Skip to main content

कोरोना महासंकट: कोविड-१९ स्क्रिनिंग प्रोजेक्ट ; इंडियन डेंटल असोसिएशन आणि बीइंग डेंटीस्ट फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या तर्फे नवी मुंबई कोविड१९ स्क्रिनिंग प्रोजेक्ट :







कोरोना महासंकट: कोविड-१९  स्क्रिनिंग  प्रोजेक्ट ; इंडियन डेंटल असोसिएशन आणि बीइंग डेंटीस्ट फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या तर्फे नवी मुंबई  कोविड१९ स्क्रिनिंग प्रोजेक्ट 


 

 

नवी मुंबई : बिईंग डेन्डिस्ट फाउंडेशन, इंडियन डेंटल असोसिएशन आणि रोटरी क्लब आॉफ पनवेल च्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील २१ पोलीस स्टेशन साठी कोविड१९ स्क्रिनिंग प्रोजेक्ट राबवन्यात आला. हा प्रोजेक्ट डिसीपी शिवराज पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली नवी मुंबई पोलिस आयुक्तालया तर्फे आयोजित करन्यात आला होता. 

 

 

डॉ. जगदिश झाडके पाटिल आणि डॉ. सुधीर डोळे यांनी सुरु केलेल्या बिईंग डेन्टिस्ट अगेन्स्ट करोना वायरस इन ईंडिया च्या वोलंटियर डेंटिस्टनी संपुर्ण स्क्रिनिंग करण्यामधे योगदान दिले


 

डॉ. अशोक ढोबले, इंडियन डेंटल असोशियन चे सरचिटणीस यांच्या मार्गदर्शना अंतर्गत सर्व डेन्टिस्ट नी महाराष्ट्र सरकार नी आखुन दिलेल्या प्रोटोकॉल नुसार  सुरक्षितता आणि उच्च कार्यक्षमते ची काळजी घेत हा प्रोजेक्ट पार पाडण्यात आला.

 

 

रोटरी क्लब ऑफ पनवेल ने पुढाकार घेत सर्व डेन्टिस्ट च्या सेफ्टि साठि त्यांना पीपीई किट्स, ओेएसआर रिहायड्रेशन थेरेपी, आणि रिफ्रेशमेंट्स पुरवल्या. त्यांचा हातभार पोलिंसाना आयुर्वेदिक मेडिसिन आणि रिहायड्रेशन थेरेपी पुरवण्यातहि मोलाचा आहे.

 

 

डॉ. सुधीर डोळे , खाजगी प्रॅक्टिशनर आणि अोझोन थेरपी व इंफेक्शन कंट्रोल विषयाचे एक्सर्ट यांच्या तर्फे सर्व डेन्टिस्ट्स नी ट्रेनिंग घेतलि. त्यामधे सिनियर डेन्टिस्ट अनिलकुमार खंदारे आणि डॉ. अनिरुद्ध हिंगे यांचे हि मार्गदर्शन त्यांना लाभले.


 

नवी मुंबई चे डॉ. सुधीर डोळे, डॉ. तुकाराम गिते, डॉ. अनिलकुमार खंदारे, डॉ. मुकेश वानखेडे, डॉ. श्रुती बोगा, डॉ. अनिरुद्ध हिंगे, डॉ. स्वरदा परांजपे, डॉ. सौरभ कुमार, डॉ. संकेत शिंदे, डॉ. प्रियंका राझदान , डॉ. रितुपर्न ससाने या डेन्टिस्ट नी मोलाचे योगदान दिले. 

 

 

११ मे ला सुरु करण्यात आलेल्या या स्क्रिनिंग प्रोजेक्ट मधे २१ पोलिस स्टेशन चा समावेश आहे. त्यामधे हॉटस्पॉट एरिआ असलेले वाशी, एपीेएमसी, कोपरखैरणे , कामोठे, पनवेल हे देखिल समाविष्ट होते. दुर अंतराचे उरण, न्हावा शेवा, उलवे हे देखिल यामधे समाविष्ट होते आणि सर्व पोलिसांना एक्झामिन करण्यात आले.

 

 

या स्क्रिनिंग प्रोजेक्ट मधे २००० पेक्षा जास्त पोलिसांची स्क्रिनिंग करण्याचा पुढाकार घेण्यात आला. त्या सर्व पोलिसांचे कोविड शी निगडित बेसिक सिम्प्टम्प्स तपासण्यात आले. तसेच ४५ पेक्षा जास्त वय असणारे पोलिस विशेषरित्या तपासण्यात आले. डायबेटिक आणि हायपरटेन्सिव तसेच मेडिकल हिस्टरी असलेले पोलिस स्टाफ यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. घरि घ्यावयाची काळजि आणि प्रीव्हेंशन आॉफ कोविड१९ याबाबत सुचना देण्यात आल्या. सस्पेक्टेड केसेस आणि हाय रिस्क मेडिकल हिस्टरि पोलिसांना लगेच क्वारंटाइन करुन कोविड टेस्ट साठि पाठवन्यात आले.


 

पोलिसांच्या दिवस रात्र मेहनीताला पाहुन खास त्यांच्या साठि हा प्रोजेक्ट राबवण्यात आला. डेंटिस्ट आणि पोलिस या दोन समाजाच्या घटकांना मानाचा सलाम.

 

बातमी : संपादक: रूपाली वाघमारे 

 

महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

 







Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे