रोशन आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांनीदेखील पुढाकार घेतला आहे. . हृतिक रोशनने मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी एन-95 आणि एफएफपी-3 मास्क खरेदी केले आहेत. तर कपिल शर्माने पंतप्रधान मदत निधीमध्ये ५० लाख रुपयांची रक्कम दान केल्याची माहिती दिली आहे. करोना रुग्णांच्या उपचारासाठी अभिनेता प्रभासने तब्बल ४ कोटी रुपयांच्या आर्थिक मदत केली आहे. प्रभासने ४ कोटी रुपयांपैकी ३ कोटी रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीच्या माध्यमातून दिले आहेत. तर उर्वरित ५०-५० लाख रुपये अनुक्रमे आंध्र प्रदेश आणि तेलंगना राज्याच्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी दिले आहेत. दरम्यान, प्रभासप्रमाणेच दाक्षिणात्य कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. पवन कल्याण, रामचरण,चिरंजीवी, महेश बाबू या कलाकारांनी आर्थिक मदत केली आहे. पवन कल्याण यांनी २ कोटी रुपये मदतनिधी म्हणून दिले असून महेश बाबूने १ कोटी रुपयांची मदत केली आहे.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे