कोरोना अपडेट : 'वंचित'च्या पुढाकाराने स्थानिकांना रोजगारात प्राधान्य..!
नवी मुंबई (बातमी/पुणे) - पिंपरी चिंचवड शहरातील अण्णासाहेब मगर स्टेडियम या ठिकाणी कोविड सेंटरचे २००० बेडचे काम चालू आहे. या कोविड सेंटरमध्ये कामासाठी भरती चालू आहे. हे समजताच वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराचे युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील, महासचिव ईश्वर भाऊ कांबळे, रहिम भाई सय्यद, विट्ठलनगर शाखेचे युवा नेत्तुव शरद वाघमारे, नरेश मस्के, अमोल जावळे, शशिकुमार टोपे, नितीन कसबे, संदीप वाघमारे, सूर्यकांत जावळे आदि. कार्यकर्ते यांनी कोविड सेंटरला जाऊन संबंधित ठेकेदाराशी चर्चा करुन स्थानिक नागरिकांना कामासाठी प्राधान्य देण्यात यावे ही विनंती केली व त्यानी आमच्या विनंतीला मान देऊन स्थानिकांना प्राधान्य दिले.
विट्ठल नगर मधील बेरोजगार नागरिकांना व महिलांना, मुलांना कोविड सेंटरमध्ये हाताला काम मिळाले. विट्ठल नगर पुनर्वसन प्रकल्प या ठिकाणी या सर्वांचे फॉर्म भरुन घेण्यात आले. आज असे लक्षात आले की विट्ठलनगरमध्ये बरेच नागरिक या लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झाले आहेत. व काही लोकांच्या नोकऱ्या, कामापासुन वंचित झाले आहेत. काम नसल्यामुळे हे नागरिक आज अशा परिस्थितीत हे काम करायला सुध्दा तयार झाले आहेत. अश्या उपासमारीनी मरण्यापेक्षा कोरोनानी मरू अशा काहींनी प्रतिक्रिया ही व्यक्त केल्या. व या सर्व जणानी वंचित बहुजन आघाडी विट्ठल नगर शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्त यांचे रोजगार उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.