कोरोना महासंकट : पनवेल येथे लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करण्याचे चित्र दिसून आले ..!!!!
पनवेल : रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे दिवसागणिक कोरोना विषाणूबाधित रुग्ण सापडत आहेत. कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या वाढत असल्याने नगरपालिकेने लक्षात घेता पनवेल शहरात कडक लॉकडाऊनची गरज आहे. मात्र, पनवेल मध्ये लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करण्यात येत असल्याचे चित्र समोर दिसून येत आहे. नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे. मात्र, भाजपचा काहीही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर वाहनांची गर्दी, नागरिकांची गर्दी हे पाहून कोरोना विषाणू हा अधिक फैलाव करु शकतो, अशी परिस्थिती समोर दिसत आहे. पनवेल मधील लॉकडाऊन उठला का..?? आता असाही शंकेचा सवाल मनात उपस्थित करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे दिवसागणिक कोरोना विषाणूबाधित रुग्ण हे सापडत आहेत. याआधी मिरची गल्लीतही अशीच नागरिकांची गर्दी दिसून आली होती. त्यावेळी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली होती. तर काही ठिकाणी आजही पनवेल येथे लॉकडाऊनच्या नियमांचा फज्जा उडताना दिसत आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.