कोरोना अपडेट: मुरबाड रोड परिसरातील ‘ए अँड जी’ खाजगी रुग्णालयाचा परवाना रद्द आणि कोविड दर्जा ही काढला:
कोरोना अपडेट: मुरबाड रोड परिसरातील ‘ए अँड जी’ खाजगी रुग्णालयाचा परवाना रद्द आणि कोविड दर्जा ही काढला:
शासकीय दरांपेक्षा अधिक दर आकारणी करून कोवीड रुग्णांची लूट केल्याचा ठपका ठेवत कल्याण पश्चिमेच्या मुरबाड रोड परिसरात असणाऱ्या ‘ए अँड जी’ या खासगी रुग्णालयाचा कोवीड दर्जा केडीएमसीने काढून घेण्यासह रुग्णालयाची नोंदणी ३१ ऑगस्टपर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे.
कल्याण (प्रतिनिधि/ विशाल सोनार)- कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना प्रादुर्भाव जास्त झाल्याने रुग्णात विलक्षण वाढ होत आहे याचा च फायदा आता खाजगी रुग्णालय घेत आहे कुटूंबीय गोंधळात पडत असल्याने अशी प्रकारे बाहेर यायला वेळ लागत आहे खाजगी रुग्णालयाने केवळ नावे सारखी असल्याने कोव्हिडची लागण नसताना एका महिला रुग्णावर कोव्हिडं चे उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणात उघड झाला आहे .त्याच प्रकरणी पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी ए अँड जी रुग्णालयाचा एक महिन्यासाठी परवाना रद्द करून कोविड रुग्णालयाचा दर्जा काढून घेतल्याने खाजगी रुग्णालयाचे ध्याबे दणाणले आहे.
महापालिकेच्या भरारी पथकाने केलेल्या चौकशीत या रुग्णालयाने १९ रुग्णांच्या बिलांमध्ये ९ लाख ३६ हजार ६१८ रुपये जादा आकारणे, टोसीलीझुमॅब इंजेक्शनसाठी एमआरपीपेक्षा अधिक पैसे उकळणे आदी गंभीर अनियमितता आढळून आल्या. त्याबाबत केडीएमसीच्या नोटीसीना रुग्णालय प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याचेही सांगण्यात आले. या अति गंभीर स्वरूपाच्या अनियमिततांमधून रुग्णालयाने कोवीड रुग्णांची आर्थिक फसवणूक केल्याचा ठपका ठेवत महापालिका प्रशासनाने या रुग्णालयावर ही कारवाई केल्याचे सांगितले.
‘ए अँड जी’ रुग्णालयाला देण्यात आलेला कोवीडचा दर्जा रद्द करण्यासह मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायद्याखाली केलेली नोंदणीही ३१ ऑगस्टपर्यंत निलंबित केली आहे. तसेच जोपर्यंत रुग्णालय प्रशासन या सर्व अनियमितता दूर करून संबंधित रुग्णांना आकारलेले जादा पैसे परत करत नाही तोपर्यंत नोंदणीचे निलंबन राहणार असल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले. तसेच या रुग्णालयात कोवीडचे नविन रुग्ण घेण्यावरही मनाई आदेश लागू करण्यात आले असून सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांवर शासकीय दरात उपचार होण्याचे निश्चित करण्यासाठी केडीएमसीतर्फे वैद्यकीय अधिकारी समीर सरवणकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.