कोरोना अपडेट: पनवेल महानगरपालिा क्षेत्रात कोरोनाचे ११९ नवे रूग्ण; तर २ रूग्णांचा मृत्यु व ११९ जणांना घरी सोडण्यात आले:
कोरोना अपडेट: पनवेल महानगरपालिा क्षेत्रात कोरोनाचे ११९ नवे रूग्ण; तर २ रूग्णांचा मृत्यु व ११९ जणांना घरी सोडण्यात आले:
पनवेल: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २९ जुलै रोजी कोरोनचे ११९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून तेवढेच म्हणजे ११९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दुर्दैवी बाब म्हणजे कामोठे आणि नवीन पनवेल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पनवेल पालिका क्षेत्रातील कोरोनाचे नवीन रूग्ण:
कामोठ्यातील ३१, खारघरमधील २७, नवीन पनवेलमधील २०, कळंबोलीतील १४, पनवेलमधील १२, खांदा कॉलनीतील ७, घोटकँप येथील ४ तसेच नावडे, धरणा कँप, पेणधर आणि तळोजा फेज-२ येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
तसेच, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ६३४३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ४७३७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून १५४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १४५२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.