कोरोना महासंकट: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन ९६ नवे रूग्ण; तर दोघांचा मृत्यू, ३४ जणांना घरी सोडण्यात आले:
कोरोना महासंकट: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन ९६ नवे रूग्ण; तर दोघांचा मृत्यू, ३४ जणांना घरी सोडण्यात आले:
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २८ जून रोजी एकूण कोरोनाचे ९६ रुग्ण आढळले असून दुर्दैवी बाब म्हणजे २ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये कामोठ्यातील ६२ वर्षीय आणि खांदा कॉलनीतील ८३ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. तसेच, कामोठ्यातील मयत रूग्णाबाबतची माहिती पालिकेला आज मिळाल्याने त्याची नवीन रूग्णांमध्ये नोंद करण्यात आली आहे. याशिवाय पालिका क्षेत्रात ३४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज आढळलेल्या नवीन रूग्ण :
पनवेल येथील २६, खारघरमधील १६, नवीन पनवेलमधील ७, कळंबोलीतील ११, कामोठ्यातील १५, खांदा कॉलनीतील ५ तसेच नावडे येथील ३, तोंडरे गावातील ३, तळोजा फेज-२ येथील ३, पेणधर येथील २, रोहिंजण येथील २, तसेच खिडूकपाडा, वळवली, पडघे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १८८३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ११८७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ७२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाच्या ६२४ ऐक्टिव केसेस चालू आहेत.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.