Skip to main content

कोरोना महासंकट : नेरूळ मधील डी वाय पाटिल रुग्णालयातील पन्नास मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली :  

कोरोना महासंकट : नेरूळ मधील डी वाय पाटिल रुग्णालयातील पन्नास मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली : 


नवी मुंबई डी वाय पाटील रुग्णालयात एक्सिमिस प्रायवेट लिमिटेडच्या ५० कामगारांना बेकायदेशीर कामावरून कमी केले आहे, नवी मुंबई महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री अप्पासाहेब कोठुळे यांचा कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हाती घेतला लढा.



नवी मुंबई (बातमी) : नवी मुंबईच्या नेरूळ येथील डी वाय पाटिल रुग्णालयातील एक्सीमिस प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट दाराच्या अंतर्गत काम करणारे जवळपास ५० मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या कंपनीच्या मुजोरे पणाचा कळसच झाला आता, कोरोनाच्या पाश्वभुमीवर आज देशात भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आता यातच ५० कामगारांना बेकायदेशीर कामावरून कमी केले आहे.


डी वाय पाटील रुग्णालयात एक्सिमिस प्रायवेट लिमिटेड या कंत्राट दाराचे कंत्राट असून त्यात सुमारे २२० कामगार काम करतात. 



सदर कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्विकारल्यामुळे सदर कंत्राटदाराने सुमारे ५० कामगारांना दिनांक २३ मार्च २०२० पासून संघटना मोड़ित काढण्यासाठी काम न देता नोटिस फलकावर सूचना लावली की कामावर गैरहजर किंवा बेकायदेशीर संप केलेल्या कामगारांचे पगार कपात करुन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले जातील असे शब्द वापरून, (कोविड -19) करोना विषाणू च्या या माहामारीच्या संकटात सापडलेल्या कामगारांची एक प्रकारे कुचेष्टा केल्या सारखे झाले आहे.




सदर बाब कामगारांनी नवी मुंबई महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री अप्पासाहेब कोठुळे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांच्या सहकार्याने ही बाब कामगार मंत्री श्री दिलीप वळसे पाटिल ,कामगार उपायुक्त श्री भोसले , सहाय्यक आयुक्त श्री राजेश आड़े तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक नेरूळ यांना पत्रव्यवहार करुन कळवली आहे.


 


डी वाय पाटील हस्पिटलचा मुजोर कंत्राटदार अजूनही कामगारांना कामावर घेत नाही, सर्व कामगार आता न्यायाच्या प्रतीक्षेत वाट पहात आहेत. यासाठी नवी मुंबई महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री अप्पासाहेब कोठुळे हे आता कामगारांसाठी कोरोनाच्या या संकटकाळातही मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे