कोरोना महासंक्ट : पुर्ण नवी मुंबईत ७ दिवसाचा कडक लॉकडाऊन; ७०७१२ घरांचे आरोग्य तपासणी मोहीम :
नवी मुंबई मधील कोरोनाचा आकडा ६००१ झाला असून आतापर्यंत २०१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होणा-या १० ठिकाणी लॉकडाऊन करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या परिसरातील ७०७१२ घरांमध्ये विशेष आरोग्य तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. पुर्ण परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही कामाचे ठिकान बंद ठेवण्यात येणार आहेत.
नवी मुंबई मधील कोरोनाचा आकडा ६००१ झाला असून आतापर्यंत २०१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रातील परिस्थितीचा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा आढावा घेतला आहे. तसेच बैठकीला खासदार राजन विचारे, पोलीस आयुक्त संजय कुमार, महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ उपस्थित होते. सद्यस्थितीमध्ये शहरात ३४ कंटेनमेंट झोन आहेत. हे झोन रूग्ण सापडलेल्या घर किंवा इमारतीमधील मजल्यापुरते मर्यादित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दहा विशेष कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय देखिल या बैठकीत घेण्यात आला आहे.
यामध्ये करावे गाव, दिवाळे गाव, तुर्भे स्टोअर, तुर्भे सेक्टर २१, २२, जुहूगाव सेक्टर ११, बोनकोडे गाव, कोपरखैरणे गाव सेक्टर १९, रबाळे गाव व चिंचपाडा परिसराचा समावेश आहे.
२९ जून ते ५ जुलै दरम्यान या परिसरात विशेष असा लॉकडाऊन राहणार आहे. तरी अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. महानगरपालिका या १० ठिकाणच्या ७०७१२ घरांमध्ये जावून सर्वेक्षण करणार आहे. तसेच येथे कोणीही संशयित रूग्ण सापडल्यास त्याची स्वॅब टेस्ट केली जाणार आहे.
मह्त्वाचे बंद असणारे विभाग आणि घरांची संख्या:
विभाग घरांची संख्या
१)दिवाळे गाव ३७००
२)करावे गाव ९४००
३)तुर्भे स्टोअर ११२२०
४)सेक्टर 21तुर्भे ६०००
५)सेक्टर 22 तुर्भे ८९५०
६)सेक्टर 11 जुहुगाव ९०००
७)बोनकोडे गाव, सेक्टर 12 खैरणे ५०१५
८)सेक्टर 19 कोपरखैरणे गाव ९६००
९)रबाळे गाव २९१८
१०)चिंचपाडा ४९००
एकूण ७०७१२
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.