Skip to main content

कोरोना महासंकट : लॉकडाउन हा शब्द म्हणण्यापेक्षा स्वतः लॉक सोबत घेऊन फिरा,” असं आपल्याला म्हणावं लागणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : 

कोरोना महासंकट : लॉकडाउन हा शब्द म्हणण्यापेक्षा स्वतः लॉक सोबत घेऊन फिरा,” असं आपल्याला म्हणावं लागणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : 


केंद्रानं लॉकडाउन जाहीर करण्याआधीच राज्य सरकारनं एक एक गोष्ट बंद करायला सुरूवात केली होती.



नवी मुंबई : देशात २१ मार्च पासून देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. आता त्यानंतर तब्बल ३ वेळा लॉकडाउनला केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली. ४ थ्या टप्प्यातील लॉकडाउन ३१ मे दिवशी संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार लॉकडाउनबद्दल काय निर्णय घेणार याच्याकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष्य लागले आहेत. १ जूनपासून लॉकडाउन हटवणार की, आणखी शिथिलता देऊन कायम ठेवणार, १ जूननंतर महाराष्ट्र कसा असेल? या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.


महाराष्ट्राचा’ वेबसंवाद कार्यक्रमाच्या वेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्वांगीण परिस्थितीवर भाष्य केलं. मुख्यमंत्री म्हणाले,”करोनाबरोबर जगायला शिका हे म्हणणं ही आपली अपरिहार्यता आहे. त्यामुळे लॉकडाउन हा शब्द वापरणं आता बंद करायला हवं. करोनानंतरचं जग बदलेलं असेल. करोनासोबत जगायचं म्हणजे आपल्याला जीवनशैली बदलावी लागणार आहे. लॉकडाउन हा शब्द म्हणण्यापेक्षा स्वतः लॉक सोबत घेऊन फिरा,” असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. मास्क घालणं, सुरक्षित अंतर राखणं, सॅनिटाझर वापरणं, वारंवार तोंडाला हात न लावणं अशी खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.


“करोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्य सरकारला परिस्थितीची कल्पना आली होती. त्यामुळे काय काय करता येईल, याची तयारी सुरू केली होती. आरोग्याच्या सुविधा उभारण्यासाठी लष्कराचं मार्गदर्शन घेण्याची, ते तातडीनं हॉस्पिटल आणि अन्य सुविधा कशा उभ्या करतात, याचीही माहिती घेण्याची तयारी होती. पण, त्यापूर्वीच लॉकडाउन जाहीर झाला. केंद्रानं लॉकडाउन जाहीर करण्याआधीच राज्य सरकारनं एक एक गोष्ट बंद करायला सुरूवात केली होती.


आता एकदम लॉकडाउन उठवता येणार नाही. परिस्थितीचा आढावा घेऊन एक एक गोष्ट सुरू केली जाईल. आतापर्यंत बऱ्याच गोष्टी सुरू केल्या आहेत,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळेस म्हणाले.


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे