Skip to main content

कोरोना अपडेट : महाडमधील ५ मजली इमारत कोसळून मोठा अपघात; १९ जणांना वाचवण्यात यश; ७ जण जखमी तर १२ मृत:

कोरोना अपडेट : महाडमधील ५ मजली इमारत कोसळून मोठा अपघात; १९ जणांना वाचवण्यात यश; ७ जण जखमी तर १२ मृत:


रायगड जिल्ह्यातील महाड शहरात पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे ५ मजली इमारत कोसळली. यात ५० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती आहे. बचावकार्य सुरु असून आठ जणांना बाहेर काढण्यात आले असून एकाचा मृत्यू झालाय.



पनवेल (बातमी- रायगड/महाड) : महाड शहरात पाच मजली इमारत कोसळून मोठा अपघात झाला आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० हून अधिक नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं मदत कार्य सुरू केलं असून, १९ जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ३ पथके पुण्याहून महाडकडे रवाना झाली आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती घेतली असून प्रशासनाला मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.



सोमवारी सायंकाळी महाडला हादरवणारी घटना घडली आहे. शहरांतील काजळपूरा येथील पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० पेक्षा अधित लोक आडकल्याची भिती व्यक्त होत आहे. जखमींना काढण्यासाठी एनडीआर‌एफला पाचारण करण्यात आले आहे. काल सायंकाळी ६ वाजनेच्या सुमारास महाड मुंबई मार्गावरील काजळपूरा येथील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत पिलर फुटल्याने पत्त्यासारखी कोसळली.


बचावकार्य युद्धपातळीवर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश : 
महाड येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही दूरध्वनी करून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री हे खासदार सुनील तटकरे आणि स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्या संपर्कात असून बचावकार्याची माहिती घेत आहेत.



बिल्डर कोहीनुर डेव्हलपर्स, पनवेल यांच्या फारुक म्हामुदमिंया काझी याच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी भाजपाचे जिल्हासरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी केली आहे. नगरपालिकेने जेव्हा या इमारतीला कम्प्लीशन सर्टीफीकेट दिलेच कसे ? या विरोधात २०११ ला महामुणकर यांनी सदर इमारतीचे स्ट्रकचर ऑडीट करावे अशी मागणी केली होती. सदर इमारत ही निकृष्ट बांधाकामुळेच कोसळल्याचा आरोप होत आहे. घटनास्थळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, नगराध्यक्ष स्नेहल जगताप हजर झाले आहेत.



प्रशांशना कडुन मदतकार्य तत्पर:


● रायगड जिल्ह्यातील महाड येथील तारिक गार्डन नावाची ५ मजली इमारत कोसळून काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले गेल्याची भीती.


● जिल्हा प्रशासनाची तात्काळ मदत व बचाव कार्यासाठी तत्परता. पुण्याहून एनडीआरएफची ३ पथके महाडमध्ये दाखल.


● माणगाव,पेण, तळा, पोलादपूर, पनवेल, रोहा, अलिबाग, खोपोली, मुरुड, सुधागड येथून गॅस कटर्स, ॲम्बुलन्स, जनरेटर, जेसीबी, डंपर, डॉक्टर्स, पोकलेन, पाणी, बिस्किट्स, तसेच मदत कार्यासाठी इतर आवश्यक साधन सामग्री मोठ्या प्रमाणावर तात्काळ पाठविण्यात आली आहे. एनडीआरएफच्या पथकांना घटनास्थळी लवकरात लवकर पोहाचण्यासाठी ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था करण्यात आली आहे.


● मेडिकल कॅम्पसाठी नोडल ऑफिसर म्हणून श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांची नियुक्ती करण्यात आलीय.


● जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी माणगावमधील राऊत हॉस्पिटल, निकम हॉस्पिटल, राठोड हॉस्पिटल, बेडेकर हॉस्पिटल, वक्रतुंड हॉस्पिटल, पटेल हॉस्पिटल, माळी हॉस्पिटल, यादव हॉस्पिटल, रानडे हॉस्पिटल, पाटणकर हॉस्पिटल, चव्हाण हॉस्पिटल, कामेरकर हॉस्पिटल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय आणि महाड शहरातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, भोसेकर हॉस्पिटल नांदगावकर हॉस्पिटल, म्हामुणकर हॉस्पिटल, डॉ. फैजल देशमुख हॉस्पिटल भूलतज्ञ, आर्थोपेडिक, जनरल सर्जन, बालरोगतज्ञ यांच्यासह सज्ज.


● पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या समन्वयातून एमजीएम हॉस्पिटल कळंबोली, बेलापूर डी.वाय.पाटील हॉस्पिटल तसेच ज्युपिटर हॉस्पिटल आवश्यकता भासल्यास महाड दुर्घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी सज्ज. रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या समन्वयातून जिंदाल स्टील हॉस्पिटल महाड दुर्घटनेतील जखमींच्या उपचारार्थ सज्ज.


● मदतीसाठी रिलायन्स नागोठणे, पोस्को कंपन्याही सरसावल्या पुढे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे महाड जवळील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ रक्तदानासाठी आवाहन.


● सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावार यांच्याकडून आजच रक्तदान शिबिराचे आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांचे तारिक गार्डन इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश. आतापर्यंत १९ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले असून ७ जण जखमी तर १२ जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.


● संपूर्ण परिस्थितीवर पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांचे संपूर्ण लक्ष. घटनास्थळावरील सर्व यंत्रणांशी समन्वय.


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे