Skip to main content

कोरोना महासंकट : पनवेलमधील कोरोना विषाणूचे २९ रूग्ण झाले बरे; पण काही क्षेत्रामध्ये कोरोनाच्या नवीन रूग्णांची भर : 

कोरोना महासंकट : पनवेलमधील कोरोना विषाणूचे २९ रूग्ण झाले बरे; पण काही क्षेत्रामध्ये कोरोनाच्या नवीन रूग्णांची भर :


कळंबोली, नवीन पनवेल, उलवे येथे आढळले कोरोनाचे नवीन रूग्ण, तर आतापर्यंत पनवेलमधील २९ रूग्ण बरे देखील झाले.



पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत २ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. कळंबोली L.I.G. कॉलनी येथील ३९ वर्षीय १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह अढळली असून ही व्यक्ती मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणी या रूग्णाला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय नविन पनवेल सेक्टर-६ येथील ५१ वर्षीय व्यक्तीला देखील कोरोनाची लागण झाली असून ही व्यक्ती आर्मी रिटायर्ड असून नवीन पनवेलमधील पॅनेसिया हॉस्पिटल येथे गेल्यामुळे संक्रमण झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच उलवे येथील सेक्टर-१० बी येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून सदर महिला सायन हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासा दरम्यान कोरोनाचा संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.




दरम्यान, पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४ तर उर्वरित ग्रामीण भागातील ५ रूग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील आज ३ कोरोनाबधित रूग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये तळोजा फेज-१ येथील २७ वर्षीय व्यक्ती, कळंबोली येथील ६८ वर्षीय महिला आणि खारघरमधील ३६ वर्षीय व्यक्ती पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोना विषाणूच्या ३२ ॲक्टीव्ह केसेस आहेत, परंतु दिलासादायक बातमी म्हणजे २४ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे