कोरोना अपडेट : "WHO" च्या प्रमुखांनी केला खुलासा कोरोना विषाणू नष्ट होण्यास लागू शकतील २ वर्षं :
नवी मुंबई (विशेष/प्रतिनिधी)- कोरोना व्हायरस जगातून नष्ट होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख डॉ. टेड्रोस अॅधेनॉम घेब्रेयेसूस यांनी केलं आहे.
शुक्रवारी २१ऑगस्ट रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनिव्हा येथील मुख्यालयात माध्यमांशी बोलताना डॉ. टेड्रोस अॅधेनॉम घेब्रेयेसूस म्हणाले, “आशा आहे की दोन वर्षांच्या आत कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊ.”
१९१८ मध्ये आलेली स्पॅनिश फ्लूची साथ संपण्यासही दोन वर्षांचा काळ लागला होता, असंही डॉ. घेब्रेयेसूस म्हणाले.
सध्या जग पूर्वीपेक्षा जास्त एकमेकांशी जोडलेलं आहे. अशा स्थितीत व्हायरस पसरण्यासाठी जास्त वाव मिळतो. पण सध्या तंत्रज्ञानानेही प्रगती केली आहे, त्यामुळे कमी वेळेत कोरोना नष्ट करण्याची आपल्याकडे क्षमता देखील आहे,” असं घेब्रेयेसूस यावेळेस म्हणाले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.