Skip to main content

कोरोना महासंकट : लॉकडाऊनच्या मुदती : कुठल्या सेवा सुरू आणि बंद राहतील..!!!!

कोरोना महासंकट : लॉकडाऊनच्या मुदती : कुठल्या सेवा सुरू आणि बंद राहतील..!!!!


नवी मुंबई : केंद्र सरकारनं लॉकडाऊनची मुदत ३१ मे पर्यंत वाढवली. आता लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यात कुठल्या सेवा बंद असतील आणि कुठल्या सेवा सुरू राहतील, याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं पत्रक काढून माहिती दिलीय.



या सेवा बंद राहतील :
देशांतर्गत वैद्यकीय सेवा, देशांतर्गत हवाई रुग्णवाहिका आणि सुरक्षेसंबंधी हवाई वाहतूक या सेवा वगळता इतर सर्व हवाई वाहतूक बंद राहील.


मेट्रो रेल्वे सेवा बंद राहील.


शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक/प्रशिक्षण/कोचिंग संस्था इत्यादी बंद राहतील.


मात्र, ऑनलाईन लर्निंगला प्रोत्साहन दिलं जाईल आणि ते सुरूही राहील.


हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील. मात्र, आरोग्य, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना राहण्यासाठी असलेले हॉटेल सुरू राहतील.


तसंच, क्वारंटाईनसाठीचे आणि लॉकडाऊनमुळं अडकलेल्या पर्यटकांसाठीचे हॉटेल सुरू राहतील. 


होम डिलिव्हरी करण्यासाठी रेस्टॉरंट सुरू राहतील.


चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, मनोरंजन उद्यानं, बार, सभागृह इत्यादी ठिकाणंही बंद राहतील.


सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, जिथं गर्दीची शक्यता आहे, त्यांना परवानगी दिली जाणार नाही. 


स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरू राहतील. पण त्यात लोकांना प्रवेशास परवानगी नसेल.


सर्व धार्मिक ठिकाणं बंद राहतील.


वाहतुकीसंदर्भात सूचना :
राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक काही अटींसह सुरू राहील. ज्या राज्यांमध्ये ही वाहतूक होईल, त्या दोन्ही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्या परवानगीने ही वाहतूक होईल.


वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी, नर्स, पॅरा मेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिका यांना कुठल्याही अटीविना आंतरराज्यीय प्रवासास परवानगी द्यावी.


सर्व प्रकारची मालवाहूतक/कार्गो, रिकामे ट्रक यांना वाहतुकीस परवानगी द्यावी.


कोव्हिड-19 संदर्भात केंद्राच्या सूचना :
रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ठरवू शकतात. 


मात्र, हे ठरवताना प्रत्येक राज्याला केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागेल.


रेड आणि ऑरेंज झोनमधील कंटेनमेंट झोन आणि बफर झोनच्या सीमा संबंधित जिल्हा प्रशासन ठरवू शकतो.


मात्र, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनांचं पालन करावं लागेल.


कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली जाईल. 


या झोनमध्ये वैद्यकीय सेवेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांशिवाय इतर कुणीही बाहेर फिरणार नाही, याची काळजी घ्यावी.


कंटेनमेंट झोनमध्ये काँटॅक्ट ट्रेसिंग, प्रत्येक घरात सर्वेक्षण आणि वैद्यकीय सेवा चोख ठेवावी.


रात्री ७ ते सकाळी ७ पर्यंत कुणीही बाहेर पडू नये
रात्री ७ ते सकाळी ७ या दरम्यान लोकांचं घराबाहेर पडणं पूर्णपणे बंद करावं. अर्थात, यातूनही अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना वगळावं.


६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक, आधीपासून आजारी असलेले लोक, गरोदर स्त्रिया, दहा वर्षांखालील मुलं यांनी घरातच राहावं. 


अत्यावश्यक गोष्टी किंवा वैद्यकीय कारणाशिवाय त्यांना बाहेर पडू देऊ नये.


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे