कोरोना अपडेट: सलाम त्या कोरोना योध्यांना!
कल्याण(प्रतिनिधि/कल्पेश सोनार)- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनेक पोलिस बंधू-भगिनी जीवाचं रान करून आपल्या देशासाठी व शहर, विभागासाठी झटत आहेत. आज या कोरोना महासंकटाच्या काळात कित्येक कर्मचारी कोव्हिड पॉसिटीव्ह होऊन त्यावर उपचार घेऊन आज सुखरूप बरे झाले आहेत व पुन्हा एकदा आपल्या देशासाठी त्यांचे कर्तव्य पार पडण्यास सज्ज झाले आहेत. अश्या अनेक कोरोना योध्यांना "आजची उद्योग नगरी News" कडुन मानाचा सलाम!
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.