पनवेल अपडेट: पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन ४० रूग्ण; तर २७ जणांना घरी सोडण्यात आले:
पनवेल: पनवेल ग्रामीण भागात २८ जुलै रोजी कोरोनाचे नवीन ४० कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून २७ रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच, आजपर्यंतच्या एकूण १९६६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण १५२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर ४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे ४०० एॅक्टिव रूग्ण आहेत.
पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन ४० रूग्ण:
आज नोंद झालेल्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये उलवे येथील १०, चिंध्रण येथील ६, गव्हाण येथील ५, करंजाडे येथील ५, सुकापूर येथील ३, आजीवली येथील २ तसेच, आपटे, आरीवली, भोकारपाडा, चिपळे, केळवणे, कोळखे, पाले बुद्रुक, वाजे, पळस्पे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
पनवेल ग्रामीण भागात २७ रूग्णांना घरी सोडण्यात आले:
आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये उलवे येथील ८, करंजाडे येथील ५, पाले बुद्रुक येथील २, कराडे खुर्द येथील २, तसेच सुकापूर, आदई, आंबीवली, भिंगार, चिखले, डेरीवली, कोळवाडी, पोयंजे, शिरढोण, विचुंबे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.