Skip to main content

कोरोना महासंकट: पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन ३१ रूग्ण; तर १७ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले:

कोरोना महासंकट: पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन ३१ रूग्ण; तर १७ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले:



पनवेल : पनवेल ग्रामीण भागामध्ये २७ जून रोजी कोरोनाचे ३१ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून १७ रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आज आढळलेल्या रूग्णांमध्ये सुकापूर येथील ५, उलवे येथील ४, कंरजाडे येथील ३, देवद येथील ३, वहाळ येथील ३, आदई येथील २, डेरिवली येथील २, नेरे येथील २ तसेच कोळखे, कुडावे (पळस्पे), विचुंबे, पालीदेवद, कोलवाडी, तरघर, वावंजे येथील प्रत्त्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, पनवेल ग्रामीणमधील आजपर्यंतच्या एकूण ५५६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण ३२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या २२० ऐक्टिव केसेस चालू आहेत.


सुकापूर मध्ये कोरोनाचे नवीन ५ रूग्ण :
सुकापूर, मराठी शाळेजवळील ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये १० वर्षीय मुलीसह १४ वर्षीय मुलगा, ३८ वर्षीय पुरुष आणि ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यांना स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच सुकापूर, जय बालाजी कृपा सोसायटी जरी मरी मंदिराजवळील ५८ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. श्रेयस हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत असलेल्या या महिलेला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


उलवे मध्ये कोरोनाचे नवीन ४ रूग्ण :
उलवे, कृष्णा टावर, प्लाट नंबर बी-७ येथील ३२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती बेलापुर येथे काम करीत असून नोकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच उलवे, सुयेश पार्क हौसिंग सोसायटीतील ३६ वर्षीय पुरुष व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या या व्यक्तीला नोकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय उलवे, सेक्टर-२१, विघ्नहार्ता सोसायटीतील २६ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती रिक्षाचालक असून व्यवसायाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच उलवे, सेक्टर-२१, सीटी पाफईन्ट, रूम ३०३ येथील ४७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. जेएनपीटीमध्ये नोकरी करणाऱ्या या महिलेला नोकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


करंजाडे मध्ये कोरोनाचे नवीन ३ रूग्ण :
कंरजाडे, सेक्टर ५, अनुसया हाईट्स रुम नंबर-६०५, येथील २८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. स्वीमिंग कोच म्हणून काम करणाऱ्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय कंरजाडे, पार्थ रेसिडेन्सी येथील ३२ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. जेएनपीटी येथे नोकरी करणाऱ्या या व्यक्तीला नाकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच करंजाडे येथील २६ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. ट्रासपोर्टचे काम करणाऱ्या या व्यक्तीला नोकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


देवद मध्ये कोरोनाचे नवीन ३ रूग्ण :
देवद, ओएनजीसी, विठ्ठल मंदिराजवळील ४३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. रिलायन्समध्ये नोकरी करीत असलेल्या या व्यक्तीला नोकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच देवद, पुष्प वैराण्य कॉम्लेक्स, बिल्डिंग २५, रुम नंबर-२०९ येथील ३७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. अॅमेझान कंपनीत काम करणाऱ्या या महिलेला नाकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय देवद, हरिद्वार बिल्डिंग, साक्षी नगर येथील २९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. कामा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत असलेल्या या महिलेला नोकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


वहाळ मध्ये कोरोनाचे नवीन ३ रूग्ण :
वहाळ, घर नंबर-१८८, येथील ३४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. बिल्डिंग मटेरिअल सप्लायचे काम करणाऱ्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच वहाळ, घर नंबर-१६८ वहाळ ता. पनवेल येथील ४ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय वहाळ, राम मंदिर जवळील ३२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. बिल्डिंग मटेरिअल सप्लायचे काम करणाऱ्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


आदई, डेरिवली, नेरे मध्ये कोरोनाचे प्रत्येकी २ नवीन रूग्ण:
आदई, बालाजी शरण सोसायटी, ए-विंग येथील ६४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच आदई, इंद्र प्रसाद सोसायटी, एम विंग येथील ६४ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय डेरिवली, येथील ३२ वर्षीय महिलेसह ३३ वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी पुरूष व्यक्ती जेएनपीटी येथे नोकरी करीत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच महिलेला स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच नेरे येथील २९ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय नेरे, ब्राम्हण आळी, माथेरान रोड येथील ३२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


कोळखे, कुडावे (पळस्पे), विचुंबे, पालीदेवद, कोलवाडी, तरघर, वावंजे मध्ये कोरोनाचे नवीन रूग्ण:
कोळखे, एफ-ए हाऊस पनवेल येथील ६० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच कुडावे (पळस्पे) येथील ६७ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली असून असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय विचुंबे, दत्तात्रेय निवास येथील ४३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच पालीदेवद, सिध्दी विनायक हाऊसिंग सोसायटी, जरी मरी मंदीराजवळील २८ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. नेव्ही मध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय कोलवाडी, येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच तरघर, मु मोहा हाऊस घर नंबर-८६ येथील ३९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. (तहसील कार्यालयाने दिलेला पत्ता चुकिचा वाटत आहे). याशिवाय वावंजे, मितालास वावंजे येथील २७ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


पनवेल ग्रामीण भागमधील १७ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले :
आज पनवेल ग्रामीणमधील १७ रूग्ण पुर्णपणे बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये आदई येथील ३, नेवाळी येथील ३, उसर्ली येथील २, करंजाडे २, सुकापूर येथील २ विचुंबे येथील २ तसेच चिखले, कोप्रोली, वलप येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.




 


 


 


 


 


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे