Skip to main content

कोरोना अपडेट: कल्याण-डोंबिवली महापालिके कडुन कोरोना साथीच्या रोगाला प्रतिबंध म्हणून सोडियम हायपोक्लोराईड विशेष फवारनी मोहिम: 

कोरोना अपडेट: कल्याण-डोंबिवली महापालिके कडुन कोरोना साथीच्या रोगाला प्रतिबंध म्हणून सोडियम हायपोक्लोराईड विशेष फवारनी मोहिम:


 


कल्याण (प्रतिनिधि/कल्पेश सोनार)- कोरोना साथीला प्रतिबंध करण्यासाठी महापालिका अनेकविध प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून आज सोडियम हायपोक्लोराईडचा वापर करून जंतुनाशक विशेष फवारणी आणि पावसाळ्यातील आजाराला/डासांना प्रतिबंध करण्यासाठी धुरावणी अशा विशेष मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी ७.०० वाजता महापालिका महापौर विनिता राणे, पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सभागृह नेते प्रकाश पेणकर आणि ३/क प्रभाग समिती सभापती शकिला गुलाम दस्तगिर खान,पालिका सदस्य विश्वनाथ राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण(प) येथील शिवाजी चौक येथून झाला. 


या विशेष मोहिमेसाठी, फवारणीसाठी नागरिकांनी आज रस्त्यावर गर्दी करू नये व रस्ते मोकळे ठेवावे असे आवाहन कालच महानगर पालिकेमार्फत करण्यात आले होते. आज सकाळी ७.०० वाजता पासूनच दुपारी दोन वाजेपर्यंत अग्निशमन विभागाच्या ७ फायर टेंडर व ३५ कर्मचाऱ्यांसह मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सोडियम हायड्रोक्लोराईडच्या वापर करून २/ब व ३/क प्रभागाच्या संपूर्ण परिसरात फवारणी करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ३१ सिटी गार्ड जेट मशीन, ४ जीप मोउंटेड फॉगिंग मशीन तसेच छोट्या गल्ली बोळात ५ हँड पंप मशीन व ३५ हँड फॉगर मशीनच्या मदतीने २/ब व ३/क प्रभागातील सर्व आरोग्य निरीक्षक व सुमारे १०० आरोग्य कर्मचारी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे व सहा.सार्वजनिक आरोग्य अधिकारी अगुस्टीन घुटे यांचे मार्गदर्शनाखाली २/ब व ३/क प्रभागक्षेत्रातील संपुर्ण परिसरात फवारणी व धुरावणी केली. 



सदर जंतुनाशक विशेष फवारणी व धुरावणी डोंबिवली पूर्व येथील ६/फ, ८/ग, ९/आय व १०/ई प्रभागात आज दुपारपासून सुरू करण्यात येणार आहे. डोंबिवली पूर्व मधील या विशेष मोहिमेचा प्रारंभ आज ३.०० वाजता इंदिरा चौक डोंबिवली पूर्व येथून पासून महापौर विनिता राणे आणि पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.


या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यातमांडा टिटवाळा, कल्याण पूर्व व डोंबिवली पश्चिम परिसरात पुढील रविवारी ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे