कोरोना महासंकट : भिमआर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जातीय हिंसाचारा विरुध्द सांकेतीक आंदोलन :
कोरोना महासंकट : भिमआर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जातीय हिंसाचारा विरुध्द सांकेतीक आंदोलन :
नवी मुंबई : कोरोना विषाणूच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन परिस्तिथिती असतानाही महाराष्ट्रात काही गावगुंड बौद्ध, अादिवासी, दलित यांच्यावर सतत अत्याचार करीत आहेत, हत्याकांड घडवत आहेत. औरंगाबाद, बीड, नागपूर, पुणे, परभणी, जळगाव, नंदूरबार, हिंगोली गावात प्रकरण घडले. नागपूरचा अरविंद बनसोड तर पुणे पिंपरी येथील विराज जगताप यांचे नियोजनपुर्वक हत्याकांड घडवले गेले परंतु याबाबत अनेक निवेदने देऊनही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे हे लक्ष देत नाहीत किंवा पोलीस प्रशासनाला गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देत नाहीत.
यामुळे दि.२७ जून रोजी भिमआर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोशल मिडीयावर सरकारच्या निषेधार्थ काळे कपडे परिधान करून, हाताला-डोक्याला काळी रिबन बांधून राज्यभरातील भिमसैनिकांनी सरकारचा जाहीर निषेध करीत सांकेतिक आंदोलन केले आहे.
या आंदोलनात भिमआर्मी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे, मुख्य महासचिव मनिष साठे, उपाध्यक्ष कैलास जैस्वार, महाराष्ट्र संघटक डाॅ. किर्तीपाल गायकवाड, प्रचार-प्रसिद्धी प्रमुख राजेश गवळी, तसेच जिल्हा प्रमुख नागपूर- प्रफुल्ल शेंडे, अमरावती-प्रविण बनसोड, नंदुरबार- संजू रगडे, मुंबई- दिपक हनवते, पुणे- दिपक देवरे, बीड- गोपिनाथ गायकवाड, लातूर- विलास चक्रे, नाशिक- भुषण बर्वे, जळगांव- गणेश सकपाळे, वाशिम- डाॅ. अविनाश भगत, रायगड- सुरज दोडके, अरूण देसाई, यवतमाळ- देवा जगताप, यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह सक्रीय सहभाग नोंदवला. भिमआर्मी स्टूडंट्स फेडरेशन तसेच भिमआर्मी कार्यकारिणी सदस्य अशोक कांबळे व कोअरचे राजू झनके यांनी देखील काळे कपडे घालून सरकारचा निषेध नोंदवला.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.