कोरोना अपडेट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन ३७५ रूग्णांची नोंद; ५ जणांचा मृत्यू तर ३११ जणांना घरी सोडण्यात आले..!!
कोरोना अपडेट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन ३७५ रूग्णांची नोंद; ५ जणांचा मृत्यू तर ३११ जणांना घरी सोडण्यात आले..!!
नवी मुंबई- नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ३३३८९ इतका असून २९ जुलै रोजी कोरोना विषाणूचे नवीन ३७५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच आज ३११ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले गेलेले आहेत. तर कोरोनामुळे आज ५ जणांचा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाखला आहे.
नवी मुंबईमध्ये दिवसागणित वाढत असलेली कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच नवी मुंबईत आत्तापर्यंत नवी मुंबईत ३३३८९ लोकांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये १८५२१ जणांचा अहवाल हे निगेटिव्ह आले तसेच २४१ जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.
२९ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण:
तुर्भेमधील २१, बेलापूरमधील ८८, कोपरखैरणेमधील ६१,
नेरुळमधील ६५, वाशीतील ३१, घणसोलीमधील ५७, ऐरोलीमधील ४७, दिघ्यातील ०५ असे एकूण ३७५ॐनवीन कोरोनारुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आत्तापर्यंत नवी मुंबईत ९७५४ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून ते बरे होऊन घरी परतले आहेत.
२९ जुलै रोजी कोरोनाचे निगेटिव्ह आलेले रुग्ण :
बेलापूरमधील ४१, नेरूळमधील ४०, वाशीमधील ४६, तुर्भेमधील ५७, कोपरखैरणेमधील १८, घणसोलीमधील ४६, ऐरोलीमधील ५१, दिघा १२ अशा एकूण ३११ व्यक्ती आज कोरोनामुक्त झाल्या असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात सद्यस्थितीमध्ये ४४६६ व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण ४०७ जणांचा कोरोनामुळे दूर्दैवी मृत्यू झाला आहे.
आज नवी मुंबई मध्ये कोरोनाबधित ३७५ रुग्ण आढळले:
नवी मुंबईत एकूण टेस्ट : ३३३८९
आज पॉझिटिव्ह रुग्ण : ३७५
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : १४२७
एकूण निगेटिव्ह रुग्ण : १८५२१
तपासणी अहवाल प्रलंबित : २४१
आज बरे होऊन घरी परतलेले व्यक्ती : ३११
एकूण बरे होऊन घरी परतलेले व्यक्ती : ९७५४
विभागवार कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या :
बेलापूर : ८८
नेरुळ : ६५
वाशी : ३१
तुर्भे : २१
कोपरखैरणे : ६१
घणसोली : ५७
ऐरोली : ४७
दिघा : ०५
विभागवार निगेटिव्ह नोंदीत एकूण रुग्ण संख्या :
बेलापूर : ४१
नेरूळ : ४०
वाशी : ४६
तुर्भे : ५७
कोपरखैरणे : १८
घणसोली : ४६
ऐरोली : ५१
दिघा : १२
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.