Skip to main content

कोरोना महासंकट :  नवी मुंबईमधील ४ विभाग रेड झोनमध्ये : 

कोरोना महासंकट :  नवी मुंबईमधील ४ विभाग रेड झोनमध्ये :


नवी मुंबईमध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला.



नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शहरात आतापर्यंत १०८ रुग्ण आढळले आहेत. आठपैकी ४ विभाग कार्यालय परिसर रेड झोनमध्ये असून सर्वाधिक २२ रुग्ण वाशीत आढळले आहेत. नवी मुंबईमध्ये मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. फिलिपाइन्सवरून आलेल्या विदेशी नागरिकाला कोरोनाची लागण झाली. त्याचे सहकारी व सानिध्यात आलेल्या नागरिकासही कोरोना झाला. एक महिना रुग्ण वाढीचा वेग कमी होता; परंतु गेल्या आठवडाभरात रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत आहे.



शनिवारी ५ नवीन रुग्ण आढळले असून कोपरखैरणेत २, वाशी, तुर्भे व घणसोलीत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत कोपरखैरणेमध्ये २०, बेलापूरमध्ये १८ व नेरुळमध्ये १६ रुग्ण आढळले आहेत. ऐरोलीमध्ये १२, तुर्भेत ९, घणसोलीत ८ व दिघ्यात ३ रुग्ण आढळले आहेत. महापालिकेने २४ ठिकाणी कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत.



नवी मुंबईमधील वाढते रुग्ण चिंतेची गोष्ट बनली आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, परिचारिका यांना प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अत्यावश्यक सेवेतील अनेकांना लागण झाली आहे. महानगरपालिकेने संपर्क नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचेही कोविड-१९ मध्ये रूपांतर केले आहे. फ्ल्यू क्लिनीक सुरू केले आहेत. रुग्ण सापडलेल्या परिसराचे नियमित सर्वेक्षण केले जात आहे.



तसेच पोलिसांनीही लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे; परंतु यानंतरही अनेक नागरिक लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत असून त्यामुळेच करोनचा संपर्क नियंत्रणात आणण्यात अपयश येऊ लागले आहे.



>१११६ चाचण्या निगेटिव्ह :
महापालिका क्षेत्रात दीड महिन्यांत तब्बल १,८१२ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १,११६ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. अद्याप ५८८ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.



>२७ रुग्ण कोरोनामुक्त :
नवी मुंबईमध्ये आतापर्यंत २७ जणांना कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे. घणसोलीमधील कोरोना झालेल्या महिलेची सुरक्षितपणे प्रसूती करण्यात व दोघांचाही जीव वाचविण्यात यश आले आहे.



>झोपडपट्टीतही आढळले करोना रुग्ण :
दिघा ते बेलापूर दरम्यान ५० पेक्षा जास्त ठिकाणी झोपडपट्टी आहे. दोन दिवसापूर्वी नेरुळ शिवाजीनगर झोपडपट्टीत, तर शनिवारी इंदिरानगर झोपडपट्टीत कोरोना रुग्ण सापडला आहे.


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.
  


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे