कोरोना अपडेट : लाखो वाहन धारकांनसाठी खुशखबर; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत :
देशात लॉकडाऊन लागू झाल्यापासूनच आर्थिक संकटात असलेल्या वाहनधारकांसाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यावसायिक वाहनधारकांना सहा महिन्यांसाठी रस्ते करातून सूट देऊ शकतात. लाखो वाहन धारकांना ११.४ लाख वर्षाला रस्ते कर भरावा लागतो. राज्य सरकार जवळपास ७०० कोटी रुपये माफ करणार आहे.
नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधी) : राज्यातील वाहतूक क्षेत्राला वित्तीय सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्या ५ महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे वाहतूक क्षेत्राला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून अनेक वाहनधारक आर्थिक संकटात आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हा निर्णय घेणार आहेत. वाहतूक क्षेत्राला पुन्हा उभारी यावी यासाठी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळासाठी राज्यातील ११.४ लाख व्यावसायिक वाहनांना ७०० कोटी रुपयांची रस्ते कर माफी देण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतच्या हालचाली सुरू केल्या होत्या. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात ११.४ लाख नोंदणीकृत व्यावसायिक वाहने आहेत. यामध्ये पर्यटक टॅक्सी, मिनी बस, बस, स्कुल बस, ट्रक, टँकर आणि मालवाहू वाहने यांचा समावेश होतो. लॉकडाऊन केल्यापासूनच या सर्वांचा व्यवसाय ठप्प आहे. वाहन मालक आणि त्यांच्या संघटनांकडून राज्य सरकारला अनेकदा याबाबत मागणी करण्यात आली आहे. त्यामुळेच या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी कर माफी करणे अत्यावश्यक आहे, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली.
अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड आणि हरियाणा यासह १२ पेक्षा जास्त राज्यांनी सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांना रस्ते करातून सूट दिली आहे. महाराष्ट्रात वाहनांचे दोन वर्ग आहेत. वर्षाला रस्ते कर देणाऱ्या वाहनांची संख्या ११.४ लाख एवढी आहे. त्यामुळे एप्रिल ते सप्टेंबर या ६ महिन्यांसाठी व्यावसायिक वाहनांना रस्ते करातून सूट दिली जाणार आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.