Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

कोरोना महासंकट : पनवेल ओरियन मॉल मध्ये कापडाचे दुकान चालू ठेवून पालिकेच्या नियमाचे उल्लंघन :

कोरोना महासंकट : पनवेल ओरियन मॉल मध्ये कापडाचे दुकान चालू ठेवून पालिकेच्या नियमाचे उल्लंघन : पनवेल ओरियन मॉल मध्ये शुक्रवारी दुकान सुरु करण्यास परवनागी नसताना कापडाचे दुकान चालू ठेवून मनपाने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल (बातमी किरण पवार) : पालिका आयुक्तांच्या आदेशाने लाॅकडाऊनच्या कालावधीत काही दुकाने विशिष्ट दिवशी उघडण्याची काही अटींवर परवानगी दिली गेली होती. कोरोना विषाणूचा प्रकोप कमी व्हावा यासाठी लाॅकडाऊन देखील वाढविण्यात आलेला आहे. परंतु दैनंदिन जीवनदेखील त्यामुळे प्रभावित होत आहे. यासाठी शासनाने काही बाबतीत सवलती देण्याचा अधिकार त्या त्या स्थानिक प्राधिकाऱ्यांना दिलेला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त हे सक्षम अधिकारी आहेत. त्यानुसार एकल दुकानांना विशिष्ट दिवशी उघडण्यास परवानगी दिली होती. परंतु याकडे दुर्लक्ष करून काही दुकानदार वैयक्तिक फायद्यासाठी कायद्याचा भंग करताना दिसुन आले. पनवेल येथील ओरियन मॉल मध्ये शुक्रवारी दुकान सुरु करण्यास परवनागी नसताना कापडाचे दुकान चालू ठेवून मनपाने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले असल्य

कोरोना महासंकट : देशाचे गृहमंत्री अमित शहांना लॉकडाउन मध्ये कुठे पाहिले आहे का..!! शिवसेना नेते संजय राऊत यांचा सवाल :

कोरोना महासंकट : देशाचे गृहमंत्री अमित शहांना लॉकडाउन मध्ये कुठे पाहिले आहे का..!! शिवसेना नेते संजय राऊत यांचा सवाल :  गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार अस्थिर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहांना बाहेर फिरताना पाहिलंय का कोणी? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.  नवी मुंबई : बुधवारी महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तरं दिली. इतके दिवस ते आरोप करतायेत तेव्हा कोणीही त्याला उत्तरं द्यायला समोर आलं नाही. मग आता का देवेंद्र फडणवीस जे बोलतायेत ते लोकांना पटू लागलंय ही भीती सरकारला वाटतेय का? अशी काही भीती वगैरे वाटत नाही. महाराष्ट्र एका संकटातून जात आहे. सरकार कोणाचही असो, महाराष्ट्र आपल्या सर्वांचा आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांना समजलं पाहिजे. अशा संकटात सरकारच्या खांद्याला खांदा लावून विरोधी पक्षांनीही काम केलं पाहिजे.

कोरोना महासंकट :सीएसआयआर’चा करार रिलायन्स बरोबर ; कोविड -१९ ची चाचणी २०० मध्ये तसेच तासाभरात अहवाल: 

कोरोना महासंकट :सीएसआयआर’चा करार रिलायन्स बरोबर ; कोविड -१९ ची चाचणी २०० मध्ये तसेच तासाभरात अहवाल:  नवी मुंबई (बातमी उमेश खांदेकर) : आज देशभरात करोना विषाणूचा प्रसार अजूनही थांबल्याचे चिन्ह दिसत नाहीत. दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये करोना विषाणूचा प्रसार होतच असून, चाचणी करणं सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारं नाही. करोनाच्या चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये ४५०० शुल्क आकारलं जातं. मात्र, आता लवकरच कमी पैशात करोनाचं निदान करणं आता शक्य होणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) रिलायन्सच्या मदतीनं करोनाचं निदान करणारी किट विकसित करणार आहे. यासाठी दोघांमध्ये तसा करारही झाला आहे. करोना विषाणूचं चाचणीच निदान करणाऱ्या आरटी-लॅम्प कोविड-१९ टेस्ट किटविषयी (Reverse Transcriptase- loop Mediated Isothermal Amplification) परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे यांनी ‘एएनआय’ला माहिती दिली. “कोविड-१९ आरटी-लॅम्प चाचणी न्यु.क्लिक अॅसिड आधारित आहे. रुग्णांच्या घशातील अथवा नाकातील स्वॅबचा नमुना घेऊन ही चाचणी केली जाते. कृत्रिम टेम्प्लेटचा वापर करून ही चाचणी विकसित करण्यात आली आहे आणि तिचं प

कोरोना महासंकट : कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांच्या १४७ इमारती पनवेल मध्ये सील केल्या आहेत : 

कोरोना महासंकट : कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांच्या १४७ इमारती पनवेल मध्ये सील केल्या आहेत :  पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ मे पर्यंत ४१९ वर गेला आहे. पनवेल : पनवेल परिसरासह सिडको वसाहतीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे. विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे. महापालिकाकडून आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांच्या १४७ इमारती सील करण्यात आल्या आहेत. इमारत परिसरात नियमाचे पालन करून २८ दिवसांचा कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूबाधितांचा आकडा २७ मेपर्यंत ४१९ वर गेला आहे. यातून २५२ जण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. उर्वरित १४८ जणांवर उपजिल्हा रुग्णालय आणि एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पनवेल परिसरासह कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल, तळोजा परिसरात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणातआहे. खारघर येथेही कोरोनाबधित रुग्णसंख्या अधिक आहे. कामोठे येथे कोरोनाबा

कोरोना महासंकट : पनवेल येथे लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करण्याचे चित्र दिसून आले ..!!!!

कोरोना महासंकट : पनवेल येथे लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करण्याचे चित्र दिसून आले ..!!!! पनवेल : रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे दिवसागणिक कोरोना विषाणूबाधित रुग्ण सापडत आहेत. कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या वाढत असल्याने नगरपालिकेने लक्षात घेता पनवेल शहरात कडक लॉकडाऊनची गरज आहे. मात्र, पनवेल मध्ये लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करण्यात येत असल्याचे चित्र समोर दिसून येत आहे. नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे. मात्र, भाजपचा काहीही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर वाहनांची गर्दी, नागरिकांची गर्दी हे पाहून कोरोना विषाणू हा अधिक फैलाव करु शकतो, अशी परिस्थिती समोर दिसत आहे. पनवेल मधील लॉकडाऊन उठला का..?? आता असाही शंकेचा सवाल मनात उपस्थित करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे दिवसागणिक कोरोना विषाणूबाधित रुग्ण हे सापडत आहेत. याआधी मिरची गल्लीतही अशीच नागरिकांची गर्दी दिसून आली होती. त्यावेळी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली होती. तर काही ठिकाणी आजही पनवेल येथे लॉकडाऊनच्या नियमांचा फज्जा उडताना दिसत आहे.     महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित र

कोरोना महासंकट : लॉकडाउन हा शब्द म्हणण्यापेक्षा स्वतः लॉक सोबत घेऊन फिरा,” असं आपल्याला म्हणावं लागणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : 

कोरोना महासंकट : लॉकडाउन हा शब्द म्हणण्यापेक्षा स्वतः लॉक सोबत घेऊन फिरा,” असं आपल्याला म्हणावं लागणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे :  केंद्रानं लॉकडाउन जाहीर करण्याआधीच राज्य सरकारनं एक एक गोष्ट बंद करायला सुरूवात केली होती. नवी मुंबई : देशात २१ मार्च पासून देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. आता त्यानंतर तब्बल ३ वेळा लॉकडाउनला केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली. ४ थ्या टप्प्यातील लॉकडाउन ३१ मे दिवशी संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार लॉकडाउनबद्दल काय निर्णय घेणार याच्याकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष्य लागले आहेत. १ जूनपासून लॉकडाउन हटवणार की, आणखी शिथिलता देऊन कायम ठेवणार, १ जूननंतर महाराष्ट्र कसा असेल? या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. महाराष्ट्राचा’ वेबसंवाद कार्यक्रमाच्या वेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्वांगीण परिस्थितीवर भाष्य केलं. मुख्यमंत्री म्हणाले,”करोनाबरोबर जगायला शिका हे म्हणणं ही आपली अपरिहार्यता आहे. त्यामुळे लॉकडाउन हा शब्द वापरणं आता बंद करायला हवं. करोनानंतरचं जग बदलेलं असेल

कोरोना महासंकट : तब्बल नऊ वर्षा नंतर गायब झालेले जहाज परत किनाऱ्यावर आले, बघुन झाले हैरान..!!!

कोरोना महासंकट : तब्बल नऊ वर्षा नंतर गायब झालेले जहाज परत किनाऱ्यावर आले, बघुन झाले हैरान..!!! नवी मुंबई : इंडियन ओशनमध्ये म्यानमारजवळ एक विचित्र घटना गेल्या आठवड्यात घडली, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. येथील सी गार्ड्सना एक असे जहाज जे समुद्रात आढळले आहे, जे सुमारे नऊ वर्षांपूर्वी अचानक गायब झाले होते. म्यानमारजवळ आढळून आलेल्या या जहाजाची जेव्हा कोस्ट गार्ड्सनी तपासणी केली, तेव्हा त्यामध्ये एकही वस्तू किंवा त्यातला कोणी चालक दलातील एकही सदस्य नव्हता. या जहाजावरुन जगभरात चर्चा सुरु होत असून लोक याला घोस्ट शिप (भूतांचे जहाज) असे म्हणत आहेत.  या जहाजाचे नाव सैम रताउलांगी पीबी १६०० आहे. हे जहाजच्या ट्रान्सपोंडरने २००९ मध्ये अखेरचे तायवाननजीक असल्याची माहिती दिली होती. म्यानमारच्या सुमद्राजवळ असे बेवारस जहाज आढळल्याची ही पहिलीच घटना आहे.  म्यानमारची राजधानीजवळून ११ किलोमीटर अंतरावर मर्तबानच्या खाडीजवळ मच्छीमाचारांना हे जहाज सर्वप्रथम दिसले. यांगना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकारी आणि गार्ड्स या जहाजावर तपासणीसाठी गेले होते, पण त्यांना तेथे काहीही आढळले नाही. जहाजाला जंग लागला ह

कोरोना महासंकट : मुंबई महापालिकेची धक्कादायक माहिती ; राज्यात सर्वाधिक कहर एकट्या महाराष्ट्रात : 

कोरोना महासंकट : मुंबई महापालिकेची धक्कादायक माहिती ; राज्यात सर्वाधिक कहर एकट्या महाराष्ट्रात :  नवी मुंबई (बातमी अशोक वाघमारे) : देशभरात कोरोना विषाणूचा सर्वाधिक कहर महाराष्ट्रात आहे. राज्यात एकूण ५७००० हून जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यातही सर्वाधिक रुग्णसंख्या ही एकट्या मुंबईत आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितलं की, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या (BMC) १५२९ कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आतापर्यत कोरोनामुळे २५ कर्मचाऱ्यांनी प्राण गमावला आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदा बीएमसीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. मागच्या दोन महिन्यात महापालिकेत किती कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि तसेच किती जणांचा मृत्यू झाला, याबाबत कर्मचारी संघटनेने माहितीची मागणी केली होती. त्यांतर संयुक्त नगर आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) मिलिन सावंत यांनी २० मे रोजी एक परिपत्रक जारी केले. त्यात कोरोना विषाणूबाधित कर्मचारी आणि मृतांच्या संख्येचा त्यांनी त्यात उल्लेख आहे. बीएमसी ने दिलेली माहिती अशी की, मुंबई फायर ब्रिगेड आणि सुरक्षा विभाग देखील

कोरोना महासंकट : पनवेल महापालिका सिडको वसाहीत पाणीबिलात ३ टक्के ने वाढ; परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली :

कोरोना महासंकट : पनवेल महापालिका सिडको वसाहीत पाणीबिलात ३ टक्के ने वाढ; परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली : पनवेलमधील सिडको वसाहतीतील पाणीपट्टीत वाढ पनवेलमध्ये कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा वसाहत, खारघर, तळोजा, नावडे भागांचा विकास सिडकोमार्फत करण्यात आला असून येथे सुविधाही याच प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहेत. पनवेल (बातमी प्रदीप पाटील ) : आज देशभरात लॉकडाउनमुळे अनेकांचे नोकरी, रोजगार बुडाले आहेत. २ महिन्यांपासून उत्पादन ठप्प झाल्याने काहींच्या वेतनातही कपात करण्यात आल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीतील पाणीबिलात ३०% ने वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येऊन हे दरवाढ तत्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पनवेलमध्ये कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा वसाहत, खारघर, तळोजा, नावडे भागांचा विकास सिडकोमार्फत करण्यात आला असून येथे सुविधाही याच प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहेत. पनवेल महापालिका स्थापन झाली असली, तरी वसाहतीतील सुविधांसाठी शहरी नोड सिडकोकडून महापालिकेला हस्तांतरि

कोरोना महासंकट : रायगड जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढली तरी जिल्हा रेड झोनमध्ये जाणार नाही ; या जिल्हाधिकारी निधी चौधरी : 

कोरोना महासंकट : रायगड जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढली तरी जिल्हा रेड झोनमध्ये जाणार नाही ; या जिल्हाधिकारी निधी चौधरी :  पनवेल (बातमी दीपा वाघमारे): मे महिन्यात जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी जिल्हा सध्यातरी रेड झोनमध्ये जाणार नाही, असे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील एकूण ५७ टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या करोनाबाधित असलेल्या ३२१ रुग्णांपैकी केवळ ३ जणांना ऑक्सिजन पुरवठ्यावर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रुग्ण संख्यात जरी वाढत होत असली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही असंही जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत त्यांनी व्यक्त केले आहे. मे महिन्यात जिल्ह्यातील ९५ हजार नागरिक दाखल झाले आहेत. यातील बहुतांश नागरिक हे मुंबई, ठाणे, पुणे, आणि सूरत परिसरातील आहेत. या सर्वांवर प्रशासनाकडून लक्ष्य आहे. महिन्याच्या सुरवातीला जिल्ह्यात १०५ करोनाबाधित होते. आज हा आकडा ८४० वर पोहोचला आहे. मात्र, रुग्णांची संख्या जरी वाढली असली तरी कोणी घाबरून जाण्याचे कारण नाही. या सर्वांवर यशस्वी उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील ४८२ जणांनी करोनावर मा

कोरोना महासंकट: कोविड-१९ स्क्रिनिंग प्रोजेक्ट ; इंडियन डेंटल असोसिएशन आणि बीइंग डेंटीस्ट फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या तर्फे नवी मुंबई कोविड१९ स्क्रिनिंग प्रोजेक्ट :

कोरोना महासंकट: कोविड-१९  स्क्रिनिंग  प्रोजेक्ट ; इंडियन डेंटल असोसिएशन आणि बीइंग डेंटीस्ट फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या तर्फे नवी मुंबई  कोविड१९ स्क्रिनिंग प्रोजेक्ट      नवी मुंबई : बिईंग डेन्डिस्ट फाउंडेशन, इंडियन डेंटल असोसिएशन आणि रोटरी क्लब आॉफ पनवेल च्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील २१ पोलीस स्टेशन साठी कोविड१९ स्क्रिनिंग प्रोजेक्ट राबवन्यात आला. हा प्रोजेक्ट डिसीपी शिवराज पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली नवी मुंबई पोलिस आयुक्तालया तर्फे आयोजित करन्यात आला होता.      डॉ. जगदिश झाडके पाटिल आणि डॉ. सुधीर डोळे यांनी सुरु केलेल्या बिईंग डेन्टिस्ट अगेन्स्ट करोना वायरस इन ईंडिया च्या वोलंटियर डेंटिस्टनी संपुर्ण स्क्रिनिंग करण्यामधे योगदान दिले   डॉ. अशोक ढोबले, इंडियन डेंटल असोशियन चे सरचिटणीस यांच्या मार्गदर्शना अंतर्गत सर्व डेन्टिस्ट नी महाराष्ट्र सरकार नी आखुन दिलेल्या प्रोटोकॉल नुसार  सुरक्षितता आणि उच्च कार्यक्षमते ची काळजी घेत हा प्रोजेक्ट पार पाडण्यात आला.     रोटरी क्लब ऑफ पनवेल ने पुढाकार घेत सर्व डेन्टिस्ट च्या सेफ्टि साठि त्यांना पीपीई किट्स, ओेएसआर रिहायड्रेशन थेरे

कोरोना महासंकट : देशात लॉकडाउनमुळे एनएमएमटीचे उत्पन्न ठप्प ; ९ कोटींचा तोटा :

कोरोना महासंकट : देशात लॉकडाउनमुळे एनएमएमटीचे उत्पन्न ठप्प ; ९ कोटींचा तोटा :   नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम अनेक वर्षांपासून तोट्यातच आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने आर्थिक समीकरणे जुळून येत नसल्याने उपक्रमाला तोटा सहन करावा लागत आहे. नवी मुंबई : महापालिकेचा परिवहन उपक्रम अगोदरच तोट्यात असताना लॉकडाउनमुळे महिन्याला ९ कोटींची झळ सोसावी लागत आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी एनएमएमटी बस धावत असल्याने व प्रवासी वाहतूक बंद असल्याने आता उत्पन्न पूर्णपणे थांबल्याने परिवहनला आता मोठा तोटा सहन करावा लागत आहे. नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम अनेक वर्षांपासून तोट्यात आहे. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने आर्थिक समीकरणे जुळून येत नसल्याने उपक्रमाला तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी, दरवर्षी महापालिकेच्या निधीवर या उपक्रमाला अवलंबून राहावे लागते. शहरातील अवैध प्रवासी वाहतूक, रिक्षा व बेस्ट बस यामुळे अनेक मार्गांवर एनएमएमटीला अपेक्षित असा प्रवासी प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे महिना ६ कोटींपर्यंतचा आर्थिक फटका परिवहनला बसत आहे. तो सहन करून उपक्रम चालवला जात असतानाच २ महिन्यां

कोरोना महासंकट : लॉकडाऊनच्या मुदती : कुठल्या सेवा सुरू आणि बंद राहतील..!!!!

कोरोना महासंकट : लॉकडाऊनच्या मुदती : कुठल्या सेवा सुरू आणि बंद राहतील..!!!! नवी मुंबई : केंद्र सरकारनं लॉकडाऊनची मुदत ३१ मे पर्यंत वाढवली. आता लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यात कुठल्या सेवा बंद असतील आणि कुठल्या सेवा सुरू राहतील, याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं पत्रक काढून माहिती दिलीय. या सेवा बंद राहतील : देशांतर्गत वैद्यकीय सेवा, देशांतर्गत हवाई रुग्णवाहिका आणि सुरक्षेसंबंधी हवाई वाहतूक या सेवा वगळता इतर सर्व हवाई वाहतूक बंद राहील. मेट्रो रेल्वे सेवा बंद राहील. शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक/प्रशिक्षण/कोचिंग संस्था इत्यादी बंद राहतील. मात्र, ऑनलाईन लर्निंगला प्रोत्साहन दिलं जाईल आणि ते सुरूही राहील. हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील. मात्र, आरोग्य, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना राहण्यासाठी असलेले हॉटेल सुरू राहतील. तसंच, क्वारंटाईनसाठीचे आणि लॉकडाऊनमुळं अडकलेल्या पर्यटकांसाठीचे हॉटेल सुरू राहतील.  होम डिलिव्हरी करण्यासाठी रेस्टॉरंट सुरू राहतील. चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, मनोरंजन उद्यानं, बार, सभागृह इत्यादी ठिकाणंही बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरजन, शै

करोना महासंकट : उच्च न्यायालय निर्देश ; आदिवासी, दुर्बल घटकांमधील व्यक्ती अन्न व इतर मूलभूत गरजांपासून वंचित राहणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी : 

करोना महासंकट : उच्च न्यायालय निर्देश ; आदिवासी, दुर्बल घटकांमधील व्यक्ती अन्न व इतर मूलभूत गरजांपासून वंचित राहणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी :  कोरोन १९ जागतिक महामारीच्या संकटात आदिवासी, दुर्बल घटकांमधील कोणतीही व्यक्ती अन्न व इतर मूलभूत गरजांपासून वंचित राहणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी-मान. नवी मुंबई : १६ मे रोजी मंबई उच्च न्यायालयाने कोरोनाच्या जागतिक महामारीच्या या कठीण प्रसंगात आदिवासी, दुर्बल घटकांमधील कोणतीही व्यक्ती अन्न व इतर मूलभूत गरजांपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार सर्व भारतीयांना सन्मानाने जीवन जगण्याच्या हक्क आहे. आदिवासींना या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवू नका असे स्पष्ट निर्देश शुक्रवार १५ मे रोजी झालेल्या सुनावणीच्या अंतिम निकालात दिले आहे.  कोरोना-१९ जागतिक महामारी संदर्भात देशभर असलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यातील आदिवासींची होणारी उपासमारी याबाबत श्री. विवेक पंडित यांनी मान. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामध्ये राज्यातील ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार, चंद्रपूर, गडचिरो

कोरोना महासंकट : शैक्षणिक वर्ष १५ जून; प्रत्यक्षात शाळा सुरू होतील का.!! याबाबतची अनिश्चितता कायम : 

कोरोना महासंकट : शैक्षणिक वर्ष १५ जून; प्रत्यक्षात शाळा सुरू होतील का.!! याबाबतची अनिश्चितता कायम :  राज्यभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. नवी मुंबई : देशात लॉकडाउन शिथिल करण्याबाबतची अनिश्चितता अजूनही कायम असताना आता शैक्षणिक वर्ष १५ जूनलाच सुरू होईल, असे राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले असले तरी अजुनही प्रत्यक्षात शाळा सुरू होतील की नाही, याबाबतची अनिश्चितता अजून कायम आहे. कोरोना विषाणूचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता, क्वारंटाईनसाठी शाळांचा केलेला उपयोग, या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अरोग्याची हमी घ्यायला संस्थाचालक तयार नाहीत. त्यामुळे पालकांच्या मनात धास्ती ही कायम असून ते पाल्यांना शाळेत पाठवण्यास राजी नसल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील शाळा सुरू करायच्या अथवा नाही, याविषयीचा निर्णय जिल्हा

कोरोना महासंकट : देशभरात लॉकडाउन हळूहळू शिथिल होईल ; पण एकदम उठवणे अयोग्य : 

कोरोना महासंकट : देशभरात लॉकडाउन हळूहळू शिथिल होईल ; पण एकदम उठवणे अयोग्य :  नवी मुंबई : भारतात ८० टक्के  रुग्णांना करोना विषाणूची लक्षणे नाही आहेत. स्थलांतरित आणि लॉकडाउन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे ग्रामीण भागातही करोना विषाणूचा प्रादुर्भाव आता दिसू लागला आहे. राज्याचे अर्थचक्र सुरू करण्यासाठी लॉकडाउन शिथिल करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरची जबाबदारी ही वाढणार आहे हे लक्षात घेऊन करोना विषाणू नियंत्रणासाठी जास्त गांभीर्याने काम करा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. नागपूर, यवतमाळ, सोलापूर, पुणे, सातारा, ठाणे आदी जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांशी चर्चा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. मुख्य सचिव अजोय मेहता यांनीही महत्वपूर्ण सूचना दिल्या. महाराष्ट्रातील कोरोना विषाणूची रुग्ण संख्या ही मोठी असली तरी दिलासादायक बातमी म्हणजे कोरोना रुग्ण झपाटय़ाने बरे देखील होत आहेत. फिल्ड हॉस्पिटल, पल्स ऑक्सीमीटरचा वापर, प्लाझ्मा थेरपी, ८० टक्के बेड्स राखीव ठेवणे, शं

कोरोना महासंकट: कोविड -१९ स्क्रिनिंग प्रोजेक्ट ; इंडियन डेंटल असोसिएशन आणि बीइंग डेंटिस्ट फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या तर्फे आयोजित: 

कोरोना महासंकट: कोविड -१९ स्क्रिनिंग प्रोजेक्ट ; इंडियन डेंटल असोसिएशन आणि बीइंग डेंटिस्ट फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या तर्फे आयोजित:  नवी मुंबई : संयुक्त विद्यमाने इंडियन डेंटल असोसिएशन आणि बीइंग डेंटिस्ट फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या तर्फे मुंबई , नवी मुंबई कोविड -१९ स्क्रिनींग प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. इंडीयन डेंटल असोसिएशन ने महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात कोविड -१९ चा स्क्रिनींग प्रकल्प सुरू केला , तसेच बीइंग डेंटिस्ट फाऊंडेशने कोरोना विषाणू विरुध्द लढण्यासाठी समान लक्ष्य केंद्रीत आहे. राज्यात सध्याची स्तिथी पाहता मुंबई आणि नवी मुंबई येथे राहणाऱ्या दंत वैद्याच्या गटाने महाराष्ट्र सरकार , महानगरपालिका यांच्या सोबत ते काम करत आहेत आणि देशात कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. आयडीए च्या विशेषतः मार्गदर्शनाखाली मा. सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे सर, बीइंग डेंटिस्ट फाऊंडेशन यांच्या सहकार्याने डॉ. जगदीश झाडके यांनी कोरोना विषाणूच्या विरुद्ध लढाईसाठी पुढाकार घेतलेले आहेत. अनिरुद्ध हिंगे यांनी नवी मुंबई येथ

कोरोना महासंकट : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तात्काळ बदली : 

कोरोना महासंकट : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तात्काळ बदली :  पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे, कोरोनाच्या संकटकाळात झालेल्या या बदलीमुळे पनवेल राजकारणाला आता एक नवीनच वळण आले आहे, पालिका आयुक्त म्हणून गणेश देशमुख यांनी १८ इतर5 २०१८ ला लोकसेवा आयोगामार्फत त्यांची बदली पनवेल महानगरपालिकामध्ये झाली होती. दोन वर्षांच्या कालावधीत त्यांची बदली झाली होती. पनवेल महानगरपालिकेच्या निर्मिती नंतर, पालिका आयुक्त गणेश देशमुख हे पालिकेचे ३ रे आयुक्त म्हणून त्यांना मान मिळाला होता . महानगरपालिकाचा आयुक्त पदभार स्वीकारल्या नंतर नगरपालिकेचे पालिकेत रूपांतर झाले त्यानंतर पालिकेच्या विकासाचे मोठे आव्हान त्यांच्या समोर होते. त्यांनी हे काम अगदी चोख पध्दतीने बजावला आहे, पालिकेत सामावेश झालेल्या ग्रामीण भागतील विकासावर त्यांनी भर दिला होता, खेडेगावातील रस्ते आणि वीज पुरवठा पोहचवण्याचे काम त्यांनी केले, त्याचसोबत स्मार्ट व्हीलेज म्हणून गावचा विकास करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, घन कचरा व्यवस्था आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठीही त्या

कोरोना महासंकट : पनवेल महानगरपालिका "ARSENIC ALBUM 3O" या होमिओपॅथी औषधांचे वाटप : 

जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि Hahnemanian Homoeo Forum & All is well Homeopathic यांच्याकडून ARSENIC ALBUM 3O या होमिओपॅथी औषधांचे वाटप :  संपूर्ण देशभर आज कोरोनाचे वाढते प्रादुर्भाव बघता या विषाणूसाठी लढण्यासाठी जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि Hahnemanian Homoeo Forum & All is well Homeopathic  या संस्थेकडून "ARSENIC ALBUM 30" या होमिओपॅथीक औषधांचे वितरण करण्यासाठी डॉ. प्रतीमा सचिन म्हात्रे आणि डॉ. मृनल नार्वेकर यांनी जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेकडे सुपूर्त केले आहे. संबंधित औषध हे होमिओपॅथीक असल्यामुळे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाही. तसेच हे औषध कोणत्याही औषधानसोबत घेता येते, त्याचप्रमाणे कोणत्याही वयोगटातील व तसेच मधूमेह, उच्च रक्तदाब, संधिवात इ. व्यक्तींना घेता येईल  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे औषध उपयुक्त आहे, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते  तथा जे . एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन पनवेल महापालिका आयुक्त यांच्या परवानगीने हे औषधांचे वितरण पाल

कोरोना महासंकट : पंतप्रधानांन कडून लॉकडाऊन ४ ची घोषणा; १८ मे पुर्वी ठाकरे सरकार त्याबाबत चे नियम जाहीर करणार...!!! 

कोरोना महासंकट : पंतप्रधानांन कडून लॉकडाऊन ४ ची घोषणा; १८ मे पुर्वी ठाकरे सरकार त्याबाबत चे नियम जाहीर करणार...!!! नवी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. लॉकडाऊन आणि अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर कसा आणता येईल याबाबतची चर्चा या बैठकीत झाला. या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांसह मुख्य सचिव अजॉय मेहता आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह उपस्थित होते. या बैठकीत झोननुसार कुठल्या गोष्टी सुरु करता येतील आणि कुठल्या नाही यावर चर्चा झाली. अर्थव्यवस्थेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीच्या अहवालावर मंथन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याबाबतचे नियम १८ मेपूर्वी जाहीर करु, असं त्यांनी सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवरही महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे. मुंबई मधील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत ही बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलस

कोरोना महासंकट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बिनविरोध निवड; मुख्य निवडणूक अधिकार कार्यालयाने केले जाहीर..!!! 

कोरोना महासंकट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बिनविरोध निवड; मुख्य निवडणूक अधिकार कार्यालयाने केले जाहीर..!!! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची झाली बिनविरोध निवड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकार कार्यालयाने जाहीर केले आहे. सोमवारी ते सदस्यत्वाची शपथ घेतील. नवी मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केली. विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दाखल १४ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी आजची अखेरची तारीख