पनवेल अपडेट: पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन ४६ रूग्ण; तर एकाचा मृत्यू व ४८ जणांना घरी सोडण्यात आले:
पनवेल अपडेट: पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे नवीन ४६ रूग्ण; तर एकाचा मृत्यू व ४८ जणांना घरी सोडण्यात आले:
पनवेल: पनवेल ग्रामीण भागात २७ जुलै रोजी कोरोनाचे नवीन ४६ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून ४८ रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच विहीघर येथील प्रत्येकी एका रूग्णाच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. संबंधित रूग्णाचा २५ जुलै रोजी मृत्यू झाला असून त्यांचा 'डेथ समरी रिपोर्ट' आज मिळाल्याने त्यांची आज नोंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, आजपर्यंतच्या एकूण १९२६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण १४९५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर ४४ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे ३८६ ऍक्टिव रूग्ण आहेत.
पनवेल ग्रामीण भागात आजचे कोरोनाचे नविन ४६ रूग्ण:
आज नोंद झालेल्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये उलवे येथील ६, सुकापूर येथील ५, गिरवले येथील ४, पळस्पे येथील ३, करंजाडे येथील ३, आदई येथील २, चावणे येथील २, डेरवली येथील २, रिटघर येथील २, ठोंबरेवाडी-खानावले येथील २, तसेच आजीवली, बोर्ले, चिंचपाडा-वडघर, गव्हाण, गुळसुंदे, जांभिवली, कराडे खुर्द, नेरे, पारगाव, सवणे, शिरढोण, शिवकर, उसर्ली, वलप, विचुंबे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
पनवेल ग्रामीण भागात ४८ रुग्णांना घरी सोडण्यात आल:
आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये उलवे येथील ८, डोलघर येथील ६, आजीवली येथील ४, सुकापूर येथील ४, आकुळवाडी येथील ३, आदई येथील २, मोहा येथील २, करंजाडे येथील २ तसेच डेरवली, गव्हाण, गुळसुंदे, कराडे खुर्द, पारगाव, रिटघर, उसर्ली, वलप, चिखले, देवद, कासप, कोळखे, कोपर-गव्हाण, न्हावा, नितळस, ओवळे, वावेघर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.