Skip to main content

कोरोना अपडेट : दिलसादायक बातमी! वृद्धांमध्येही तयार होत आहे कोरोनाविरोधात इम्युनिटी, 'या' कंपनीला आल मोठं यश :

कोरोना अपडेट : दिलसादायक बातमी! वृद्धांमध्येही तयार होत आहे कोरोनाविरोधात इम्युनिटी, 'या' कंपनीला आल मोठं यश :


कंपनीने एक निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. हे रिझल्ट अत्यंत सकारत्मक आहेत. कारण सर्वसामान्यपणे लशीचा परिणाम युवकांच्या तुलनेत वृद्धांवर फार कमी होत असतो. मात्र आलेल्या या रिझल्टमध्ये, ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांतही अँटीबॉडीजचे प्रमाण तरुणांच्या तुलनेत असल्याचे आढळून आले आहे.



नवी मुंबई (बातमी/वॉशिंग्टन) - कोरोना विषाणू विरोधातील लस तयार करणारी कंपनी मोर्डेना (Moderna Inc) ला वृद्धांवर केलेल्या परीक्षणाचे उत्साहवर्धक व सकारत्मक रिझल्ट मिळाले आहेत. कंपनीने लशीच्या सुरुवातीच्या परीक्षणाचा नवा सेफ्टी डेटा जारी केला आहे. यात वृद्धांना कोरोना लस दिल्यानंतर इम्यून सिस्टममध्ये रिस्पॉन्स तयार झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यावरील परीक्षणात मोर्डेना (Moderna) च्या लशीने मोठ्या प्रमाणावर न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी तयार केली.


सर्वसाधारनपणे वृद्धांवर कमी परिणाम होतो - 
कंपनीने एक निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. हे रिझल्ट अत्यंत उत्साहवर्धक आहेत. कारण सर्वसामान्यपणे लशीचा परिणाम युवकांच्या तुलनेत वृद्धांवर फार कमी होत असतो. मात्र आलेल्या या रिझल्टमध्ये, ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांतही अँटीबॉडीजचे प्रमाण तरुणांच्या तुलनेत असल्याचे आढळून आले आहे. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अॅडव्हायझरी कमिटी ऑन इम्युनायजेशन प्रॅक्टिसेसच्या समक्ष हा डेटा ठेवण्यात आला. हे परीक्षण २० लोकांवर करण्यात आले होते.


लस घेतल्याणे कुठल्याही प्रकारचा गंभीर साइड-इफेक्ट्स नाही -
या लशीचे परीक्षण अखेरच्या टप्प्यात पोहोचले आहे. विशेष म्हणजे, जेवढा डोस अखेरच्या टप्प्यावर आहे, तेवढाच डोस या परिक्षणादरम्यानही देण्यात आला. यात, कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांपेक्षाही अधिक अँटीबॉडीचे प्रमाण आढळून आले आहे. ही लस दिल्यानंतर, थंडी, ताप आणि थकव्यासारखे साइड-इफेक्ट्स दिसून आले. मात्र, विशेष गंभी परीणाम दिसून आला नाही.


ही लस तरुणांवरही सकारात्मक परिणाम करते -
यापूर्वी कंपनीने याच परिक्षणाच्या डेटावरून सिद्ध केले होते, की ही लस तरुणांमध्ये कोरोना व्हायरसविरोधत अँटीबॉडी तयार करत आहे. मात्र, वृद्धांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे, त्यांच्यासाठीही परिणामकारक ठरू शकेल, अशी लस तयार करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले होते. 


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे