परदेशी प्रवास करून आलेल्या डॉक्टरच्या मुलीला पडणार महाग : होम क्वारंटाइन असताना रुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी:
परदेशी प्रवास करून आलेल्या डॉक्टरच्या मुलीला पडणार महाग : होम क्वारंटाइन असताना रुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी:
महापालिका आयुक्तांची नोटीस : नवीन पनवेल येथील मोहिते हॉस्पिटल बंद ठेवण्यासाठी.
नवीन पनवेल येथील सेक्टर 19 या परिसरामध्ये लहान मुलांसाठी प्रख्यात असलेले डॉ. मोहिते यांची मुलगी कु. स्वरा मोहिते नुकत्याच अमेरिकेतून आल्याची माहिती त्यांनी महापालिकेपासून दडवून ठेवली. त्याशिवाय त्या त्यांच्या रुग्णालयात जाऊन रुग्णांणा त्या भेटून देखिल आल्या, ही माहिती हाती लागल्यावर महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दवाखाना बंद ठेवण्याचे आदेश बजावला आहे. अशी कडक तंबीची नोटीस त्यांनी बजावली आहे.
आयुक्तांच्या या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
कु. स्वरा मोहिते या नुकत्याच अमेरिकेतून आल्या नंतर पंधरा दिवस होम क्वारंटाइन असताना ही त्यांनी घरातच अलगीकरण केंद्रात राहणे आणि तसेच महापालिकेला कळविणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे न केल्याने आयुक्त देशमुख यांनी पुढे कारवाईचे पाऊल उचलले आहे. आयुक्तांच्या या दणक्याने पनवेल महापालिका क्षेत्रातील व वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खसखस पिकली आहे.