कोरोना अपडेट : पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे नवीन ७१ रूग्ण; तर ३ जणांचा मृत्यू व ७६ जणांना घरी सोडण्यात आले:
कोरोना अपडेट : पनवेल ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे नवीन ७१ रूग्ण; तर ३ जणांचा मृत्यू व ७६ जणांना घरी सोडण्यात आले:
पनवेल : पनवेल ग्रामीण भागामध्ये २७ ऑगस्ट रोजी कोरोनाचे नवीन ७१ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून ७६ रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच ३ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये उलवे येथील २ तर आदई येथील एका रूग्णाचा समावेश आहे. आदई येथील एका रूग्णाचा २२ ऑगस्ट रोजी, दुसऱ्या रूग्णाचा २३ ऑगस्ट रोजी तर आदई येथील रुग्णाचा ६ जुलै रोजी मृत्यू झाला आहे. या सर्व रूग्णांचा 'डेथ समरी रिपोर्ट' आज मिळाल्याने त्यांची आज नोंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच, आजपर्यंतच्या एकूण ३२९४ कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण २८०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर ६४ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे ४२९ ऐक्टिव रूग्ण आहेत.
पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे ७१ नविन रूग्ण :
आज नोंद झालेल्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये उलवे येथील १४, सुकापूर येथील ११, मालेवाडी-सुकापूर येथील ६, देवद येथील ५, करंजाडे येथील ५, आदई येथील ४, कोन येथील २, नेरे येथील २, कोप्रोली येथील २, शिवकर येथील २, तसेच डेरवली, कोळखे, पारगाव, विचुंबे, भाताण, बोनशेत, दापोली, लाडीवली, नारपोली, पाले बुद्रुक, पालीदेवद, सावळे, शेलघर, शिरढोण, उसर्ली, वावंजे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
पनवेल ग्रामीण भागातील ७६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला :
आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये उलवे येथील १८, भगतवाडी-सुकापूर येथील ६, सुकापूर येथील ५, विचुंबे येथील ५, करंजाडे येथील ५, डेरवली येथील ४, आदई येथील ३, देवद येथील ३, कोळखे येथील २, न्हावा येथील २, पळस्पे तसेच, बोर्ले, चिंचवण, चिपळे, दिघाटी, कराडे खुर्द, कोन, कोपर-गव्हाण, कुंडेवहाळ, मोर्बे, नांदगाव, नेरे, नितळस, ओवळे, पारगाव, शेडुंग, सोमाटणे, उमरोली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.