Skip to main content

कोरोना महासंकट : पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे नवीन ३२ नवे रूग्ण; तर ४ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे: 

कोरोना महासंकट : पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे नवीन ३२ नवे रूग्ण; तर ४ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे: 



पनवेल : पनवेल ग्रामीण भागामध्ये २८ जून रोजी कोरोनाच्या नवीन ३२ रूग्णांची नोंद झाली असून ४ रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये उलवे येथील ५, पळस्पे येथील ३, करंजाडे येथील ३, पडघे (कोळवाडी) येथील २, आकुर्ली येथील २, पारगाव येथील २, कोन येथील २, तसेच आदई, कोप्रोली, सुकापुर, वावंजे, मोरबे, तूराडे, शेलघर, सावळे, कोपर, विचुंबे, केळवणे, कानपोली, मानघर येथील प्रत्त्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, पनवेल ग्रामीणमधील आजपर्यंतच्या एकूण ५८८ कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण ३२४ जणांना घरी सोडण्यात आले आहे तर १६ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाच्या २४८ ऐक्टिव केसेस आहेत.


उलवे मध्ये कोरोनाचे नवीन ५ नवे रूग्ण :
उलवे, बी ७०२ क्वालिटी एक्सटेसा हौसिंग सोसायटीतील ४२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. वाशी येथे पीएफ ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच येथील (वरील पत्ता) १३ वर्षीय आणि ७ वर्षीय मुली कोरोना पॉझिटिव्ह आल्या असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय उलवे, डेल्टा टॉवर, सेक्टर-८ येथील ५९ वर्षीय महिलेसह ६० वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाली आहे. दोघेही नागोठणे येथे व्यवसाय करत असून व्यवसायाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


पळस्पे मध्ये कोरोनाचे नवीन ३ रूग्ण :
पळस्पे, मानसी पार्क, ब्लोसम बिल्डिंग, पळस्पे फाटा, येथील वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय येथील (वरील पत्ता) ५२ वर्षीय महिलेसह १८ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


करंजाडे मध्ये कोरोनाचे नवीन ३ रूग्ण :
करंजाडे, शंकर पार्वती निवास येथील ३२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच करंजाडे दुर्गा साई मंदिराजवळील ३४ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय करंजाडे साई पर्ल, प्लाट नबर-१२१ अ येथील १५ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


पडघे (कोळवाडी), आकुर्ली, पारगाव, कोन मध्ये कोरोनाचे प्रत्येकी २ नवीन रूग्ण :
पडघे (कोळवाडी), गावदेवी मंदीराजवळील २४ वर्षीय महिलेसह ६१ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच आकुर्ली, येथील ४२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय आकुर्ली, हनुमान मंदिराजवळील घर नंबर १३२ येथील २८ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली असून नोकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच पारगाव (दापोली) येथील ५५ वर्षीय आणि ६० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून मोसारे येथील फॉर्म हाऊसमध्ये काम करीत करणाऱ्या या दोन्ही महिलांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय कोन येथील २६ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली असून या व्यक्तीला व्यवसायाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच कोन, पटेल आळी येथील ३२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून शेती आणि टॉन्सपोर्टचे काम करणाऱ्या या व्यक्तीला व्यवसायाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


आदई, कोप्रोली, सुकापुर, वावंजे, मोरबे, तूराडे, शेलघर, सावळे, कोपर, विचुंबे, केळवणे, कानपोली, मानघर मध्येही कोरोनाचे नवीन रूग्ण:
आदई, ए-१०२ बालाजी रेसिडसी येथील ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच कोप्रोली, अरिहंत अरांह सोसायटीतील ३७ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. इंजिनीअरिंग डिप्लोमाचे येथे शिक्षण घेत असलेल्या या व्यक्तीला त्याठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय सुकापूर, गंगा दर्शन हौसिंग सोसायटीतील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून नोकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच वांवजे, कुंभारपाडा, दत्तमंदिर जवळील ३४ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती तळोजा येथे सुपरवायझर म्हणून नोकरी असून नोकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय मोरबे, माथेरान रोड, गणपती मंदिर जवळील २८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. एमआयडीसीमध्ये नोकरी करणाऱ्या या व्यक्तीला नाकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच तुराडे येथील ३२ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला कळंबोली येथे शिक्षिका असून नोकरीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय शेलघर येथील ४३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. गव्हाण येथील जे.डब्ल्यू.आर येथे सुपरवायझर म्हणून नोकरी करणाऱ्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच सावळे येथील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. पातळगंगा येथे नोकरीस असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय कोपर (गव्हाण) येथील ६१ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच केळवणे, वरची आळी येथील ५३ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. रिलायन्समध्ये नोकरीस असलेल्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय कानपोली येथील ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. स्टाफ नर्स असलेल्या या महिलेला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच मानघर, कुंडेवहाळ येथील २९ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. जे.डब्ल्यू.आर येथे सुपरवायझर म्हणून नोकरी करणाऱ्या या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


पनवेल ग्रामीण भागामधील ४ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले :
आज पनवेल ग्रामीणमधील ४ रूग्ण पुर्णपणे बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये उसर्ली येथील ३ तर केळवणे येथील एका रूग्णाचा समावेश आहे.



 



 


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे