Skip to main content

कोरोना अपडेट : नवी मुंबई, केडीएमसीत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे; मात्र ठाणे, उल्हासनगर भिवंडीमध्ये कोरोना नियंत्रणात :

कोरोना अपडेट : नवी मुंबई, केडीएमसीत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे; मात्र ठाणे, उल्हासनगर भिवंडीमध्ये कोरोना नियंत्रणात :



नवी मुंबई (ठाणे/प्रतिनिधि) : ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनांनी केलेल्या उपाययोजनांमुळे ठाणे शहरा पाठोपाठ भिवंडी, उल्हासनगरमध्ये दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील पंधरवड्यापासून घट झाली आहे. तसेच या शहरांमध्ये कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. परंतु, दुसरीकडे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मात्र दररोज रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या दोन्ही शहरांत संसर्ग रोखण्याचे आव्हान कायम आहे.


ठाणे जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढते होते. मात्र, त्यानंतर बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस कमी-जास्त असा चढउतार दिसून येत आहे. मागील पंधरवड्यापासून मात्र ठाणे शहरासह भिवंडी आणि उल्हासनगर या शहरांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात तर कोरोनामुक्तीचे प्रमाण सर्वाधिक असून ते राज्यात प्रथम तर देशात दुसर्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ भिवंडी आणि उल्हासनगर शहरांमध्ये देखील कोरोनामुक्तांच्या संख्येत वाढ होत असून बाधितांची संख्या घटत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.


जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांत एकूण १७ हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये भिवंडी शहरातील केवळ २९७ आणि उल्हासनगरातील ४२६ रुग्णांचा समावेश आहे. तर जून आणि जुलै महिन्यामध्ये ठाणे शहरात जिथे दररोज ३०० ते ३५० हून अधिक रुग्ण आढळून येत होते तिथे सध्या १००-१५० रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे गेल्या पंधरा दिवसांमध्ये शहरांत दोन हजार ५८० रुग्ण आढळले आहेत. या तिन्ही शहरांमध्ये योग्य उपचार मिळत असल्याने रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे.



नवी मुंबई, केडीएमसीत अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ३ हजारांवर :
सध्या भिवंडीत केवळ १८३, उल्हासनगरमध्ये ३२७ आणि ठाणे शहरात एक हजार ७८८ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तर मीरा-भार्इंदरमध्ये दोन हजार ८८, ठाणे ग्रामीणमध्ये एक हजार २८३, बदलापूरमध्ये ७६९ आणि अंबरनाथमध्ये ४६५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या मीरा-भार्इंदरमध्ये एक हजार ४५१, ठाणे ग्रामीणमध्ये एक हजार ३६०, बदलापूरमध्ये २७८ आणि अंबरनाथमध्ये ३०२ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. याउलट नवी मुंबईत ३,४१६ आणि केडीएमसीत ३,१५७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे