कोरोना अपडेट: पनवेल महानगरपालिा क्षेत्रात कोरोनाचे ९१ नवे रूग्ण; तर १०५ जणांना घरी सोडण्यात आले:
पनवेल: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २८ जुलै रोजी कोरोनचे ९१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १०५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दुर्दैवी बाब म्हणजे खारघर आणि नवीन पनवेल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आजचे नवीन रूग्ण:
कळंबोलीतील २१, खारघरमधील १९, पनवेलमधील १८, कामोठ्यातील १४, नवीन पनवेलमधील १०, खांदा कॉलनीतील २, तळोजा वसाहतीमधील २, तसेच आसुडगाव, घोट भोईरवाडा, तळोजा आरएएफ कँप, तळोजा जेल क्वाटर्स येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
तसेच, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल पालिका क्षेत्रातील एकूण ६२२४ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ४६१८ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून १५२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १४५४ ऍक्टिव रूग्ण आहेत.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.