Skip to main content

कोरोना अपडेट: उलवे नोड येथील कोविड-१९ हॉस्पिटल संदर्भातील आढावा बैठक संपन्न.!!!

कोरोना अपडेट: उलवे नोड येथील कोविड-१९ हॉस्पिटल संदर्भातील आढावा बैठक संपन्न..!!!


सिडकोमार्फत १० कोटी रुपये मंजूर केल्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीची बैठक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच समितीचे पदाधिकारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. गिरीष गुणे, त्यांचे सहकारी, समितीचे उपाध्यक्ष मा.श्री. बबनदादा पाटील, तसेच सिडकोचे अधिकारी यांच्या समवेत पार पडली.



पनवेल(प्रतिनिधि)- उलवे नोड, उरण, पनवेल परिसरातील जनतेसाठी सिडको कडून मंजूर झालेल्या कोविड हॉस्पिटल संदर्भात २९ जुलै रोजी आढावा बैठक घेण्यात आली, लोकनेते. दि. बा. पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीचेअध्यक्ष. माजी खासदार श्री. रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी सुमारे २ ते ३ तास प्रदीर्घ चर्चा झाली या आढावा बैठकीसाठी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष श्री बबनदादा पाटील, सचिव श्री महेंद्रजी घरत, श्री रवीशेठ पाटील. तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ श्री गिरीष गुणे सर आणि त्यांचे पदाधिकारी आणि इतर उपस्थित होते. 


या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोविड १९ चे हॉस्पिटल कसे असावे तर साधारणता २०० बेडच हॉस्पिटल असेल तर त्या मध्ये १५० बेड हे नॉर्मल असतील, तर ५० बेड मधे स्पेशली व्हॅटिलेटर व ऑक्सिजन ची व्यवस्था असेल, तसेच तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉय, यांचा स्टाफ किती असावा आणि हॉस्पिटल किती उच्च दर्जाचे असावे या बद्दल ची चर्चा करण्यात आली त्याच वेळीस या विभागात मोठया प्रमाणात सिडकोची नागरी वस्ती वसवल्या आहेत परंतु कुठल्याही सोई- सुविधा दिल्या नाहीत तेव्हा आता सिडकोने या सुविधांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. 


तसेच, आमची अशी मागणी आहे कि सिडकोनी या विभागात केवळ कोविड १९ चा विचार न करता या ठिकाणी कायम स्वरूपी एम्सच्या धर्तीवर सुसज्य हॉस्पिटल निर्माण करावे आणि हे आपले उत्तरदायित्वच आहे. आणि ठिकाणच्या गोर -गरीब जनतेला न्याय द्यावा अशी परखड चर्चा आज सिडको आणि सर्व पक्षीय संघर्ष समिती यांच्यात झाली आहे. 



यावर बोलतांना सिडको अधिकारी यांनी सांगितले कि कोविड १९ हॉस्पिटल साठी आपण १० कोटी रुपये दिले आहेत अद्याप काही त्यात जर कुठली अडचण आली तर अधीक फंड देण्यात येईल परंतु हे सुसज्य हॉस्पिटल कसा लवकरात लवकर पूर्ण करून लोकांच्या सेवेसाठी देता येईल हाच आमचा प्रयत्न राहणार आहे त्या साठी आम्ही रोटरी क्लब ची मदत घेणार आहोत. असे सिडको अधिकारी यांनी यावेळेस संगितले. 


आज झालेली बैठक हि खुप व्यापकविचाराने पार पडली 
या बैठकीला लोकनेते दि बा पाटील साहेब सर्व पक्षिय संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार मा.श्री. रामशेठ ठाकूर साहेब, समितीचे उपाध्यक्ष मा.श्री. बबनदादा पाटील, समितीचे सचिव मा श्री महेंद्रजी घरत साहेब, श्री साई देवस्थान चे विश्वस्त मा.श्री. रवीशेठ पाटील आणि रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ श्री गिरीष गुणे सर, तसेच त्यांचे सहकारी आणि सिडको अधिकारी हे उपस्थित होते.


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे