Skip to main content

कोरोना अपडेट: किडनी व्याधी रुग्णांच्या दिमतीला ४ डायलिसिस मशिन्स सज्ज..!!!

कोरोना अपडेट: किडनी व्याधी रुग्णांच्या दिमतीला ४ डायलिसिस मशिन्स सज्ज..!!!



कल्याण-डोंबिवली(प्रतिनिधि/कल्पेश सोनार): कोव्हीडच्या महाभयंकर परिस्थितीत डायलिसिस रुग्णांचे होत असलेल्या हालाखीची दैनिक पुढारीने २३ जुलैच्या अंकामध्ये कल्याण-डोंबिवलीत डायलिसिस रुग्णांचे हाल या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट सहसंचालित रोटरी विकास ट्रस्टने दखल घेतली. शनिवारी क्लबच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ट्रस्टच्यावतीने रोटरी डायलिसिस सेंटरचे उद्घाटन केले. या क्लबने किडनी व्याधी रुग्णांच्या दिमतीला ४ मशिन्स सज्ज झाली असून या मशिन्सद्वारे सेवा देखिल सुरू करण्यात आली आहे.


रोटरीचे माजी प्रांतपाल सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्याहस्ते या सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्यावतीने ४ डायलिसिस मशिन्स एमआयडीसीतील आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलला प्रदान करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे अध्यक्ष संतोष भणगे, क्लब सेक्रेटरी संदीप येल्लूरकर यांच्यासह ज्येष्ठ रोटेरिअन उपस्थित होते. रो. सुशिल सोनी, आचार्य ग्रुपचे रो. आनंद आचार्य, डीके फ्लॅग फाऊंडेशनचे सर्वेसर्वा फ्लॅगमॅन डॉ. राकेश बक्षी, ग्लोब ग्रुपचे रो. माधव सिंह व कल्याण-डोंबिवली रनर्स ग्रुपचे या उपक्रमात मोलाचे योगदान आहे. 


लाॅकडाऊनची सर्व बंधने पाळून रोटरी अध्यक्ष संतोष भणगे यांनी यानिमित्ताने क्लबच्या एका अत्यंत महत्वाकांक्षी वैद्यकीय उपक्रमाचे स्वप्न पूर्ण केले. आश्रय ट्रस्टच्यावतीने डॉ. अरुण पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच आश्रय ट्रस्टच्यावतीने रोटरीचे या अत्यंत निकडीच्या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल आभार मानले होते. याप्रसंगी डॉ. अरुण पाटील म्हणाले, आश्रय हाॅस्पिटलमध्ये २० पेक्षा अधिक नविन रुग्ण डायलिसिस उपचार घेत आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्ण संख्या देखिल वाढली आहे. रोटरीने ४ नविन मशीन दिल्यामुळे डायलिसिस रुग्णांना खूपच फायदा होणार आहे. तसेच या रुग्णांची होणारी गैरसोय कमी आहे. गेल्या ३ दिवसांत कोव्हीड निगेटिव्ह असणाऱ्या व डायलायसिसची गरज असणाऱ्या रुग्णांना आश्रयमध्ये सेवा मिळू शकेल. त्यामुळे गरजू रुग्णांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा, असेही आवाहन डॉ. पाटील यांनी यावेळी बोलताना केले.


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे