कोरोना महासंकट : राज्य सरकारचा मोठा निर्णय; सिडको गृहलाभार्थीना पैसे भरण्यास मिळणार मुदत :
नवी मुंबई(बातमी-दिपा वाघमारे)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या गृहलाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. कारण सिडकोमार्फत दिल्या जाणार्या परवडणार्या घरांच्या हफ्त्याबद्दल सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सिडकोच्या गृहलाभार्थ्यांना घराचे पैसे भरण्यासाठी आता आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. याचा लाभ तब्बल 15 हजार सिडको गृहलाभार्थ्यांना मिळणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत महत्वाचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षी निघालेल्या सिडकोच्या सोडतीत 15हजार लाभार्थ्यांना सिडको मार्फत घरं लागली होती. या सर्व लाभार्थ्यांना 30 जून ही घरांचे हफ्ते भरण्याची शेवटची तारीख देण्यात आली होती. मात्र आता मिशन बिगिन जरी सुरु झालं तरीही कोरोनाच्या धास्तीमुळे सर्वकाही पूर्णपणे सूरु झालेलं नाही. त्यात सिडको गृहलाभार्थ्यांना पैशाची जमवाजमव करण्यासाठी घराबाहेर पडता आलेलं नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको गृहलाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला.
आता गृहलार्थ्यांना आपल्या घरांचे हफ्ते भरण्यासाठी अधिकचे ३ महिने देण्यात आले.
नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, खारघर, तळोजा, कळंबोली या विविध भागांमध्ये ही घरं आहेत. कोरोनामुळे पैशांची जमवाजमव झाली नसल्याने आपल्या स्वप्नांतील घर कोरोनामुळे सोडावं मुळे सोडावं लागतंय की काय असा प्रश्न गृहलाभार्थ्यांना गृहधारकांच्या मनात निर्माण झालेला .मात्र यावर आता सरकारने महत्वाचा निर्णय घेऊन सर्व सिडको गृहलाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.