कोरोना अपडेट: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज आढळून आलेल्या कोरोनाबाधीत रूग्णांनाची विगतवारी :
कोरोना अपडेट: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज आढळून आलेल्या कोरोनाबाधीत रूग्णांनाची विगतवारी :
कल्याण (प्रातिनिधि/कल्पेश सोनार) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिवसागणित वाढत असलेली कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. २९ जुलै रोजी कोरोनाचे नवीन २७७ रुग्ण आढळले असून दिलासादायक बातमी आज २६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच, आतापर्यंत १३१९६ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर दुर्दैवी बाब म्हणजे कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील ३३६ जणांचा दुर्दैवी मृत्यू, तसेच एकूण ५७७७ रूग्ण सध्या कोरोनावरती रूग्णालयात उपचार घेत आहेत.
आज आढळलेल्या नवीन रूग्ण:
कल्याण पूर्व : ५९
कल्याण पश्चिम : ७१
डोंबिवली पूर्व : ७३
डोंबिवली पश्चिम : ४६
मांडा-टिटवाळा : ०५
मोहना : २१
पिसवली : ०२
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.