कोरोना अपडेट : पाटण भूषण सातारा जिल्ह्यातील रत्न महाराष्ट्रविर कॅप्टन अमोल शिवाजी यादव यांचा सत्कार:
कोरोना अपडेट : पाटण भूषण सातारा जिल्ह्यातील रत्न महाराष्ट्रविर कॅप्टन अमोल शिवाजी यादव यांचा सत्कार:
नवी मुंबई (बातमी/सातारा) : युवा संघर्ष संस्थेतर्फे पाटण भूषण कॅप्टन अमोल शिवाजी यादव यांचा विमान निर्मितीबद्धल सत्कार करण्यात आला. इमारतीच्या गच्चीवर तयार केलेले हे विमान. विमानाला भरारी आणि जग प्रवासासाठी केंद्र सरकारची रितसर परवानगी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळाली आहे. विमानाचा जनक कॅप्टन अमोल यादव हे आहेत.
रिपब्लिकन नेते आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा. शिवाजी यादव यांचे अमोल यादव चिरंजीव आहेत . प्रा.यादव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या "The Problem of Rupee : It's origin and solution" केलेला अनुवाद प्रसिद्ध आहे .
या प्रसंगी युवा संघर्ष संस्थेचे पदाधिकारी विनोद जेटीथोर , अरुण खरात , सचिन बल्लाळ , निलेश रोकडे व अमोल जगधनी यांनी कॅप्टन यांच्याबरोबर चर्चा - विनिमय करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अमेरिकेतून प्रशिक्षण घेऊन भारतात आल्यानंतर स्वतः आणि मित्रांच्या सहाय्याने विमान विकत घेऊन आपणही भारतात विमान निर्मिती करावी. अशी संकल्पना कॅप्टन यांनी कृतीत आणली. आणि अथक परिश्रमातून विमान तयार केले आहे. काही चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हे विमान प्रवास करण्यासाठी सज्ज होईल.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.