Skip to main content

कोरोना महासंकट: कोविड -१९ स्क्रिनिंग प्रोजेक्ट ; इंडियन डेंटल असोसिएशन आणि बीइंग डेंटिस्ट फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या तर्फे आयोजित: 

कोरोना महासंकट: कोविड -१९ स्क्रिनिंग प्रोजेक्ट ; इंडियन डेंटल असोसिएशन आणि बीइंग डेंटिस्ट फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या तर्फे आयोजित: 



नवी मुंबई : संयुक्त विद्यमाने इंडियन डेंटल असोसिएशन आणि बीइंग डेंटिस्ट फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या तर्फे मुंबई , नवी मुंबई कोविड -१९ स्क्रिनींग प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे.


इंडीयन डेंटल असोसिएशन ने महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात कोविड -१९ चा स्क्रिनींग प्रकल्प सुरू केला , तसेच बीइंग डेंटिस्ट फाऊंडेशने कोरोना विषाणू विरुध्द लढण्यासाठी समान लक्ष्य केंद्रीत आहे.



राज्यात सध्याची स्तिथी पाहता मुंबई आणि नवी मुंबई येथे राहणाऱ्या दंत वैद्याच्या गटाने महाराष्ट्र सरकार , महानगरपालिका यांच्या सोबत ते काम करत आहेत आणि देशात कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.


आयडीए च्या विशेषतः मार्गदर्शनाखाली मा. सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे सर, बीइंग डेंटिस्ट फाऊंडेशन यांच्या सहकार्याने डॉ. जगदीश झाडके यांनी कोरोना विषाणूच्या विरुद्ध लढाईसाठी पुढाकार घेतलेले आहेत. अनिरुद्ध हिंगे यांनी नवी मुंबई येथील दंत वैद्यांनी कार्यक्रम आयोजन करण्याचा सर्व प्रयत्न केले आहेत. रोटरी क्लब ऑफ पनवेलने सर्व डॉक्टरांना पीपीई किट आणि इन्फ्रारेड थर्मामिटर व तसेच फील्डवरील दंत वैद्याकडून विचारलेल्या सर्व गरजा देऊन त्यांच्या सुरक्षिततेची त्यांनी काळजी घेतली आहे.



डॉ. सुधीर डोळे, खारघर नवी मुंबईतील ओझोन थेरपी आणि इन्फेक्शन कंट्रोलची खाजगी चिकित्सक आणि तज्ज्ञ. डॉ. अनिलकुमार खंदारे आयडीए नवी मुंबईचे ज्येष्ठ चिकित्सक आणि व्हीपी, डॉ. अनिरुद्ध हिंगे सीडीएच संयोजक, आयडीए नवी मुंबई आणि डॉ. मुकेश वानखेडे दंत वैद्यांना योग्य प्रोटोकॉलनुसार मदत करत आणि त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेतात.


नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील, कळंबोली येथून सोमवारी ११ मे २०२० रोजी पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कोविड -१९ चा स्क्रिनींग प्रोग्राम सुरू झाला, ४०० हुन अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी आणि २० संशयित कर्मचाऱ्यांची तपासणी कोविड -१९ च्या चाचणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या आहेत.



तसेच दंत चिकित्सकांच्या टीममध्ये डॉ. सुधीर डोळे, डॉ. अनिरुद्ध हिंगे, डॉ. अनिलकुमार खंदारे, डॉ. मुकेश वानखडे, डॉ. सौरभ कुमार, डॉ. स्वरादा परांजपे, डॉ. संकेत शिंदे, डॉ. श्रुती साई, डॉ. श्रुती बागा, डॉ. रितुपर्णा ससाणे हे नवी मुंबईत काम करणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनसाठी कोविड -१९ चा स्क्रिनींग कार्यक्रम सुरू करून दंतवैद्य डॉक्टटरांनी यात पूढाकार घेतला आहे आणि भारतीय नागरिक म्हणून धैर्याने आपली कर्तव्य पार पाडत आहेत हेे अंत्यत कौतुकास्पद आहे, अशी माहिती पोलिस उपआयुक्त श्री. शिवराज पाटील यांनी दिली आहे.


 


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे