Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

कोरोना अपडेट : खोपोली येथील "रमाधाम वृद्धाश्रमात" नुतन वास्तू कार्यक्रम संपन्न :

कोरोना अपडेट : खोपोली येथील "रमाधाम वृद्धाश्रमात" नुतन वास्तू कार्यक्रम संपन्न : पनवेल (खोपोली/प्रतिनिधी) : खोपोली येथिल "रमाधाम वृद्धाश्रमाच्या" नुतन वास्तूच्या वास्तुशांती चा कार्यक्रम २९ ऑगस्ट रोजी सकाळी जेष्ट पाहुण्याच्या उपस्तिथित संपन्न झाला, या वेळेस माननीय श्री. सुभाषजी देसाई साहेब, श्री. अनिलजी देसाई, श्री. आदेशजी बांदेकर, श्रीमती रमाबाई केशव ठाकरे संस्थेचे अध्यक्ष श्री. चंदुमामा वैद्य, श्री. बबनदादा पाटील, श्री. महेंद्रजी थोरवे यांच्या उपस्थितीत पार पडला. "आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला सुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणाची, आपली काळजी घेतली जाण्याची गरज निश्चित असते. तेथे पैसा, मालमत्ता काहीही उपयोगी पडणार नाही याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवणे ही काळाची गरज बनलेली आहे. प्रत्यक्ष तिथे जाणे ही वेगळी गोष्ट, पण जाण्याची मानसिकता तयार करायला सुरुवात केली तर सर्व परिस्थितीकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात होईल हे नक्कीच", वृताशी बोलताना श्री. बबनदादा पाटील यांनी त्यांच्या मनातल्या भावना वृद्धाश्रमा बद्द्ल व्यक्त केल्या.     महत्त्वाची टीप : सर्वांन

कोरोना अपडेट : कै. दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी मा. श्री. बबनदादा पाटील यांची निवड: 

कोरोना अपडेट : कै. दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी मा. श्री. बबनदादा पाटील यांची निवड:  पनवेल (विशेष/प्रतिनिधि): पनवेल उरण महाविकास आघाडीच्या कै. दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी मा. श्री. बबनदादा पाटील जेष्ठ सल्लागार रायगड शिवसेना व सचिवपदी मा. श्री. सुदामदादा पाटील कार्याध्यक्ष पनवेल जिल्हा काँग्रेस यांची निवड झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन. आपल्या माध्यमातून पनवेल उरण भागातील प्रकल्पग्रस्तांना नक्कीच न्याय मिळवुन देण्याचे काम ह्या माध्यमातून करतील त्यामुळे पनवेल उरण तालुक्यातील सर्व नागरिकांनच्या मनात आनंदाचा उत्साह आहे श्री. कृष्णकांत कदम शिवसेना उपशहर प्रमुख कळंबोली.     महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

कोरोना अपडेट : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द होणार..!!!

कोरोना अपडेट : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द होणार..!!! नवी मुंबई (बातमी/नवी दिल्ली) : कोरोनाच्या संकटामुळे सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्ष वगळता परीक्षा रद्द करण्यात आल्या. तर, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशासह अन्य काही राज्यांनी अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याचे देखील जाहीर केले होते. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग(UGC) ने या राज्यांच्या विसंगत नियमावली जाहीर केली. UGC ने जाहीर केलेल्या नियमानुसार ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. महाराष्ट्रासह देशातील वाढती रुग्ण संख्या बघता विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून या परीक्षा घेणे शक्य नसल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली. राज्याचे मंत्री व युवसेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात UGC च्या या निर्देशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, यासह देशातील अन्य १३ राज्यांनी परीक्षा घेण्याबाबत असमर्थता दर्शवली होती. मागील सुनावणीमध्ये राज्य सरकारतर्फे युक्तिवाद करण्यात आला असून देशासह वाढत्या रुग्णसंख्येची सद्यस्थिती व धोका यादरम्यान मांडण्

कोरोना अपडेट : कोरोनाचं नाटक बंद करा, खरे प्रश्न काय आहे त्याच्या कडे सरकारने लक्ष द्यावं: प्रकाश आंबेडकर.

कोरोना अपडेट : कोरोनाचं नाटक बंद करा, खरे प्रश्न काय आहे त्याच्या कडे सरकारने लक्ष द्यावं: प्रकाश आंबेडकर. सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यात सध्या उद्भवलेल्या पूर परिस्थितीकडे गंभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा मोठं संकट राज्यावर येईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. नवी मुंबई (बातमी/मुंबई) : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं. ई-पास, सुशांतसिंह राजपूत, महाविकास आघाडी यावर त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ई पास बाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नवरा-बायको घरी एकत्र राहू शकतात, मात्र स्कूटरवर एकत्र बसू शकत नाहीत. अनोळखी लोकांसोबत प्रवास करायला मुभा दिलीय तर मग एका कुटुंबाला एकत्र जायला बंदी का? ठाकरे सरकार देखील मोदींच्या पावलावर पाऊल ठेवायला लागलं आहे. लोकांच्या वैयक्तिक गोष्टींवर निर्बंध आणणं बंद करा. कोविडचं नाटक बंद करून खऱ्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यात सध्या उद्भवलेल्या पूर परिस्थितीकडे गंभीर्याने लक्ष द्यावे अन्य

कोरोना अपडेट : दिलसादायक बातमी! वृद्धांमध्येही तयार होत आहे कोरोनाविरोधात इम्युनिटी, 'या' कंपनीला आल मोठं यश :

कोरोना अपडेट : दिलसादायक बातमी! वृद्धांमध्येही तयार होत आहे कोरोनाविरोधात इम्युनिटी, 'या' कंपनीला आल मोठं यश : कंपनीने एक निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. हे रिझल्ट अत्यंत सकारत्मक आहेत. कारण सर्वसामान्यपणे लशीचा परिणाम युवकांच्या तुलनेत वृद्धांवर फार कमी होत असतो. मात्र आलेल्या या रिझल्टमध्ये, ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांतही अँटीबॉडीजचे प्रमाण तरुणांच्या तुलनेत असल्याचे आढळून आले आहे. नवी मुंबई (बातमी/वॉशिंग्टन) - कोरोना विषाणू विरोधातील लस तयार करणारी कंपनी मोर्डेना (Moderna Inc) ला वृद्धांवर केलेल्या परीक्षणाचे उत्साहवर्धक व सकारत्मक रिझल्ट मिळाले आहेत. कंपनीने लशीच्या सुरुवातीच्या परीक्षणाचा नवा सेफ्टी डेटा जारी केला आहे. यात वृद्धांना कोरोना लस दिल्यानंतर इम्यून सिस्टममध्ये रिस्पॉन्स तयार झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यावरील परीक्षणात मोर्डेना (Moderna) च्या लशीने मोठ्या प्रमाणावर न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी तयार केली. सर्वसाधारनपणे वृद्धांवर कमी परिणाम होतो -  कंपनीने एक निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. हे रिझल्ट अत्यंत उत्साहवर्धक

कोरोना अपडेट : महागृहनिर्मितीतील सिडकोच्या घरांचा ताबा वर्षांअखेर मिळणार ; हप्ते भरण्यास मुदतवाढ..!!!!

कोरोना अपडेट : महागृहनिर्मितीतील सिडकोच्या घरांचा ताबा वर्षांअखेर मिळणार ; हप्ते भरण्यास मुदतवाढ..!!!! नवी मुंबई : दोन वर्षांपूर्वी सिडकोने जाहीर केलेल्या महागृहनिर्मितीतील पंधरा हजार घरांच्या सोडतीतील सुमारे साडेतीन हजार घरांचा ताबा वर्षांअखेपर्यंत दिला जाणार आहे. या घरांचा ताबा ऑक्टोबरमध्ये देण्याचे आश्वासन सिडकोने यापूर्वी दिले होते. करोना साथीचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीत या घरांचे बांधकाम ठप्प झाले होते. आता काम सुरू असून काम शेवटच्या टप्प्यात आहे. टाळेबंदीमुळे विद्युत आणि इतर आवश्यक कामे शिल्लक आहेत. केंद्र सरकारच्या सर्वासाठी घरे या योजनेअंर्तगत जास्तीत जास्त परवडणारी घरे बांधण्याची जबाबदारी सिडकोवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सिडकोने टप्प्याटप्प्याने दोन लाख घरे बांधण्याचे उदिष्ट नजरेसमोर ठेवले आहे. यातील १४ हजार ७३८ घरांची सोडत दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून ऑक्टोबरमध्ये काढण्यात आली होती. या सोडतीत भाग्यवंत ठरलेल्या ग्राहकांचे तिमाही हप्ते घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील दोन वर्षांत ग्राहकांनी बँक कर्ज घेऊन सोडतीत लागलेल्या घ

कोरोना अपडेट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय :

कोरोना अपडेट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय : नवी मुंबई (बातमी/मुंबई) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : ● राज्याच्या शहरी भागातील आरोग्य सेवेसाठी ७ नियमित पदांच्या निर्मितीस मान्यता. संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक या पदांचा समावेश. ● राज्यातील मच्छिमारांना मिळणार विशेष सानुग्रह अनुदान, मंत्रिमंडळाकडून अनुदान देण्यास मान्यता. ● वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांना १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी मिळणार करमाफी. टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. ● टाळेबंदीमुळे अतिरीक्त होणाऱ्या दूधापैकी प्रतिदिन १० लाख लिटर दुध स्विकारणे आणि रुपांतर योजना ऑक्टोबरपर्यंत राबविण्यास मान्यता. ● मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत

कोरोना अपडेट : मुद्रांक शुल्क होणार कपात; घर खरेदीदारांना मिळणार दिलासा :

कोरोना अपडेट : मुद्रांक शुल्क होणार कपात; घर खरेदीदारांना मिळणार दिलासा : बांधकाम क्षेत्राला मिळणार चालना  दि. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ३% १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत २ % नवी मुंबई (बातमी/पुणे) -  मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला आहे. या निर्णयानुसार खरेदी-विक्रीच्या दस्तावरील मुद्रांक शुल्क दि.१ सप्टेंबर २०२० पासून ते दि. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत या कालावधीत तीन टक्‍के, तर दि. १ जानेवारी २०२१ ते दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क २ टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे घर खरेदीदारांना दिलासा तसेच बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार आहे. करोनाच्या संकटामुळे विविध क्षेत्राला दिलासा देण्याबाबत शासन स्तरावरून चर्चा सुरू आहे. करोना विषाणू मुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन मुद्रांक शुल्कात कपात करावी, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. यावर थोरात यांनी मुद्रांक शुल्कात कपात करण्यासंदर्भातचा प्रस्

कोरोना अपडेट : लाखो वाहन धारकांनसाठी खुशखबर; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत :

कोरोना अपडेट : लाखो वाहन धारकांनसाठी खुशखबर; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत : देशात लॉकडाऊन लागू झाल्यापासूनच आर्थिक संकटात असलेल्या वाहनधारकांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यावसायिक वाहनधारकांना सहा महिन्यांसाठी रस्ते करातून सूट देऊ शकतात. लाखो वाहन धारकांना ११.४ लाख वर्षाला रस्ते कर भरावा लागतो. राज्य सरकार जवळपास ७०० कोटी रुपये माफ करणार आहे. नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधी) : राज्यातील वाहतूक क्षेत्राला वित्तीय सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्या ५ महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे वाहतूक क्षेत्राला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून अनेक वाहनधारक आर्थिक संकटात आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हा निर्णय घेणार आहेत. वाहतूक क्षेत्राला पुन्हा उभारी यावी यासाठी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळासाठी राज्यातील ११.४ लाख व्यावसायिक वाहनांना ७०० कोटी रुपयांची रस्ते कर माफी देण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतच्या हालचाली सुरू केल्या होत्या. सरकारी आकडेवार

कोरोना अपडेट : राज्यातील मच्छिमारांना विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय..!!!

कोरोना अपडेट : राज्यातील मच्छिमारांना विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय..!!! नवी मुंबई(बातमी/मुंबई) : प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या " क्यार " व " महा " या दोन चक्रीवादळामुळे मच्छीमारांना मासेमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल ६५ कोटी १७ लाख इतके विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला . रापणकार संघाचे सभासद असणाऱ्यांना प्रति सभासद १० हजार रुपये असे ४ हजार १७१ सभासदांना ४ कोटी १७ लाख , बिगर यांत्रिक नौकाधारकांना प्रत्येकी २० हजार प्रमाणे १ हजार ५६४ नौकाधारकांना ३ कोटी १२ लाख ८० हजार , १-२ सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे ४ हजार ६४१ जणांना ९ कोटी २८ लाख २० हजार , ३-४ सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी ३० हजार प्रमाणे १ हजार ५२६ जणांना ४ कोटी ५७ लाख ८० हजार , ६ सिलेंडर नौकाधारकांना प्रत्येकी ३० हजार रुपये प्रमाणे ७ हजार ६७१ जणांना २३ कोटी १ लाख ३० हजार रुपये , विक्रेता मच्छिमारांना ५० लि . क्षमतेच्या दोन शितपेटया पुरवठा प्रत्येकी ३ हजार प्रमाणे ३५ हजार जणांना २१ कोटी रुपये देण्यात येतील . य

कोरोना अपडेट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन ३७१ रूग्णांची नोंद; ०७ जणांचा मृत्यू तर ३३९ जणांना घरी सोडण्यात आले..!!

कोरोना अपडेट: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे नवीन ३७१ रूग्णांची नोंद; ०७ जणांचा मृत्यू तर ३३९ जणांना घरी सोडण्यात आले..!! नवी मुंबई- नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १२१८७० इतका असून २७ ऑगस्ट रोजी कोरोना विषाणूचे नवीन ३७१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच आज ३३९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले गेलेले आहेत. तर कोरोनामुळे आज ०७ जणांचा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाखला आहे.  नवी मुंबईमध्ये दिवसागणित वाढत असलेली कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच नवी मुंबईत लोकांची कोविड-१९ ची चाचणी वाढवण्यात आली आहे. यामध्ये २९२६१ जणांचा अहवाल हे निगेटिव्ह आले तसेच ४३७ जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. २७ ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण: तुर्भेमधील ४७, बेलापूरमधील ३९, कोपरखैरणेमधील ५८, नेरुळमधील ७७, वाशीतील ५५, घणसोलीमधील ४६, ऐरोलीमधील ४२, दिघ्यातील ०७ असे एकूण ३७१ नवीन कोरोनारुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.  आत्तापर्यंत नवी मुंबईत २०६५३ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून ते बरे होऊन घर

कोरोना अपडेट : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन १९२ रूग्ण; तर २ मृत्यूंची नोंद व १९८ जणांना घरी सोडण्यात आले:

कोरोना अपडेट : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन १९२ रूग्ण; तर २ मृत्यूंची नोंद व १९८ जणांना घरी सोडण्यात आले: पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत २७ ऑगस्ट रोजी कोरोनाचे नवीन १९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १९८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच २ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये कामोठे आणि नवीन पनवेल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच,  आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका क्षेत्रातील रुग्ण : एकूण १०,९६३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ९६५६ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २७३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १०३४ ऐक्टिव रूग्ण आहेत.        महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

कोरोना अपडेट : पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे नवीन ७१ रूग्ण; तर ३ जणांचा मृत्यू व ७६ जणांना घरी सोडण्यात आले:

कोरोना अपडेट : पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे नवीन ७१ रूग्ण; तर ३ जणांचा मृत्यू व ७६ जणांना घरी सोडण्यात आले: पनवेल : पनवेल ग्रामीण भागामध्ये २७ ऑगस्ट रोजी कोरोनाचे नवीन ७१ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून ७६ रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच ३ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये उलवे येथील २ तर आद‌ई येथील एका रूग्णाचा समावेश आहे. आद‌ई येथील एका रूग्णाचा २२ ऑगस्ट रोजी, दुसऱ्या रूग्णाचा २३ ऑगस्ट रोजी तर आद‌ई येथील रुग्णाचा ६ जुलै रोजी मृत्यू झाला आहे. या सर्व रूग्णांचा 'डेथ समरी रिपोर्ट' आज मिळाल्याने त्यांची आज नोंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच, आजपर्यंतच्या एकूण ३२९४ कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण २८०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर ६४ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे ४२९ ऐक्टिव रूग्ण आहेत. पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे ७१ नविन रूग्ण : आज नोंद झालेल्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये उलवे येथील १४, सुकापूर येथील ११, मालेवाडी-सुकापूर येथील ६, देवद येथील ५, करंजाडे येथील ५, आद‌ई येथील ४, कोन

कोरोना अपडेट : मुख्यमंत्री यांनी दिले लॉकडाउन बद्द्ल संकेत; १ सप्टेंबरनंतरही राज्यातील निर्बंध कायमच :

कोरोना अपडेट : मुख्यमंत्री यांनी दिले लॉकडाउन बद्द्ल संकेत; १ सप्टेंबरनंतरही राज्यातील निर्बंध कायमच : नवी मुंबई(मुंबई/प्रतिनिधि): जून महिन्यापासून राज्यात मिशन बिगीन अगेन सुरु करुन लॉकडाउनचे नियम टप्प्या टप्यानं शिथिल करण्यात येत आहेत. काही राज्यांनी पटापट निर्णय घेऊन व्यवहार सुरळीत केले आहेत. असे असले तरीही महाराष्ट्र सरकार कोणतही घाई करणार नाही. त्यामुळे एक सप्टेंबरपासून राज्यात लॉकडाउन पूर्णपणे उठणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीदरम्यान दिले आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीमधील करोना नियंत्रण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी या तिन्ही पालिकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठाणे पालिका मुख्यालयात बैठक घेतली. आपण यापूर्वी बऱ्याच गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली आहे, मात्र उर्वरित काही गोष्टी सुरू करता येणार नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी एक सप्टेंबरनंतरही राज्यात निर्बंध आणखी काही काळ कायम ठेवण्याचे संकेत दिले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. परंतु त्याने हुरळू

कोरोना अपडेट : नवी मुंबई, केडीएमसीत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे; मात्र ठाणे, उल्हासनगर भिवंडीमध्ये कोरोना नियंत्रणात :

कोरोना अपडेट : नवी मुंबई, केडीएमसीत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे; मात्र ठाणे, उल्हासनगर भिवंडीमध्ये कोरोना नियंत्रणात : नवी मुंबई (ठाणे/प्रतिनिधि) : ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनांनी केलेल्या उपाययोजनांमुळे ठाणे शहरा पाठोपाठ भिवंडी, उल्हासनगरमध्ये दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील पंधरवड्यापासून घट झाली आहे. तसेच या शहरांमध्ये कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. परंतु, दुसरीकडे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मात्र दररोज रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या दोन्ही शहरांत संसर्ग रोखण्याचे आव्हान कायम आहे. ठाणे जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढते होते. मात्र, त्यानंतर बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस कमी-जास्त असा चढउतार दिसून येत आहे. मागील पंधरवड्यापासून मात्र ठाणे शहरासह भिवंडी आणि उल्हासनगर या शहरांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात तर कोरोनामुक्तीचे प्रमाण सर्वाधिक असून ते राज्यात प्रथम तर देशात दुसर्या क्

कोरोना अपडेट : पुण्यात ऑक्सफर्डच्या लसीची देशातील पहिली मानवी चाचणी सुरु..!!!

कोरोना अपडेट : पुण्यात ऑक्सफर्डच्या लसीची देशातील पहिली मानवी चाचणी सुरु..!!! नवी मुंबई (पुणे/प्रतिनिधि) : पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये २ स्वयंसेवकांना ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस देण्यात आला. ऑक्सफर्डच्या लसीची देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात करण्यात आली अशी माहिती डॉ. संजय ललवाणी यांनी दिली. या दोन स्वयंसेवकांना ०.५ एमएलचा डोस देण्यात आला. पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्रकल्पात या लसीचे उत्पादन झाले आहे. प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना करोना लसीचा डोस दिला. आधी आवश्यक वैद्यकीय तपासण्याकेल्यानंतर हा डोस देण्यात आला. लसीचे काही साईड इफेक्ट होतात किंवा नाही हे तपासण्यासाठी या दोन्ही स्वयंसेवकांना काही तास रुग्णालयात थांबावे लागणार आहे. पुढचे काही दिवस या स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेऊन असणार आहेत. २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल. या लसीसाठी चाचणी प्रक्रिया मंगळवारपासून सुरु झाली होती. मंगळवारी या चाचणी प्रक्रियेचा भाग म्हणून तीन पुरुष आणि महिलांची तपासणी करण्यात आली. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेन्नर इन्स्ट

कोरोना अपडेट : उद्धव ठाकरे सरकारने केलं स्पष्ट ई-पास सुरु राहणार की बंद करणार..!!!!

कोरोना अपडेट : उद्धव ठाकरे सरकारने केलं स्पष्ट ई-पास सुरु राहणार की बंद करणार..!!!! नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधि) : राज्यात करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत ई-पास बंद केला तर करोनाचा प्रसार वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आणखी काही काळ तरी ई-पास सुरू ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे सध्या तरी ई-पास बंद करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही, असं राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. ते नागपुरात बोलत होते. केंद्र सरकारने ई-पास बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला असला तरी राज्यात सध्या तरी ई- पासची अट रद्द करण्याची सरकारची भूमिका दिसत नाही. राज्यात करोना रुग्णवाढीमुळे काही काळ तरी ई- पास सुरू ठेवण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. एसटी बसमधून ई-पासविना प्रवासाची मुभा असताना खासगी वाहनांना मात्र हा पास बंधनकारक आहे. त्यामुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या सरकारने ई-पासच्या धोरणाबाबत फेरविचार सुरू केला होता. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यामुळे यावर लवकरच निर्ण

कोरोना अपडेट : आता मुंबई एअरपोर्टनंतर नवी मुंबई विमानतळ गेले अदानी समूहाच्या घशात..!!!!

कोरोना अपडेट : आता मुंबई एअरपोर्टनंतर नवी मुंबई विमानतळ गेले अदानी समूहाच्या घशात..!!!! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे २२६८ हेक्टर जागेरव सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ उभारले जात आहे. नवी मुंबई (विशेष/प्रतिनिधि) : देशाभरातील ६ विमानतळांच्या व्यवस्थापनाचा ठेका असलेल्या अदानी ग्रुपने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ७४ टक्के भाग खरेदी करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे सुत्राकडुन समजते. तसे झाल्यास मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. (मिआल) या जीव्हीके समूहाच्या कंपनीचे अधिकार संपुष्टात येणार आहेत. परिणामी, प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळसुद्धा अदानी ग्रुपच्या घशात जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे २२६८ हेक्टर जागेरव सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ उभारले जात आहे. या विमानतळाचे कंत्राट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणार्या जीव्हीके समूहाला देण्यात आले आहे. नवी मुंबई आंत

कोरोना अपडेट : नागपाडा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत - पालकमंत्री अस्लम शेख :

कोरोना अपडेट : नागपाडा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत - पालकमंत्री अस्लम शेख : इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत निवाऱ्याची व्यवस्था करण्याबाबत गृहनिर्माण मंत्र्यांशी चर्चा करुन येत्या आठवड्याभरात निर्णय घेणार. नवी मुंबई(मुंबई/प्रतिनिधि): मुंबईतील नागपाडा परिसरातील शुक्लाजी रोडवरील अब्दुल रहमान इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांनी दिली आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या या दुर्घटनेत एकुण २ जण जखमी झाले असून एका ७० वर्षांच्या वृद्धेसह १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. घटनेबद्दल माहिती मिळताच मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. गृहनिर्माणमंत्री ना.श्री. जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन दुर्घटनाग्रस्तांची तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा निर्णय आठवड्याभरात घेण्याची ग्वाही ना. शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक

कोरोना अपडेट : Breaking News - तुकाराम मुंडेची अखेर नागपुर मधून बदली..!!!!

कोरोना अपडेट : Breaking News - तुकाराम मुंडेची अखेर नागपुर मधून बदली..!!!! नवी मुंबई (नागपुर/प्रतिनिधि) - नागपूर महानगरपालिकेतील भाजपा नगरसेवकांसोबतचा झालेला वाद आयुक्त तुकाराम मुंढे यांना भोवला आहे. मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सचिवपदी बदली करण्यात आली आहे. राज्याचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी यासंदर्भात बुधवारी आदेश जारी केले. मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर राधाकृष्णन बी.  नागपुरचे नवीन मनपा आयुक्त राहणार आहेत.         महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

कोरोना अपडेट : सिडकोचे नविन व्यवस्थापकीय संचालक अधिकारी यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यासाठी दिले निवेदनपत्र : 

कोरोना अपडेट : सिडकोचे नविन व्यवस्थापकीय संचालक अधिकारी यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यासाठी दिले निवेदनपत्र :  नवी मुंबई(बेलापुर/प्रतिनिधि):- सिडको महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक भारतीय प्रशासकीय अधिकारी डॉ. संजय मुखर्जी यांची रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार व प्रकल्पग्रस्तांचे नेते श्री. बबनदादा पाटिल यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. शिरिषजी घरत व राष्ट्रवादीचे नेते श्री. सुदामजी पाटील यांच्यासह भेट घेऊन नियुक्तीबद्दल अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, सिडकोचे पूर्वीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्याकडून सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे डॉ. संजय मुखर्जी यांना दिनांक १९ ऑगस्ट २०२० रोजी देण्यात आली.  दरम्यान, डॉ. मुखर्जी यांच्याकडे प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या त्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याबाबतचे निवेदन देउन लवकरच प्रकल्पग्रस्तांशी निगडीत संवाद साधण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्याची विनंती केली आहे.     महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या

कोरोना अपडेट : काँग्रेसच्या ११ आमदार नाराज उपोषणाला बसण्याचा निर्णय; ठाकरे सरकारसमोर मोठं आव्हान :

कोरोना अपडेट : काँग्रेसच्या ११ आमदार नाराज उपोषणाला बसण्याचा निर्णय; ठाकरे सरकारसमोर मोठं आव्हान : काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल हे राज्यातील ठाकरे सरकारवर नाराज आहेत. ठाकरे सरकार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याने उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नवी मुंबई (बातमी/मुंबई) : ठाकरे सरकारमधील मानापमान नाट्य काही थांबताना दिसत नाही. निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतलं जात नाही हा काँग्रेसने घेतलेला आक्षेप ताजा असतानाच आता निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या काही आमदारांनी केला आहे. या आमदारांनी सरकारच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे. काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल ठाकरे सरकारवर नाराज आहे. ठाकरे सरकार निधी वाटपात दुजाभाव करत आहे. त्यावर आम्ही नाराज आहोत. सर्वांना मतदारसंघात काम करायचं आहे. त्यामुळे निधी वाटप समानपद्धतीने झालं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. आम्ही राज्यातील काँग्रेस नेतृत्वाकडे आमची नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील ११ आमदार नाराज अस

कोरोना अपडेट : विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात १ लाख वारकरी आंदोलन करणार :

कोरोना अपडेट : विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात १ लाख वारकरी आंदोलन करणार : पुरोगामी प्रकाश आंबेडकर सनातनी वारकरी संप्रदयासोबत आंदोलनात उतरणार असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले असल्याचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे म्हणाले. आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्यास दोन लाख वारकऱ्यांसह विठ्ठल मंदिरात प्रवेश करणार असल्याचा इशारा वंचितने दिलाय. नवी मुंबई (बातमी/पंढरपूर ) : यापूर्वी दलितांना विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींचं आंदोलन सर्वश्रुत आहे तर सर्व धर्मियांना प्रवेश देण्यासाठी विनोबा भावे यांचेही आंदोलन जनता विसरलेली नाही. आता मात्र कोरोनामुळे गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना १ लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व पुरोगामी नेते प्रकाश आंबेडकर करणार असल्याने याचा धसका प्रशासनाने घेतला असल्याचे वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे म्हणाले. वास्तविक वारकरी संप्रदाय हा सनातनी संप्रदाय असताना देवाचे अस्तित्व न मानणारे आंबेडकरांकडे याचे नेतृत्व आल्याने आंद

कोरोना अपडेट : पाटण भूषण सातारा जिल्ह्यातील रत्न महाराष्ट्रविर कॅप्टन अमोल शिवाजी यादव यांचा सत्कार:

कोरोना अपडेट : पाटण भूषण सातारा जिल्ह्यातील रत्न महाराष्ट्रविर कॅप्टन अमोल शिवाजी यादव यांचा सत्कार: नवी मुंबई (बातमी/सातारा) : युवा संघर्ष संस्थेतर्फे पाटण भूषण कॅप्टन अमोल शिवाजी यादव यांचा विमान निर्मितीबद्धल सत्कार करण्यात आला. इमारतीच्या गच्चीवर तयार केलेले हे विमान. विमानाला भरारी आणि जग प्रवासासाठी केंद्र सरकारची रितसर परवानगी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळाली आहे. विमानाचा जनक कॅप्टन अमोल यादव हे आहेत. रिपब्लिकन नेते आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा. शिवाजी यादव यांचे अमोल यादव चिरंजीव आहेत . प्रा.यादव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या "The Problem of Rupee : It's origin and solution" केलेला अनुवाद प्रसिद्ध आहे . या प्रसंगी युवा संघर्ष संस्थेचे पदाधिकारी विनोद जेटीथोर , अरुण खरात , सचिन बल्लाळ , निलेश रोकडे व अमोल जगधनी यांनी कॅप्टन यांच्याबरोबर चर्चा - विनिमय करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अमेरिकेतून प्रशिक्षण घेऊन भारतात आल्यानंतर स्वतः आणि मित्रांच्या सहाय्याने विमान विकत घेऊन आपणही भारतात विमान निर्मिती करावी. अशी संकल्पना कॅप्टन यांनी कृतीत आणली. आणि अथक परिश्

कोरोना अपडेट : "WHO" च्या प्रमुखांनी केला खुलासा कोरोना विषाणू नष्ट होण्यास लागू शकतील २ वर्षं :

कोरोना अपडेट : "WHO" च्या प्रमुखांनी केला खुलासा कोरोना विषाणू नष्ट होण्यास लागू शकतील २ वर्षं : नवी मुंबई (विशेष/प्रतिनिधी)- कोरोना व्हायरस जगातून नष्ट होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉ. टेड्रोस अॅधेनॉम घेब्रेयेसूस यांनी केलं आहे. शुक्रवारी २१ऑगस्ट रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनिव्हा येथील मुख्यालयात माध्यमांशी बोलताना डॉ. टेड्रोस अॅधेनॉम घेब्रेयेसूस म्हणाले, “आशा आहे की दोन वर्षांच्या आत कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊ.” १९१८ मध्ये आलेली स्पॅनिश फ्लूची साथ संपण्यासही दोन वर्षांचा काळ लागला होता, असंही डॉ. घेब्रेयेसूस म्हणाले. सध्या जग पूर्वीपेक्षा जास्त एकमेकांशी जोडलेलं आहे. अशा स्थितीत व्हायरस पसरण्यासाठी जास्त वाव मिळतो. पण सध्या तंत्रज्ञानानेही प्रगती केली आहे, त्यामुळे कमी वेळेत कोरोना नष्ट करण्याची आपल्याकडे क्षमता देखील आहे,” असं घेब्रेयेसूस यावेळेस म्हणाले.     महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दह

कोरोना अपडेट : 'वंचित'च्या पुढाकाराने स्थानिकांना रोजगारात प्राधान्य..!

कोरोना अपडेट : 'वंचित'च्या पुढाकाराने स्थानिकांना रोजगारात प्राधान्य..! नवी मुंबई (बातमी/पुणे) - पिंपरी चिंचवड शहरातील अण्णासाहेब मगर स्टेडियम या ठिकाणी कोविड सेंटरचे २००० बेडचे काम चालू आहे. या कोविड सेंटरमध्ये कामासाठी भरती चालू आहे. हे समजताच वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराचे युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील, महासचिव ईश्वर भाऊ कांबळे, रहिम भाई सय्यद, विट्ठलनगर शाखेचे युवा नेत्तुव शरद वाघमारे, नरेश मस्के, अमोल जावळे, शशिकुमार टोपे, नितीन कसबे, संदीप वाघमारे, सूर्यकांत जावळे आदि. कार्यकर्ते यांनी कोविड सेंटरला जाऊन संबंधित ठेकेदाराशी चर्चा करुन स्थानिक नागरिकांना कामासाठी प्राधान्य देण्यात यावे ही विनंती केली व त्यानी आमच्या विनंतीला मान देऊन स्थानिकांना प्राधान्य दिले.  विट्ठल नगर मधील बेरोजगार नागरिकांना व महिलांना, मुलांना कोविड सेंटरमध्ये हाताला काम मिळाले. विट्ठल नगर पुनर्वसन प्रकल्प या ठिकाणी या सर्वांचे फॉर्म भरुन घेण्यात आले. आज असे लक्षात आले की विट्ठलनगरमध्ये बरेच नागरिक या लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झाले आहेत. व काही लोकांच्या नोकऱ्या, कामापासुन वंचित झाले आहेत. काम

कोरोना अपडेट : भारता मधून फरार नित्यानंदची बँक आणि चलनही !!!!

कोरोना अपडेट : भारता मधून फरार नित्यानंदची बँक आणि चलनही !!!! नवी मुंबई (बातमी/नवी दिल्ली) - भारतात बलात्काराच्या आरोपानंतर १७ हजार कोटी रूपये घेउन विदेशात परागंदा झालेला स्वामी नित्यानंद याने आणखी एक संदेश जारी केला आहे . त्यानुसार ' हिंदू रिझर्व्ह बँक ' आणि आपले स्वत : चे चलन सुरू करणार असल्याची घोषणा त्याने केली आहे . भारतातून फरार झाल्यानंतर नित्यानंद याने दक्षिण अमेरिकेत ' कैलासा ' नावाचा स्वतंत्र देश स्थापन केल्याचे जाहीर केले होते . त्याच्या या घोषणेनंतर अनेक स्वयंसेवी संस्था आणि खासगी संस्थांचे जाळे त्याच्या पाठीशी असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे . नित्यानंद प्रकरणात भारतातील एका प्रख्यात माध्यम समूहाने लक्ष घातले होते व त्याच्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे . त्यानुसार अमेरिका , आशिया आणि ब्रिटनमधील अनेक संघटना नित्यानंद याच्याशी संबंधित असल्याची नवी माहिती समोर आली आहे . या संघटनाच नित्यानंदचा कथित देश कैलासा आणि त्याची नवी बँक आणि त्याच्या चलनाचा मुलाधार असल्याचे समोर येत आहे . नित्यानंदने अलिकडेच एक व्हिडीओ जारी केला होता . त्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्य

कोरोना अपडेट : हिंदुस्थानात एक असे झाड; राज्य सरकार करते लाखो खर्च व २४ तास सुरक्षा रक्षक तैनात:

कोरोना अपडेट : हिंदुस्थानात एक असे झाड; राज्य सरकार करते लाखो खर्च व २४ तास सुरक्षा रक्षक तैनात: हिंदुस्थानात एक असे झाड आहे त्याला फक्त VIP नव्हे तर VVIP ट्रीटमेंट दिली जाते. या झाडाभोवती २४ तास पोलिसांचा पहारा असतो . इतकेच नाही तर या झाडाच्या देखभालीसाठी वर्षाकाठी १२ ते १५ लाख रुपये खर्च केला जातो .  नवी मुंबई (भोपाळ) - देशाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात असतात आणि ते सीमेवर पहारा देत देशाची दिवसरात्र सुरक्षा करतात. फक्त देशच नाही तर व्हीआयपी मंडळींसाठी म्हणजेच अतिविशेष व्यक्तींसाठी २४ तास सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात असतात . पण हिंदुस्थानात एक असे झाड आहे त्याला फक्त VIP नव्हे तर VVIP ट्रीटमेंट दिली जाते. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि विदीशा दरम्यान सलामतपूरमध्ये एक झाड आहे . या झाडावर राज्य सरकार १२ ते १५ लाख रुपये खर्च करते अशी माहिती मिळाली आहे . इतकेच नाही तर या झाडाच्या सुरक्षेसाठी २४ तास पोलीस तैनात असतात . या झाडाच्या संरक्षणासाठी भोवताली १५ फूट जाळी लावण्यात आली आहे . या झाडाला पाणी देण्यासाठी स्थानिक नगरपालिकेकडून एका पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे

कोरोना अपडेट : महाडमधील ५ मजली इमारत कोसळून मोठा अपघात; १९ जणांना वाचवण्यात यश; ७ जण जखमी तर १२ मृत:

कोरोना अपडेट : महाडमधील ५ मजली इमारत कोसळून मोठा अपघात; १९ जणांना वाचवण्यात यश; ७ जण जखमी तर १२ मृत: रायगड जिल्ह्यातील महाड शहरात पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे ५ मजली इमारत कोसळली. यात ५० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती आहे. बचावकार्य सुरु असून आठ जणांना बाहेर काढण्यात आले असून एकाचा मृत्यू झालाय. पनवेल (बातमी- रायगड/महाड) : महाड शहरात पाच मजली इमारत कोसळून मोठा अपघात झाला आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० हून अधिक नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं मदत कार्य सुरू केलं असून, १९ जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ३ पथके पुण्याहून महाडकडे रवाना झाली आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती घेतली असून प्रशासनाला मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारी सायंकाळी महाडला हादरवणारी घटना घडली आहे. शहरांतील काजळपूरा येथील पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटन