Skip to main content

कोरोना अपडेट : महागृहनिर्मितीतील सिडकोच्या घरांचा ताबा वर्षांअखेर मिळणार ; हप्ते भरण्यास मुदतवाढ..!!!!

कोरोना अपडेट : महागृहनिर्मितीतील सिडकोच्या घरांचा ताबा वर्षांअखेर मिळणार ; हप्ते भरण्यास मुदतवाढ..!!!!



नवी मुंबई : दोन वर्षांपूर्वी सिडकोने जाहीर केलेल्या महागृहनिर्मितीतील पंधरा हजार घरांच्या सोडतीतील सुमारे साडेतीन हजार घरांचा ताबा वर्षांअखेपर्यंत दिला जाणार आहे. या घरांचा ताबा ऑक्टोबरमध्ये देण्याचे आश्वासन सिडकोने यापूर्वी दिले होते. करोना साथीचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीत या घरांचे बांधकाम ठप्प झाले होते. आता काम सुरू असून काम शेवटच्या टप्प्यात आहे. टाळेबंदीमुळे विद्युत आणि इतर आवश्यक कामे शिल्लक आहेत.


केंद्र सरकारच्या सर्वासाठी घरे या योजनेअंर्तगत जास्तीत जास्त परवडणारी घरे बांधण्याची जबाबदारी सिडकोवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सिडकोने टप्प्याटप्प्याने दोन लाख घरे बांधण्याचे उदिष्ट नजरेसमोर ठेवले आहे. यातील १४ हजार ७३८ घरांची सोडत दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून ऑक्टोबरमध्ये काढण्यात आली होती. या सोडतीत भाग्यवंत ठरलेल्या ग्राहकांचे तिमाही हप्ते घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील दोन वर्षांत ग्राहकांनी बँक कर्ज घेऊन सोडतीत लागलेल्या घरांचे हप्ते भरणे सुरू ठेवले आहे.



करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत अनेक ग्राहकांचे रोजगार गेले आहेत तर काही जणांची वेतन कपात झाली आहे. त्यामुळे हे हप्ते भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. सिडकोने दोन वेळा ही मुदतवाढ दिली आहे. यात काही ग्राहकांनी मात्र सिडकोचे हप्ते सुरळीत भरलेले आहेत. तळोजा, खारघर, घणसोली या भागात बांधण्यात येणाऱ्या या योजनेतील काही घरे बांधून तयार झालेली आहेत. सिडकोच्या आश्वासनानुसार या घरांचे ताबे ऑक्टोबर २०२० मध्ये दिले जाणार होते, मात्र गेले पाच महिने लागू असलेल्या टाळेबंदीमुळे या घरांची शेवटच्या टप्प्यातील कामे अद्याप अपूर्ण आहेत. या घरांची स्थापत्य कामे जवळजवळ पूर्ण झाली असून विद्युत आणि इतर सुविधायुक्त कामे बाकी आहेत. टाळेबंदीच्या पाच महिन्यांत अनेक मजूर व कामगार हे गावी गेल्याने ही कामे करणाऱ्या कंत्राटदारांचा नाईलाज झालेला आहे. त्यामुळे शेवटचा हात फिरणारी ही घरातील कामे करण्यास आणखी चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सिडकोतील एका उच्च अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यामुळे या घरांचा येत्या ऑक्टोबपर्यंत ताबा देणे शक्य होणार नाही. हा ताबा आता वर्षांअखेपर्यंत दिला जाणार आहे.


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे