कोरोना अपडेट : Breaking News - तुकाराम मुंडेची अखेर नागपुर मधून बदली..!!!!
नवी मुंबई (नागपुर/प्रतिनिधि) - नागपूर महानगरपालिकेतील भाजपा नगरसेवकांसोबतचा झालेला वाद आयुक्त तुकाराम मुंढे यांना भोवला आहे. मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सचिवपदी बदली करण्यात आली आहे.
राज्याचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी यासंदर्भात बुधवारी आदेश जारी केले. मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर राधाकृष्णन बी. नागपुरचे नवीन मनपा आयुक्त राहणार आहेत.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.