कोरोना अपडेट : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन १९२ रूग्ण; तर २ मृत्यूंची नोंद व १९८ जणांना घरी सोडण्यात आले:
कोरोना अपडेट : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे नवीन १९२ रूग्ण; तर २ मृत्यूंची नोंद व १९८ जणांना घरी सोडण्यात आले:
पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत २७ ऑगस्ट रोजी कोरोनाचे नवीन १९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १९८ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच २ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये कामोठे आणि नवीन पनवेल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच,
आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका क्षेत्रातील रुग्ण :
एकूण १०,९६३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ९६५६ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २७३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १०३४ ऐक्टिव रूग्ण आहेत.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.