Skip to main content

कोरोना महासंकट : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तात्काळ बदली : 

कोरोना महासंकट : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तात्काळ बदली : 



पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे, कोरोनाच्या संकटकाळात झालेल्या या बदलीमुळे पनवेल राजकारणाला आता एक नवीनच वळण आले आहे, पालिका आयुक्त म्हणून गणेश देशमुख यांनी १८ इतर5 २०१८ ला लोकसेवा आयोगामार्फत त्यांची बदली पनवेल महानगरपालिकामध्ये झाली होती. दोन वर्षांच्या कालावधीत त्यांची बदली झाली होती. पनवेल महानगरपालिकेच्या निर्मिती नंतर, पालिका आयुक्त गणेश देशमुख हे पालिकेचे ३ रे आयुक्त म्हणून त्यांना मान मिळाला होता .


महानगरपालिकाचा आयुक्त पदभार स्वीकारल्या नंतर नगरपालिकेचे पालिकेत रूपांतर झाले त्यानंतर पालिकेच्या विकासाचे मोठे आव्हान त्यांच्या समोर होते. त्यांनी हे काम अगदी चोख पध्दतीने बजावला आहे, पालिकेत सामावेश झालेल्या ग्रामीण भागतील विकासावर त्यांनी भर दिला होता, खेडेगावातील रस्ते आणि वीज पुरवठा पोहचवण्याचे काम त्यांनी केले, त्याचसोबत स्मार्ट व्हीलेज म्हणून गावचा विकास करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, घन कचरा व्यवस्था आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठीही त्यांनी प्रयत्न केला, आवास योजने तर्फे तळागाळातील लोकांना घरे उपलब्ध करून देण्याचा यशस्वी प्रयत्न करुन, जवळपास २२०० गरजूंना त्यांनी घरे देण्याचा प्रकल्पाला मजुरी घेऊन प्रत्येक्षात कामाला देखील सुरुवात झाली होती, मात्र कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामूळे त्यांचे हे काम अर्धवट राहिले गेले.


महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांची ठाणे महानगरपालिकेत अतिरिक्त म्हणून त्यांची बदली झाल्याचे वृत्त समजले आहे आणि तसेच त्यांच्या जागी उल्हासनगरचे आयुक्त सुधारक देशमुख यांची नियुक्ती करण्यात आल्याचे खात्री सूत्रांनकडुन सांगण्यात येत आहे. तर आता पनवेल पालिकेतुन एक देशमुख गेले तरी दुसरे देशमुख येण्याची जोरदार चर्चा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे