कोरोना महासंकट : महाराष्ट्रातला खाकी वर्दीतल्या माणूस तुमच्या आमच्यासाठी लढत आहे ; पण स्वत: च्या कुटुंबावर दुखाचा डोंगर...!!!
कोरोना महासंकट : महाराष्ट्रातला खाकी वर्दीतल्या माणूस तुमच्या आमच्यासाठी लढत आहे ; पण स्वत: च्या कुटुंबावर दुखाचा डोंगर...!!!
रस्त्यावर तैनात असलेल्या खाकी वर्दीतला माणूस तुम्हाला आम्हाला वाचवू शकला. परंतु, स्वत: च्या कुटुंबातील सदस्याला वाचवण्यात अपयशी ठरला.
नवी मुंबई : महाराष्ट्रासमोर कोरोना विषाणूचे संकट समोर आ... वासून उभे आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या भीषण परिस्थितीत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस दल जीवाची बाजी लावून आपले कर्तृत्व बजावत आहे. परंतु, नवी मुंबईतून महाराष्ट्राला हादरावून सोडणारी बातमी समोर आली असून एका पोलीस कॉन्स्टेबलच्या घरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे तर आणखी २ जण रुग्णालयात झुंज देत आहे. या बातमीने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
रस्त्यावर तैनात असलेल्या खाक्या वर्दीतल्या माणूस तुम्हाला आम्हाला वाचवू शकला. परंतु, स्वत: च्या कुटुंबातील सदस्याला वाचवण्यात अपयशी ठरला आहे. नवी मुंबईत एका हेड कॉन्स्टेबलला कोरोना विषाणूची लागण झाली होती. पण कोरोना नावाच्या या शत्रूने त्यांच्या घरातही देखील प्रवेश केला. त्यांच्या कुटुंबातील घरातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली. यामध्ये त्यांची पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. आज या तिघांपैकी कॉन्स्टेबलच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित हेड कॉन्स्टेबल हे नवी मुंबई पोलीस मुख्यालयात कर्तृव्यावर होते. त्याच दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना लागण झाल्यानंतर कुटुंबातील ४ सदस्यांपैकी त्यांचा मुलगा आणि पत्नीलाही लागण झाली. तिघांनाही नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल केलं आहे. आज उपचारादरम्यान, त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. तर मुलीची आज कोरोनाची चाचणी होणार आहे.
पत्नीच्या मृत्यूमुळे पोलीस कॉन्स्टेबलच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे या कुटुंबातील आणखी २ सदस्य रुग्णालयात लढा देत आहे.
दरम्यान, २५ एप्रिल रोजी मुंबईत कोरोनामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. मुंबईत पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
मृत पोलीस कॉन्स्टेबल ५७ वर्षांचा असून वाकोला पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मृत कॉन्स्टेबलच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. दरम्यान, मुंबईत वाकोलासह परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत ९६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ९६ पोलिसांत १५ अधिकाऱ्यांचा आणि ८१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.