Skip to main content

कोरोना महासंकट : पनवेल महापालिका सिडको वसाहीत पाणीबिलात ३ टक्के ने वाढ; परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली :

कोरोना महासंकट : पनवेल महापालिका सिडको वसाहीत पाणीबिलात ३ टक्के ने वाढ; परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली :


पनवेलमधील सिडको वसाहतीतील पाणीपट्टीत वाढ
पनवेलमध्ये कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा वसाहत, खारघर, तळोजा, नावडे भागांचा विकास सिडकोमार्फत करण्यात आला असून येथे सुविधाही याच प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहेत.



पनवेल (बातमी प्रदीप पाटील ) : आज देशभरात लॉकडाउनमुळे अनेकांचे नोकरी, रोजगार बुडाले आहेत. २ महिन्यांपासून उत्पादन ठप्प झाल्याने काहींच्या वेतनातही कपात करण्यात आल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीतील पाणीबिलात ३०% ने वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येऊन हे दरवाढ तत्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



पनवेलमध्ये कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा वसाहत, खारघर, तळोजा, नावडे भागांचा विकास सिडकोमार्फत करण्यात आला असून येथे सुविधाही याच प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहेत. पनवेल महापालिका स्थापन झाली असली, तरी वसाहतीतील सुविधांसाठी शहरी नोड सिडकोकडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी, नवी मुंबई महापालिका, यांच्याकडून सिडको पाणी विकत घेते. तर तेच पाणी सिडको वसाहतींना पुरवठा करते. लॉकडाउन काळात सिडकोने पाणीबिलात ३०% नी वाढ केली आहे.


रहिवासी वापरातील सदनिकाधारकांना दर महिन्याला २० हजार लीटर पाण्यासाठी ४:४५ रुपये प्रतियुनिट आकारले जात होते. आता ६ रुपये आकारण्यात येत आहेत. २० ते २७ हजार लीटर पाण्यासाठी आधी ६ रुपये घेतले जात होते. त्यात आता २ रुपयांनी वाढ करून ८ रुपये केले आहे. २७ ते ३६ हजार लीटर पाण्यासाठी ७ रुपये दर होता. आता तो १० रुपये करण्यात आला आहे. ३६ ते ४२ हजार लीटर पाण्यासाठी प्रतियुनिट २० रुपये आकारले जाणार आहे. त्याचबरोबर वाणिज्य वापरासाठी आधी हजार लीटरसाठी प्रतियुनिट ३५ रुपये आकारले जात होते. आता १० रुपये वाढवण्यात आले असून प्रतियुनिट ४५ रुपये भरावे लागणार आहे. शैक्षणिक संस्थांसाठी १४ रुपये प्रतियुनिट होते तर आता १८ रुपये केले आहे.



कोरोनामुुळे आधीच नागरिक हतबल झाले आहेत. अनेकांचे आर्थिक गणित देखील कोलमडले आहे. खासगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या अनेकांच्या पगाराला कात्री लागली आहे तर काहींचे पगार अद्याप झालेले नाहीत, त्यामुळे केलेली सेविंगस खर्ची पडत आहे.


पाणीदर (प्रतियुनिट रुपयांत )
पूर्वीचे वाढीव : 
२० हजार लीटर ४.४५ ६
२० ते २७ हजार लीटर ६ ८
२७ ते ३६ हजार लीटर ७ १०
३६ ते ४२ हजार लीटर १० २०


वाणिज्य वापरासाठी
हजार लीटरसाठी ३५ ४५
शैक्षणिक संस्था १४ १८


सिडकोने पाणीदरात वाढ करून ३१ मेपर्यंत ते भरण्यास सांगितल्याने सर्वे रहिवाशांच्या तोंडचे पाणीच पळालेले आहे.


पाणीपट्टीची दरवाढ मार्चपूर्वीच करण्यात आली आहे. ती देयके आता पाठवण्यात आली आहेत. लॉकडाउनच्या परिस्थितीची जाणीव आहे. मात्र, आम्हालाही पाणी विकत घ्यावे लागते. पाणीबिलात झालेली वाढ रद्द करण्याबाबत रहिवाशांकडून मागणी केली जात आहे, तसे वरिष्ठांना कळवले आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल.
- (गजानन दलाल, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा सिडको).


 


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे