कोरोना महासंकट : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन ८८ नवे रूग्ण; तर ३ जणांचा मृत्यू, २७ जणांना घरी सोडण्यात आले:
कोरोना महासंकट : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन ८८ नवे रूग्ण; तर ३ जणांचा मृत्यू, २७ जणांना घरी सोडण्यात आले:
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात
२७ जून रोजी एकूण ८८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, दुर्दैवी बाब म्हणजे ३ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये नवीन पनवेलमधील २ तसेच कामोठ्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. दरम्यान नवीन पनवेलमधील एका मयत रूग्णाबाबतची माहिती महापालिकेला आज मिळाल्याने नवीन रूग्णांमध्ये नोंद करण्यात आली आहे. याशिवाय महापालिका हद्दीतील २७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज आढळलेल्या नवीन रूग्ण :
पनवेल येथील २६, खारघरमधील १६, नवीन पनवेल येथील १५, कळंबोलीतील १३, कामोठ्यातील १३, खांदा कॉलनीतील ४ तसेच तळोजा एका रूग्णाचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १७८७ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ११५३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ७० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाच्या ५६४ ऐक्टिव केसेस चालू आहेत.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.