करोना महासंकट : तळोजा परीसरात फिरत्या वैद्यकीय सेवा ; ईशान्य फाऊंडेशनच्यातर्फे..!!
ईशान्य फाऊंडेशनच्या वतीने तळोजा परीसरात फिरत्या दवाखाण्याची वैद्यकीय सेवा सुरू केले आहे.
तळोजा : दीपक फर्टीलायझर्स ॲन्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) यांचा सीएसआर विभाग असलेल्या ईशान्य फाउंडेशनच्या मार्फत ऑक्टोबर २०१९ तळोजा परीसरात फिरता दवाखाना उपक्रम सुरू असून या माध्यमातून या भागातील सुमारे २२ गावांना आरोग्य सेवा पुरवली जात आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत साधारणता ६२२८ रुग्णांची तपासणी तसेच मोफत औषधे देण्यात आली आहेत.
सध्या देशभरात लॉकडाउन असल्यामुळे रुग्णांना बाहेर उपचारासाठी जाणेही आता अवघड झाले असल्याने लहान मुले, वृद्ध तसेच महिला रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत या फिरत्या दवाखान्यांमार्फत मोफत आरोग्य तपासणी व औषधं दिली जात आहेत. या फिरत्या दवाखान्यामध्ये एक डॉक्टर, नर्स तसेच वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश असून यांच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना रोगाविषयी माहिती देऊन योग्य काळजी घेण्याचे आवाहन करून जनजागृती देखील करण्यात येत आहे.
सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत व्हावी, यासाठी आम्ही मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया डीएफपीसीएलच्या(DFPCL) संचालक आणि ईशान्य फाऊंडेशनच्या पारूल एस. मेहता यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अशा उपक्रमांसाठी पुढाकार घेणाऱ्या आणि पाठिंबा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि प्रशासनाचे आभार मानत सर्व ग्रामस्थांना आपल्या घरीच राहा, विनाकारण घरा बाहेर पडू नका व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी जनतेला केले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.