Skip to main content

कोरोना महासंकट : मुख्या प्राण्यांनवरही उपासमारी; पण बेलापुर येथील शर्मा कुटुंबानी दिला मदतीचा हात: 

कोरोना महासंकट : मुख्या प्राण्यांनवरही उपासमारी; पण बेलापुर येथील शर्मा कुटुंबानी दिला मदतीचा हात: 


पण अनेक समाजसेवी व भावनात्मक माणसं मुख्या प्राण्यांना जवळ करतायत तर काही आसरा देखील देतायत.



नवी मुंबई : कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ९०० हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. अनेक जण आता भीतीच्या सावटाखाली जगत आहेत, कोरोना विषाणूचा फटका आता प्राण्यांनाही बसू लागला आहे. भारतामध्ये बेरेच कुत्री, मांजरी रस्त्यावर सोडून दिले आहेत आणि काहीतर जन्मता रस्त्यावरच राहत आहेत.


आजची उद्योग नगरी वेब न्यूज़ ला माहिती मिळाली की नवी मुंबई बेलापुर शहरातील सेक्टर ८ मधील अशाच एका स्वयंसेवी जोडप्यांनी श्री. संदीप शर्मा व सौ. नीता शर्मा यांनी मुख्या प्राण्यांना दिला मदतीचा हात.


तसेच या दोघांनी संगितले की, लॉकडाउन झाल्यापासून आणि त्याआधीही पासुनच "आम्ही अनेक भटक्या व सोडलेल्या कुत्र्यांची दररोज अन्न देत आहोत, यातले काही कुत्रे लोकांनी सोडून दिलेले पण असतिल."


बेलापुर येथील व त्यांच्या अपार्टमेंटमध्ये तसेच बेलापुर सेक्टर - १,२, ८, या भागातील ७० कुत्र्यांना दररोज ते कुटुंब २० किलो चिकन वाफवून त्या मुख्या प्राण्यांना खाण्यास देत आहेत तेही स्वताच्या स्वखर्चाने.



"पण इथं लॉक डाउनमुळे खूपच बिकट परिस्थिती झाली आहे. लोकांना बाहेरही पडू दिलं जात नाहीय. प्राण्यांसाठीचे दुकानातले खाद्यपदार्थ संपण्याची भिती देखील लोकांना वाटु लागली आहे. 


कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यामुळे आज जगभरात परिस्थिती खुप भयानक झालीय, माणसां प्रमाणे आज अनेक मुख्या प्राण्यांनवर देखील उपासमारीची वेळ आली आहे, तसेच अनेक पाळीव प्राणी उपासमारीमुळं मृत्युमुखी देखील पडत आहेत. पण काही मुख्या प्राण्यांपर्यांतच आम्ही पोहोचू शकतोय. आम्ही याहून अधिक काही करूही शकत नाही, मात्र जेवढं शक्य आहे, तेवढं आम्ही नक्कीच करू," असंही श्री व सौ. शर्मा म्हणाले, त्यांच्या डोळ्यांमधली संवेदनशीलता आणि प्राण्यांनप्रती असलेला जिव्हाळ दिसून येत होता.



आज लॉक डाउनमुळे सर्व दुकानं बंद असल्यानं कुत्र्यांना खाण्यासाठी काही मिळत नाहीय. मांजरी आणि कुत्री रस्त्यावर फिरताना, भुंकताना दिसणं आता हे सामान्य होऊन गेलंय," असं ही त्यांनी सांगितले. खरतर पाळीव प्राण्यांना वाचवण्यासाठी लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. लोकांचा सहभाग खरंच मुख्या प्राण्यांना सुखावणारा असेल. 


आपल्या देशात बरीच लोकही मुख्या पाळीव प्राण्यांना वाचवण्यासाठी पुढे येत आहेतच असेही त्या सांगत होत्या.


 


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे